Changes in Grape Environment 2025 द्राक्ष शेतीमध्ये सध्या वातावरणातील बदलांमुळे यंदा बरेचसे बदल आपणास आत्मसात करावे लागत आहेत. सध्या द्राक्षबागायतदारांना भेडसावणारी प्रमुख समस्या म्हणजे वारंवार पडणारा अवकाळी पाऊस. त्यात भरीस भर म्हणून गारपिट व गारपिटीचा अंदाज द्राक्षबागायतदारांच्या पोटात धडकी भरवणारा ठरत आहे.

Changes in Grape Environment 2025 द्राक्षघड व कॅनोपी वारंवार पावसाच्या पाण्याने भिजत असल्याने व ढगाळ हवामानामुळे वाढणारी आद्रता याचाच परिणाम म्हणून द्राक्ष घडात पाणी उतरण्याच्या कालावधी मध्ये सुद्धा केवडा (डावणी) रोगाचा प्रादुर्भाव ही कठीण समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ज्या बागायतदारांनी डावणीच्या फवारणीकडे दुर्लक्ष केले आहे. अशा बागांमध्ये द्राक्षघडांवर, देठांवर व पानांवर डावणीचा प्रादुर्भाव प्रकर्षाने दिसत आहे. दर वर्षीचे हवामान व यंदाचे हवामान यात बरीचशी तफावत असल्याने डावणी व भुरी या दोन्ही रोगांचे नियोजन सद्य परिस्थितीत करणे आवश्यक आहे.
खाजगी कापूस खरेदीला शुभारंभ, पहिल्याच दिवशी दाखल झाली तब्बल 200 वाहने…
Changes in Grape Environment 2025 डावणी रोगासाठी नियोजन करताना अतिधोकादायक ग्रुपमधील औषधांचा वापर जपून व योग्य प्रमाणात करा. तसेच या औषधांचा वापर सातत्याने केल्यास वेलीतील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन वेली पुन्हा डावणी व भुरी रोगास बळी पडतात. बागेतील जादा आद्रता, थंड हवामान व कॅनोपीची गर्दी व त्यामुळे औषधांचे कव्हरेज न मिळणे हे भुरी रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरणारे घटक आहेत.

Changes in Grape Environment 2025 भुरी आटोक्यात आणण्यासाठी औषधांचे कव्हरेज कसे व्यवस्थित होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच बागेतील आद्रता आटोक्यात आणण्यासाठी तणांचा बंदोबस्त व पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्फुरद व पालाश याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर या काळात झाल्यास ममीफिकेशन तसेच नेक्रोसिस सारख्या समस्या कमी करता येतील. पाण्यातून अथवा जमिनीतून या काळात मिळणारा नायट्रेट स्वरूपातील नत्र जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यास मण्यांमध्ये शर्करेचे प्रमाण तयार होताना अडचणी निर्माण होतात. त्याकरिता नत्राचा पुरवठा रोखून धरण्यासाठी निंबोळी पेंडीचा वापर करणे हितावह ठरते. तसेच न्यूट्रिशनच्या समस्या दरवर्षी भेडसवत असल्यास पर्णदेठ पृथ:करण, माती परीक्षण व पाणी परीक्षण अहवालानुसार सुधारणा कराव्यात.
Changes in Grape Environment 2025 द्राक्षमण्यांत साखर उतरण्यापूर्वी ढगाळ वातावरण असल्यास बऱ्याच वेळा थ्रिप्स किंवा खरड्याचा प्रादुर्भाव होतो. काही वेळा हे डाग औषधांचे स्कोर्चिंग किंवा इजा असल्याचे बागायतदारांकडून समजले जाते परंतु, कीटकनाशकांचा योग्यवेळी योग्य प्रमाणात वापर न झाल्याने द्राक्षमणांच्या देठावर व द्राक्षमण्यांवर थ्रीप्समुळे दिसू लागतात.
यासाठी सिंथेटिक पायरेथ्रॉईड्स ग्रुपमधील औषधांचा वापर न करता आंतरप्रवाही ऑरगॅनोफॉस्फोरस व कार्बामेट ग्रुपमधील कीटकनाशकांचा वापर करणे हितावह ठरते. तसेच मिलीबग्ज सारखी समस्याही गंभीर बनत आहे. सिंथेटिक पायरेथ्रॉईड्समुळे मिलीबग्ज आटोक्यात आणणे अवघड जाते. त्याकरिता पुर्ननियोजन करून एप्रिल छाटणीपासून योग्य औषधांची फवारणी घेणे आवश्यक आहे. बायोलॉजिकल व रासायनिक कीटकनाशकांचा वापर योग्य प्रमाणात व योग्य वेळी केल्यास मिलीबग्ज समस्या आटोक्यात आणणे सोपे जाते.
Changes in Grape Environment 2025 मिलीबग्जच्या नियंत्रणासाठी जमिनीतून कीटकनाशकांचा वापर करावयाचा असल्यास ड्रिपमधून सर्व झाडांना समान पाणी मिळते का बागेमध्ये लीकेजस आहेत का हे तपासूनच औषध सोडणे आवश्यक आहे. अन्यथा मिलीबग्ज आटोक्यात येण्यामध्ये अडथळा निर्माण होतो.
द्राक्षमण्यांच्या फुगवणीसाठी व गर भरण्यासाठी 80 ते 85 दिवसादरम्यान जी.ए. 2 ग्रॅम + एक्सपो 40 मिली + 12:61:00 100 ग्रॅम प्रति 100 ली. पाण्यात घेऊन फवारणी केल्यास गर भरण्यास व द्राक्षमण्यांची फुगवण होण्यास मदत होते. तसेच द्राक्ष घडांवर तजेलदारपणा येतो. सदरची फवारणी बेदाणा व मार्केटिंगसाठी तयार होणाऱ्या द्राक्षासाठी फायदेशीर ठरते.

द्राक्षवेलींचा वाढीचा वेग थंड हवामानात मंदावतो व त्यामुळे द्राक्ष मण्यांत साखर तयार होण्याच्या क्रियेत अडथळे निर्माण होतात. त्याकरिता जमिनीचे तापमान कायम टिकवून ठेवण्यासाठी पीक अवशेषांचे अथवा तणांचे मल्चिंग करणे आवश्यक व फायदेशीर ठरते.
द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरण्याच्या काळामध्ये अमिनो ऍसिड्सचा वापर शक्यतो टाळावा. तसेच पाण्याचे प्रमाण जमिनीच्या प्रतीनुसार ठरवावे. द्राक्षमुळीच्या विकासासाठी लागणारी वाफसा परिस्थिती कायम राहील याकडे लक्ष द्यावे.
संबर्निंग समस्या रोखण्यासाठी शक्यतो कॅनोपीचा विकास फुलोरा अवस्था सुरु होण्याच्या कालावधीपूर्वी करून घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व सावलीमध्ये राहतील यासाठी 65 ते 70 दिवसांनी नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच सल्फर व झोलग्रुपमधील औषधे, सीपीपीयूचा वापर करीत असताना कॅनोपीचा विस्तार व वेलीचे आरोग्य यांचा विचार जरूर करावा अन्यथा संबर्निंगची समस्या गंभीर बनू शकते.
सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे मुख्यत्वे करून अचानक वाढणारी उष्णता यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव बर्याचश्या भागांमध्ये दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. त्याची रोखथांब करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याकरिता अष्टपदी नाशकांचा उपयोग करणे आवश्यक आहे.
द्राक्षबागेमधे गर्डलिंग केले असल्यास पेशींची वाढ केलेली जखम पूर्णपणे मिळाली नसल्यास पुन्हा काथ्याने अथवा सोपटाने जखम करून त्यावर शेनकाला व बुरशीनाशकांचा लेप देणे आवश्यक आहे. अन्यथा अशा वेलींना कमकुवतपणा येऊन पुढील वर्षी फळधारणा होण्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
Changes in Grape Environment 2025 द्राक्ष बागातदारांनी अवकाळी पावसाच्या समस्येवर धीराने व एकमेकांशी विचार विनिमय करून सामना करणे आवश्यक आहे. कोणतेही व कितीही नुकसान झाले तरी त्यातून धीराने मार्ग काढून विकासाप्रत पोहोचणे हेच ध्येय असले पाहिजे त्यांना नव्या वाटा आपणास शोधाव्याच लागतील व येणारा हंगाम आपणास नक्कीच आनंददायी ठरेल.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |