Cotton Market 2025 यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी कापूस खरेदीच्या पहिला शुभारंभला प्रारंभ राळेगावात झाला आहे. राळेगावातील तीन खाजगी जिनिंगमध्ये 200 क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक झाली. या ठिकाणी कापसाला 7,190 रुपये क्विंटलचा दर मिळाला. या ठिकाणी 3 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

Cotton Market 2025 राळेगाव येथील तीन खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला, पवन, सुराणा व तुलसी कॉटन इंडस्ट्रीज मध्ये हा शुभारंभ पार पडला. यावेळी 200 पेक्षा अधिक वाहनातून तीन हजार क्विंटल कापसाची आवक झाली. कापसाची ओलावा प्रत पाहून दर देण्यात आले.
द्राक्षावरील फुलकिडींचे (थ्रीप्स) एकात्मिक नियंत्रण!!
सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करा-मागणी
Cotton Market 2025 राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन सीसीआय कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेण्यात आले असून, अद्यापही सीसीआय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सीसीआयच्या केंद्रावर ग्रेडर पोहोचलेच नाही.

30 क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा ठेवा
Cotton Market 2025 राळेगाव तालुक्यात सीसीआयचे केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यामध्ये हवामान बदलामुळे कापसातील आद्रता वाढल्यामुळे 16% पर्यंत ओलाव्याचा कापूस स्वीकारण्यात यावा, तसेच सीसीआयकडून पूर्वीप्रमाणे प्रति हेक्टर 30 क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा कायम ठेवण्यात यावी.
नवीन आदेशानुसार या हंगामात सीसीआयने कापूस खरेदीची मर्यादा 14 क्विंटलपर्यंत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या प्रमाणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Cotton Market 2025 याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी म्हणून सुमित राऊत, अमित डाखोरे, शेखर डोंगरे, चंद्रकांत डाखोरे, संदीप शिंगाडे, हर्षल झोटिंग, जीवन दामनवार, राजू ताकसांडे, राजेंद्र काळे, तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारात पुढील कारवाईचे आश्वासन दिले.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |