द्राक्षावरील भुरी रोगाचे व्यवस्थापन!! Brown rot disease on grapes 2025

Brown rot disease on grapes 2025 युनसिन्युला निकॅटर बुरशीमुळे द्राक्षावरती भुरी हा महत्त्वाचा रोग येतो. अनुकूल वातावरणात या रोगामुळे संपूर्ण नुकसान होते. हा रोग फळांच्या छाटणीनंतरच्या वाढीच्या अवस्थात सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा काळ हा या रोगाच्या वाढीस अनुकूल काळ आहे.

Brown rot disease on grapes 2025

लक्षणे: Brown rot disease on grapes 2025 इतर पिकातील भुरीप्रमाणेच पानांवर पांढरी बुरशी दिसून लागते. बुरशी पुढे संपूर्ण पानांवर पसरते व पिकाचा सर्व भाग व्यापला जातो. रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटून पाने लहान होतात. फुलोऱ्यात असताना लागण झाल्यास फळे येत नाहीत काही वेळा घडावर देखील पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. घड पक्व होताना लागण झाली तर (फळे) मणी अनियमित आकाराची होतात किंवा तडकतात. काही पक्व होतात तर काही तशीच राहतात.

पीकविमा योजनेतून सरसकट 17,500 रुपये मिळणार का? कोणत्या निकषाआधारे ठरणार नुकसान भरपाई?

रोग येण्यासाठी आवश्यकता असणारे हवामान:

Brown rot disease on grapes 2025 द्राक्षावरील भुरी रोगाचा प्रादुर्भाव तसेच झपाट्याने प्रसार प्रामुख्याने वातावरणाचे तापमान 20 ते 24 अंश सेल्सिअस, हवेतील आद्रता 40 ते 80 टक्के आणि सूर्यप्रकाश असल्यास होतो. सर्वसाधारणपणे थंड व कोरडे हवामान भुरी रोगाच्या बुरशीच्या वाढीसाठी उपयुक्त असते.

WhatsApp Group Join Now

Brown rot disease on grapes 2025 भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायझोल जातीतील बुरशीनाशके म्हणजेच 1.हेक्झाकोनॅझोल 2.पेनकोनॅझोल 3.मायक्लोब्यूटॅनील 4.डायफेनकोनॅझोल 5.ट्रायडेमेफॉन ही वापरली जातात. सर्व बुरशीनाशकांची बुरशीला मारण्याची पद्धत एकसारखी आहे. तरी देखील या सर्व बुरशीनाशकाची बुरशीमध्ये होणाऱ्या प्रतिकाराचा धोका फारसा नाही.

Brown rot disease on grapes 2025 कारण भुरीची बुरशी डाऊनीच्या बुरशीच्या तुलनेत प्रतिकारशक्ती लवकर आत्मसात करू शकत नाही. भारतामध्ये भुरीचे लैंगिक प्रजनन आपल्याकडे थंडी फार कमी असल्यामुळे होत नाही व वर्षभर भुरीच्या बुरशीचे अलैंगिक प्रजनन होत असल्यामुळे या बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची फार कमी संधी आहे.

स्ट्रॅब्युलीन जातीतील बुरशीनाशके भुरीचे नियंत्रण करू शकत असले तरी देखील त्यांची भुरीमध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. त्यामुळे या जातीतील बुरशीनाशके भुरीच्या नियंत्रणासाठी वापरणे टाळावे. या विरुद्ध घड काढणीसाठी आलेले असताना ढगाळ वातावरण झाल्यास बागेत देठावरची भुरी वाढते. अशावेळी ट्रायझोल जातीतील बुरशीनाशके उशिरा वापरता येत नाहीत व तेथे या जातीतील बुरशीनाशकांचा प्रतीक्षा कालावधी 7 ते 15 दिवसाइतका कमी आहे. त्याच बरोबर यांचा वापर घड काढणीनंतरची कुजसुद्धा कमी करतात.

WhatsApp Group Join Now

Brown rot disease on grapes 2025 स्ट्रॅब्युलीन जातीतील सर्वच बुरशी नाशके येग्यवेळी व योग्यप्रमाणात वापरल्यास द्राक्ष वेलीवर संजिवकाप्रमाणे काम करतात. त्याच बरोबर पानांचा आकार वाढणे या सर्व गोष्टी स्ट्रॅब्युलीन जातीतील बुरशी नाशके करतात.

भुरी मुख्यतः थंडीच्या दिवसात येत व सल्फर थंडीमध्ये कमी प्रभावी असते.छाटणीनंतर लगेच किंवा घड फुलोऱ्यात येण्याआधी देखील भुरीची संभावना असते. अशावेळी ट्रायझोल बुरशीनाशके वापरण्याऐवजी सल्फर वापरणे फायद्याचे ठरू शकते. तसेच काढणीच्या आधीसुद्धा बागेतील तापमान वाढलेले असते. व त्या तापमानात सल्फर वापरल्यास भुरीचे चांगले नियंत्रण मिळू शकते. पूर्वी सल्फर फवारल्यानंतर मण्यांवर डाग येतात म्हणून सल्फर टाळले जात असे. परंतु आता किंवा फार्मुलेषणमध्ये मिळणाऱ्या सल्फरचे मण्यांवर डाग दिसत नाहीत.

Brown rot disease on grapes 2025 ट्रायझोल जातीतील बुरशीनाशकांचा वापर करूनसुद्धा भुरी नियंत्रण झालेले नसते अशा बागेमध्ये सर्वसाधारणपणे कॅनोपी दाट असल्यामुळे चांगली फवारणी झालेली नसते. संपूर्ण कॅनोपी तयार झाल्यानंतर फवारलेले बुरशीनाशक आतल्या कॅनोपीमध्ये पोहचत नाही म्हणूनच आतल्या पानांमध्ये दडलेल्या घडांवर रोगाची लागण झालेली आढळते. आतल्या कॅनॉपीमध्ये सूर्यप्रकाश कमी पोहचतो हवा खेळती राहत नसल्याने आद्रता वाढते व रोग वाढतो. त्यासाठी खालील उपाय करणे आवश्यक आहे.

  • कॅनॉपीतील महत्वाच्या असलेल्या काड्या ठेवून बाकीच्या काढून टाकाव्यात त्यामुळे खेळती हवा राहील व सूर्यप्रकाश व फवारणी पोहचू शकेल.
  • कॅनोपीतील घड फवारणी करताना फवारणीच्या समोर येतील याची दक्षता घ्यावी.
  • फवारणी यंत्रावर लावलेले नोझल्स कॅनॉपीच्या सर्व बाजूस फवारणी करतील व त्यामधून निघणारे तुषार कमीत कमी आकाराचे असणे आवश्यक आहे. फवारणीवेळी नोझल्स कॅनॉपीपासून कमीत कमी एक फूट दूर असले पाहिजेत. तसेच बेंझामिडॅझॉल जातीतील बुरशीनाशके देखील (कार्बेन्डाझिम, बेनोमिल, थायोफेनेट मिथाईल) भुरीसाठी प्रभावी आहेत व अंतर प्रवाही सुद्धा आहेत.

भुरीचे नियंत्रण करत असताना पानांमध्ये व घडांमध्ये पोटॅश, सिलिकॉन व कॅल्शियमची मात्रा योग्य असेल तर भुरी कमीत कमी फवारणीत नियंत्रण करणे शक्य आहे. बागेत मोनो पोटॅशिअम फॉस्फेट सल्फेट ऑफ पोटॅश फवारल्यास पोटॅश मिळाल्याने भुरीसुद्धा नियंत्रित राहते.

घडामध्ये देठ मजबूत होण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट अथवा कॅल्शियम क्लोराईड वापरले जाते. यामुळे सुद्धा भुरीचे नियंत्रण होऊ शकते. अलीकडे सिलिसिली ऍसिड बाजारात मिळते. त्याचा वापर घडाच्या सुरुवातीच्या वाढी वेळेस झाल्यास भुरीचे नियंत्रण कमी बुरशीनाशकांच्या फवारणीने शक्य आहे.

तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी, ट्रायकोडर्मा हरझियानम आणि बॅसिलस सबटिलिस सारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर देखील अंत्यत प्रभावी ठरतो. त्यांचा वापर हवामानाच्या अंदाजानुसार रोग येण्यास अनुकूल हवामानापुर्वी तसेच बागेत रोगाची लागण होण्याअगोदर करणे महत्वाचे आहे. तसे केल्यास डाऊनी, भुरी व करपा इ. सर्व महत्वाच्या बुरशीजन्य रोगांच्या लागणीत प्रतिबंध होऊ शकतो. किंवा त्यांचा झपाट्याने होणार प्रसार देखील कमी होऊ शकतो.

इतर माहितीसाठी येथे क्लीक करा

Leave a Comment