केळी आणि पपईच्या फळबागेतील तणनियंत्रण!! Weed Control 2025

Weed Control 2025 तणे हे उत्पादन वाढीतील शेतकऱ्यांचे खूप मोठे शत्रू आहेत. महागडी बियाने खते घालून उत्पन्न वाढविण्यासाठी धडपड केली जाते पण विविध प्रकारचे तण आपणास आपल्या परिश्रमांचं फळ मिळू देत नाही. त्यामुळे वेळीच तणांचा बंदोबस्त करणे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरत.

Weed Control 2025

WhatsApp Group Join Now

केळी पिकांसाठी तणनियंत्रण: Weed control 2025

तणनाशकाचे तांत्रिक नाव: डायुरॉन

उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नाव: डायुरेक्स

केव्हा आणि कसे वापरावे: उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर वापरता येते. केळी पिकाच्या पानांवर तसेच खोडावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

कारले लागवड तंत्रज्ञान!!

तणनाशके तांत्रिक नाव: ग्लायफोसेट

WhatsApp Group Join Now

उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नाव: ग्लायसेल

केव्हा आणि कसे वापरावे: केळी लागवडीपूर्वी शेत तयार करतांना वापर करावा. शेतास पाणी देऊन तण उगवून घ्यावे उगवून आलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. अधिक परिणामांसाठी ग्लायफोसेट पाण्यात मिसळण्याच्या अगोदर अमोनियम सल्फेट पाण्यात टाकून मिसळून घ्यावे गवत 7 ते 14 दिवस कापून काढू नये. केळी पिकाच्या पानांवर तसेच खोडावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

तणनाशकाचे तांत्रिक नाव: ऑक्सिफ्लोरफेन

तणनाशकाचे व्यापारी नाव: गोल

केव्हा आणि कसे वापरावे: रुंद पान वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त केळी पिकाच्या पानांवर तसेच खोडावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

तणनाशकाचे तांत्रिक नाव: पराक्वेट

तणनाशकाचे व्यापारी नाव: ग्रामोक्झोन

केव्हा आणि कसे वापरावे: केळी पिकांतील सर्वच तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. केळी पिकाच्या पानांवर तसेच खोडावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

Weed control तणनाशकांचा पाहिजे तिथे आणि पाहिजे तसाच वापर करावा. अति वापराने तानाशके जमिनीवर वाईट परिणाम घडवून आणतात. ज्यामुळे जमिनीचे आरोग्य खराब होते व पुढील पिकास ते अपायकारक ठरते त्यामुळे तणनाशके कमीत कमी प्रमाणात व गरजेनुसारच वापरावीत त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी इतर पारंपरिक पूरक उपाय करावेत. उदा. आच्छादनाचा वापर हिरवळीचे खत म्हणून बोरू घेणे उथळ मशागत (वरखणी रोटाव्हेशन) निंदण इ. त्याचप्रमाणे परिबंधात्मक उपायांतर्गत शेताचा निचरा स्वछता कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. जेणेकरून तणनाशकांचा कमीत कमी वापर करून आपली केळीची बाग तणरहित पातळीवर ठेवणे शक्य होईल.

पपई पिकासाठी तणनियंत्रण: Weed control 2025

पपईच्या रोपांची पुर्नलागण केल्यानंतर बागेतील काही कामे प्रथमदर्शनी क्षुल्लक वाटली तरी भरघोस पीक येण्याच्या दृष्टीने त्याचे महत्व फार असते. बागेत गवत आणि झाडेझुडपे वाढल्यास ती पपईच्या झाडाशी स्पर्धा करून जमिनीतील पोषणद्रव्ये बऱ्याच प्रमाणात शोषून घेतात. विशेषतः झाडे लहान असताना विस्ताराला अडथळा येऊन ती कायमची कमजोर बनतात. मुळ्याना नीट हवा मिळू शकत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात. शिवाय गळतात हि हानी टाळण्यासाठी बागेतील गवत व झाडेझुडपे वारंवार काढून टाकण्याची काळजी घेतली पाहिजे. झाडे लावल्यानंतर 15-20 दिवसांनी निंदणी करावी.

पपईच्या झाडाच्या मुळ्या जमिनीत उथळ वाढतात. म्हणून खोल आंतरमशागत कधीही करू नये. आंतरमशागत हलकी व वारंवार करावी. वर्षातून दोन वेळा उभी आडवी हलकी नागंरणी व वखरणी करावी. जमीन भुसभुशीत ठेवल्याने फळांची प्रत व उत्पादन सुधारते. आळ्यातील गवत खुरप्याने निंदून घ्यावे. पावसाळ्यात हिरवळीचे खत पीक पेरणे व तागाची पेरणी करून फुलावर येण्याअगोदर जमिनीत गाडून टाकणे चांगले ठिबक सिंचन वापरल्यास तणे येण्याचे वाढीचे प्रमाण कमी असते.

तणनाशके वापरावयाची झाल्यास झाड 1 मीटर उंच झाल्यावर ग्रामोक्झोनसारखे स्पर्शजन्य तणनाशक 200 लिटर पाण्यात 1 लिटर या प्रमाणात मिसळून साधे नोझल न वापरता डब्लूएफएन 78 किंवा डब्लूएफएन 562 नोझल वापरून फवारा झाडांच्या कोणत्याही भागावर उडणार नाही अशी दक्षता घेऊन फक्त तणांवर मारावा यामुळे लेव्हल हरळीसारखी एकदल तणे आटोक्यात येतात.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment