शेतकऱ्यांनो, ड्रोन पायलट व्हा; मोफत मिळणार प्रशिक्षण!! Drone Pilot Scheme 2025

Drone Pilot Scheme 2025 नव्या तंत्रज्ञानाच्या युगात युवक-युवतींना आधुनिक कौशल्यानी सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा उपक्रम रबवला आहे.

Drone Pilot Scheme 2025

Drone Pilot Scheme 2025 महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत ड्रोन पायलटसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पुरंदर विमानतळासाठी संमतीने भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मिळतील एकरी 1 कोटी आणि ‘हे’ लाभ!! 

Drone Pilot Scheme 2025 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना मिळणार असून, कृषी, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि चलचित्र निर्मिती अशा क्षेत्रात करिअरची नवी दारे खुली होतील.

WhatsApp Group Join Now

या उपक्रमातून तरुणांना आणि शेतकऱ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे ज्ञान देऊन त्यांना रोजगारक्षम आणि स्वयंरोजगारासाठी सज्ज बनवणे हे प्रमुख उद्धिष्ट आहे.

10 दिवसांचे DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षण Drone Pilot Scheme 2025

या योजनेअंर्गत प्रशिक्षणार्थ्यांना 10 दिवसांचे नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना दिला जाईल.

शेतकऱ्यांना ड्रोन पायलट बनणे फायदेशीर Drone Pilot Scheme 2025

शेतकऱ्यांसाठी ड्रोन पायलट बनणे फायद्याचे आहे, कारण शेतीमध्ये फवारणी, बियाणे पेरणी, आणि पिकांच्या आरोग्याचे निरीक्षण यांसारख्या कामांसाठी ड्रोनचा वापर होतो.

ड्रोन पायलट होण्यासाठी, तुम्हाला DGCA-मान्यताप्राप्त RPTO मधून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे आणि अधिक कार्यक्षम होते, ज्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो.

WhatsApp Group Join Now

या परवान्यामुळे खालील क्षेत्रांत नोकरी व व्यवसायाच्या संधी निर्माण होतील

कृषी (Precision Farming)

बांधकाम क्षेत्र

सर्वेक्षण व नकाशांकन

आपत्ती व्यवस्थापन व छायाचित्रण

चलचित्र निर्मिती (Drone Cinematography)

उपलब्ध अभ्यासक्रम: Drone Pilot Scheme 2025

अमृत संस्थेच्या या प्रशिक्षणात एकूण 8 प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील

मध्यम व लघु वर्गातील ड्रोन पायलट प्रशिक्षण

प्रशिक्षक प्रशिक्षण (Trainer Program)

कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर

आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन तंत्रज्ञान

नकाशांकन व सर्वेक्षण

ड्रोन देखभाल व दुरुस्ती

ड्रोन छायाचित्रण व व्हिडीओ निर्मिती

व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रशिक्षण

प्रत्येक प्रशिक्षण तुकडीत केवळ 15 उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.

प्रशिक्षण केंद्र Drone Pilot Scheme 2025

हे प्रशिक्षण खालील आठ जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जाणार आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, रायगड, कोल्हापूर, आणि परभणी येथे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

पात्रता अटी: Drone Pilot Scheme 2025

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.

हि योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींसाठी आहे. या प्रवर्गात ब्राम्हण, मारवाडी, माहेश्वरी, जैन, गुजराती, सिंधी, राजपूत, ठाकूर, पाटीदार आदी समाजांचा समावेश आहे.

अर्ज प्रक्रिया: Drone Pilot Scheme 2025

इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

यानंतर अर्जाची छापील प्रत व पुढील कागदपत्रे बीडमधील अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड येथील अमृत कार्यालयात सादर करावे.

ओळखपत्र (आधार / पॅन)

अधिवास प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

फिटनेस प्रमाणपत्र

शैक्षणिक कागदपत्रे

महत्वाच्या तारखा

अर्जाची अंतिम तारीख: 5 नोव्हेंबर 2025

पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण: 10 ते 20 नोव्हेंबर 2025

जागा मर्यादित, त्यामुळे पुढील तुकडीसाठीही लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

संपर्कासाठी: Drone Pilot Scheme 2025

अधिक माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

विशाल जोशी, जिल्हा व्यवस्थापक, अमृत बीड

दिगंबर जोशी, उपव्यवस्थापक

अमृत मित्र: सुमित धिरडे, चिंतेश जोशी

शासनाचा हा अभिनव उपक्रम केवळ मोफत प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून, तो युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून रोजगाराच्या नव्या दिशा खुल्या करणारा प्रयत्न आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment