Shetkari Karjmafi 2025 राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे.

Shetkari Karjmafi 2025 एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट, अजून किती दिवस जोरदार पावसाचा अंदाज!!
Shetkari Karjmafi 2025 सह्यादी अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Shetkari Karjmafi 2025 मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे. कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही. म्हणून आता 32 हजार कोटींच्या पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे.
पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून 32 हजार कोटी रुपये मदत दिली जात आहे. आत्तापर्यंत 8000 कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत.
या आठवड्याअखेर 18,500 कोटी रुपये दिले जाणार असून 15 दिवसात 90 टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता. पण हि तात्कालिक बाब आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात अली आहे.
Shetkari Karjmafi 2025 कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि कर्जमाफी कशी करण्याची याबाबत एप्रिलपर्यंत समिती शिफारस करेल शिफारशीच्या आधारावर पुढच्या तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करणार.
Shetkari Karjmafi 2025 नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक असून रब्बीची पेरणी करता यावी, म्हणून आता 32 हजार कोटींच्या पॅकेज वितरणास प्राधान्य आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |