द्राक्षावरील फुलकिडींचे (थ्रीप्स) एकात्मिक नियंत्रण!! Control of thrips on grapes 2025

Control of thrips on grapes 2025 द्राक्षावरील फुलकिडे हि कीड सुरुवातीला विशिष्ट पीक व भागासाठी मर्यादित होती. परंतु हि कीड अलीकडे द्राक्षावरील एक प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते. हि कीड सध्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे.

Control of thrips on grapes 2025

WhatsApp Group Join Now

किडीच्या जाती:

Control of thrips on grapes 2025 या किडीच्या प्रमुख तीन जाती भारतामध्ये द्राक्षपिकाला हानिकारक आहेत.

  1. स्फीरोथ्रीप्स डॉरसॅलिस
  2. थ्रिप्स हवाईनसीस
  3. हिपोफॉरेथ्रीप्स क्रुइनटॅंटीस

शेतकऱ्यांनो, ड्रोन पायलट व्हा; मोफत मिळणार प्रशिक्षण!!

जीवनक्रम: Control of thrips on grapes 2025

या किडींचा प्रौढ काळ्या रंगाचा, लांब, पंख असलेला कीटक असतो. 2 ते 10 दिवसानंतर प्रौढ कीटक मादीबरोबर मिलन करतात. या किडीची मादी 50 ते 100 अंडे पानाच्या खालच्या बाजूस घालते. हि अंडी 5 ते 8 दिवसांत उबविली जातात व पिल्ले कोषावस्थेत जमिनीत जातात. हा जीवनक्रम 15 दिवसात पूर्ण केला जातो. पिल्ले आणि प्रौढ सारखे दिवसात पण पिल्लाना पंख नसतात. एका वर्षात साधारणपणे 5 ते 8 पिढ्या निर्माण होतात. नर व मादी दहा दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात.

WhatsApp Group Join Now

हंगामानुसार फुलकिडीचा प्रादुर्भाव:

फुलकिडीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. फुलकिडे वर्षभर नवीन पानाला नुकसान करीत असतात. फुलकिड्यांची संख्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त आढळते. तापमान आणि आद्रतेचा परिणाम फुल किड्यांच्या संख्येवर होतो. या महिन्यात जास्तीत जास्त 30 ते 33 अंश सें. व कमीत कमी 6 ते 12 अंश सें. तापमान व 60 ते 70% आद्रता असते.

पिकांचे निरीक्षण व पट्ट्याचा वापर:

या किडीचा सुरुवातीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी संपूर्ण बागेचे निरीक्षण करावे. त्याचप्रमाणे चिकट पट्ट्याचा सापळ्याचा वापर करावा. हे निरीक्षण आठवड्यातून कमीत कमी एक वेळा तरी करावे. प्रादुर्भाव जास्त झाल्यास निरीक्षण वाढवावे. जवळची वस्तू मोठा आकार दाखविण्याऱ्या गोल भिंगाचा वापर केल्यास प्रौढ फुलकिडे तसेच प्रादुर्भावाची लक्षणे आपल्याला सहज डोळ्याने दिसू शकतात.

पिवळ्या व निळ्या रंगाच्या चिकट पट्ट्याच्या सापळ्याचा वापर केल्यास फुलकिडे त्याकडे आकर्षित होऊन त्यावर चिकटतात व त्यापासून चांगले नियंत्रण मिळते. या पट्ट्याचे सापळे झाडाच्या उंच भागावर लावावेत. प्रत्येकी 300 मिटरला एक सापळा या हिशोबाने प्रति एकरी 4 ते 5 सापळे लागतात.

उपाययोजना: Control of thrips on grapes 2025

स्वच्छता: बागेची स्वच्छता करण्याचा मुख्य उद्देश या किडीची उगमस्थाने नष्ट करणे होय. बागेत व बागेबाहेर असलेल्या तणावरती हि कीड आढळते. यात किडीची सुप्तवस्था असल्याकारणाने आधीच्या हंगामातील पिकाचे भाग वेचून गोळा करावेत. यामुळे किडीची सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते.

मशागतीय नियंत्रण: जमिनीची उन्हाळयात एप्रिल छाटणीनंतर खोलवर नांगरट केल्यास किडीचे कोष नष्ट होतात व प्रादुर्भाव कमी होतो.

जैविक नियंत्रण: व्हर्टिसीलियम लेकॅनी किंवा ब्युव्हेरिया बॅसियाना यांचे द्रावण 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास फुलकिड्यांची संख्या कमी होण्यास मदत होते. या द्रावणाची फवारणी तापमान 20 ते 22 अंश सें. व आद्रता 80 टक्क्यांच्यावरती असताना केल्यास चांगला फायदा होतो. फुलकिड्यावरती (थ्रिप्स) उपजीविका करणारे परोपजीवी कीटक क्रायसोपरला कारनिया द्राक्षाच्या बागेत आढळून आले आहेत.

वनस्पतीजन्य कीडनाशके: वेगवेगळ्या प्रकारची निमयुक्त औषधे त्यांच्या प्रमाणानुसार जसे 1 टक्के द्रावण 2.5 मि.ली. प्रति लिटर पाण्यातून किंवा 5 टक्के द्रावण 5 मि.ली. प्रति लिटर पाण्यातून मिसळून फवारावे. फवारणीसाठी 400 लिटर मिश्रण एक एकरासाठी वापरावे.

रासायनिक नियंत्रण: अनेक पिकांवर सापडणाऱ्या फुलकिड्यांचे संपूर्ण नियंत्रण करणे बरेच अवघड असते. त्यासाठी कीटकनाशकाचा वापर करणे अनिवार्य आहे. कीटकनाशकाची फवारणी हि पिकाच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जसे नवीन पानाच्या फुटीच्या वेळी फुलोऱ्याच्यावेळी व मणी सेटिंगच्या वेळी करणे महत्वाचे असते.

परंतु कीटकनाशकाचा अतिवापर केल्याने द्राक्षामध्ये रसायनाचा काही प्रमाणात अंश राहू शकतो. हे टाळण्यासाठी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव ते कीटकनाशकाचा काढणीपूर्व कालावधी पाहून याचा वापर करणे गरजेचे असते.

कीटकनाशकेमात्राकाढणीपूर्व कालावधी
डायमिथोएट 30 ई.सी.1 मिली/ली.100 दिवस
इमिडाक्लोप्रिड 200 एस.एल.0.30 ग्रॅम/ली.60 दिवस
क्लोथीयानिडीन 50 % डब्ल्यू डी.जी.0.12 ग्रॅम/ली.40 दिवस
थायोमिथोक्झाम 25 डब्ल्यू जी0.25 ग्रॅम/ली.40 दिवस
लॅम्बडा-सायलोथ्रीन 5 ई.सी. /एस.एल.0.50 ग्रॅम/ली.30 दिवस
स्पिनोसॅड 45 एस.सी.0.25 ग्रॅम/ली.28 दिवस
इमामेक्टीन बेन्झोबर 05 एस.जी.0.20 ग्रॅम/ली.25 दिवस

टीप: Control of thrips on grapes 2025

  1. वरील सर्व मात्रा जास्त घनतेच्या फवारणीसाठी असून सामान्य फवारणीची घनता 1000 लि. प्रति हेक्टरी आहे.
  2. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी केलेल्या कीटकनाशकाची मात्रा व काढणीपूर्व कालावधीची शिफारस चांगल्या द्राक्षशेतीसाठी केलेला सल्ला असून कोणत्याही फायदेशीर बाबीस पात्र राहणार नाही.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment