डाळिंबावरील तेलकट डाग रोग नियंत्रण तंत्रज्ञान!! Pomegranate Disease Control Technology 2025

Pomegranate Disease Control Technology 2025 महाराष्ट्र राज्यातील अवर्षण प्रवण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले डाळींब सध्या वेगवेगळ्या अडचणीतून जात आहे. डाळिंबावरील विविध समस्यांपैकी तेलकट डाग रोग हि एक मोठी समस्या आहे.

Pomegranate Disease Control Technology 2025

Pomegranate Disease Control Technology 2025 तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पानांवर फुलांवर व फळांवर दिसून येत आहे. हा रोग काही प्रमाणात झाडांच्या फांद्यावर सध्या दिसून येत आहे. डाळिंब शेतीचे अनुभव आणि माहिती नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे रोगांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हे दोन साखर कारखाने देणार 3400 रुपयांनी पहिली उचल!!

Pomegranate Disease Control Technology 2025 परंतु अभ्यासपूर्वक व योग्य नियोजन करून डाळिंब शेती केल्यास या पिकातील समस्या कमी होत आहे. विविध समस्यांपैकी डाळिंबावरील तेलकट डाग रोगाबाबत सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे. या लेखात दिलेल्या माहितीचा वापर करून आपली बाग तेलकट डाग रोगमुक्त ठेवून डाळींबाचे उत्पादन वाढवावे.

WhatsApp Group Join Now

रोगाचे लक्षणे: तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने फुले आणि फळांवर होतो हा रोग जिवाणू जन्य असून झॅन्थोमोनस अक्झॉनोपोडीस पुनिकी या जिवाणूमुळे होतो.

पान: सुरुवातीस पानावर तेलकट किंवा पानथळ डाग पडतात. हे डाग कालांतराने काळपट होतात डागाभोवती पिवळे वलय दिसते. उन्हात हे डाग बघितले कि तेलासारखे चमकतात डाग मोठा झाला कि पाने पिवळी पडून गळून पडतात.

फुल: फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग पडतात आणि हे डाग फुल व कळीसोबत हळूहळू वाढतात.

खोड: खोडावर आणि फांद्यांवर सुरुवातीला पाणथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी होतात खोडावर या डागाने खाच तयार होते व तेथून झाड मोडते तसेच फ़ांद्यांवर डागाची तीव्रता वाढली कि फांद्या डागांच्या येथून मोडतात.

फळ: फळावर सुरुवातीला पाणथळ तेलकट डाग दिसतात कालांतराने हे डाग तपकीरी काळपट पडतात फळांवर लहान डाग एकत्र आले कि मोठ्या डागात रूपांतर होते या डागांमुळे फळांवर आडवे उभे तडे जातात फळांची प्रत पूर्णपणे खराब होते. तडे मोठे झाले कि, फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात.

WhatsApp Group Join Now

रोगास अनुकूल बाबी:

  • रोगग्रस्त गुटी कलमांचा वापर करणे
  • एक गाव एक बहार नसते बागेत किंवा शेजारच्या बागेत तेलकट डाग असणे.
  • बागेत अस्वच्छता तणांची मोठ्या प्रमाणावर वाढ होणे.
  • झाडांची गर्दी खेळत्या हवेचा तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव असणे.
  • ढगाळ व पावसाळी हवामान वादळी पाऊस आणि वातावरणातील आद्रता जास्त असणे.

टिपणी:

इतर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारसी प्रमाणे नियंत्रण करावे.

उत्पादन वाढीसाठी आणि निरोगी बागेसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे करावे.

तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी करावयाच्या महत्वाच्या बाबी

बागेतील तेलकट डाग रोग ग्रस्त अवशेष झाडूने झाडून गोळा करून जाळावेत.

झाडावरील रोगग्रस्त फांद्या रोगट भागापासून 6 इंच खालून कापून नष्ट कराव्यात.

झाडाच्या खोडावर रोगाचा प्रादुर्भाव असेल तर संपूर्ण झाड काढून नष्ट करावेत.

जमिनीवर बांधावर दोन टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा 4 % कॉपर डस्टची धुरळणी करावी किंवा 33% ब्लिचिंग पावडरची भिजवन/फवारणी करावी.

बागेत तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तर बागेला 3-12 महिने पर्यंत विश्रांती द्यावी.

निरोगी बागेसाठी सेंद्रिय अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

आंबे बहरात गारपीट व अवकाळी पावसामुळे तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वाढल्याचे दिसून येत आहे. म्हणून डाळिंबाचा आंबे बाहेर घेणे धोक्याचे ठरत आहे.

बागेत तेलकट डाग रोगाचा प्रदुसरभाव दिसल्यास शिफारशी प्रमाणे ब्रोमोपॉल-250 पीपीएम कॉपर ऑक्सिक्लोडाईड 0.25 % कॉपर हायड्रोक्लोराइड 0.16 % बोर्डोमिश्रण 0.4 ते 1 % कॅप्टन 0.25 % स्ट्रेप्टोसायक्लीन 250 पीपीएम + बावीसाठीं 0.1 % ने फवारावेत.

बागेत गोमूत्र + शेणखत यांचा स्लरीच्या माध्यमातून वरचेवर वापर करावा.

गावपातळीवर नियंत्रण उपाययोजना करणे तेलकट डाग रोगनियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल.

बागेतील सूत्रकृमींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवावा.

बागेत जैविक खतांचा/जैविक घटकांचा वापर वाढवावा. (उदा. ऍझोटोबॅक्टर (पी.एस.बी.) स्फुरद विरघळणारे जिवाणू, पालाश विरघळणारे जिवाणू (के.एस.बी.) ट्रायकोडर्मा, पेसिलोमायसिस इत्यादी.)

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment