लसूण लागवड!! Planting Garlic 2025

Planting Garlic 2025 कंदवर्गीय पिकामध्ये लसूण हे महत्वाचे पीक आहे. रोजच्या आहारात मसाले तयार करण्यासाठी तसेच लोणचे, सॉस, चटण्या, पापड, तयार करताना लसणाचा वापर केला जातो.

Planting Garlic 2025

Planting Garlic 2025 लसनामधील विविध औषधी गुणधर्मामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये लसणाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

पुढील पाच दिवस राज्यातील या भागात विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस पडणार!!

लसूण हे महतवाचे पीक असून त्याची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. लसणामध्ये औषधी गुणधर्म आहेत खोकला फुफ्पूस आणि पोटाचे विकार कान व डोळ्याचे त्रास यावर लसूण गुणकारी औषध आहे.

WhatsApp Group Join Now

हवामान आणि जमीन: Planting Garlic 2025

लसूण हे हिवाळी रब्बी हंगामात बांधणारे पीक आहे. लसणाचे पीक विविध हंगामात घेतले जाते. अतिऊष्ण किंवा अतिथंड हवामान या पिकाला मानवत नाही. समशीतोष्ण कोरडे हवामान दिवसाची लांबी अधिक भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी लसणाचे पीक चांगले वाढते. पाकळ्या लावल्यानंतर पानांची वाढ 45 ते 50 दिवसात होते या काळात रात्रीचे तापमान 10 ते 15 अंश सेल्सियस आणि दिवसाचे तापमान 25 ते 28 अंश सेल्सियस दरम्यान लागते 70 ते 80 टक्के आद्रता आणि 10 ते 12 तास सूर्य प्रकाश असावा.

पुणे, नाशिक भागात अशा प्रकारचे हवामान असल्यामुळे त्या ठिकाणी लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. लसणाच्या लागवडीसाठी जमीन भुसभुशीत आणि मध्यम कसदार असावी मध्यम काळी सोपी पाण्याचा चांगला निचरा होणारी भुसभुशीत जमीन निवडावी.

सुधारित वाण: Planting Garlic 2025

गोदावरी: लसणाच्या या जातीचा गड्डा मध्यम आकाराचा असून रंग जांभळट पांढरा आणि स्वाद तिखट असतो. गड्ड्यातील पाकळ्यांची संख्या सरासरी 24 पर्यंत असते. लागवडीपासून 140 ते 145 दिवसात तयार होते.

श्वेता: या जातीचा गड्डा मोठा असून रंग पांढराशुभ्र आणि स्वाद तिखट असतो. पाकळ्यांची संख्या सरासरी 26 पर्यंत लागते. लागवडीपासून 130 ते 135 दिवसात तयार होते. हेक्‍टरी उत्पन्न 10 टन मिळते.

ॲग्रीफाउंड व्हाईट: या जातीचे कंद मोठ्या आकाराचे, घट्ट, पांढरे, तिखट, पाकळ्यांची संख्या 20 ते 25 पाकळ्या मोठ्या, जाड, कालावधी 150 ते 160 दिवस. हेक्टरी उत्पन्न 13 ते 14 मिळते. पाकळ्यांचा आणि गड्ड्यांचा आकार मोठा आणि रंग शुभ्र असल्यामुळे निर्यातीस योग्य असून ही जात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

यमुना सफेद-3: या वाणाचे कंद शुभ्र पांढऱ्या रंगाचे मोठ्या आकाराचे कळ्यांचा रंग पांढरा हेक्टरी उत्पन्न 17 ते 20 टन मिळते. लागवडीपासून 130 ते 140 दिवसात तयार होते. निर्यातीस योग्य वाण.

हंगाम आणि लागवडीचे अंतर:

महाराष्ट्रात लसणाची लागवड रब्बी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात करतात. थंडी वाढायच्या आधी लागवड होऊन पात वाढीला लागले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात ऑक्टोबर ही लागवडीची योग्य वेळ आणि फेब्रुवारी मार्च ही काढणीची योग्य वेळ आहे.

लागवड पद्धती आणि खत व्यवस्थापन:

लसणाची लागवड सपाट वाफ्यात करतात. मोठ्या गड्ड्याच्या लसणाच्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर 15 सेंटीमीटर आणि दोन रोपांतील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावे. मध्यम गड्ड्याच्या लसणाच्या जातीसाठी लागवडीचे अंतर 10*7.5 सेंटीमीटर ठेवावे. लसणाची लागवड कुड्या किंवा पाकळ्या टोकूण करतात. लागवडीची खोली 2 ते 3 सेमी ठेवावी.

लसणाच्या लागवडीसाठी जमिनीची योग्य मशागत करणे आवश्यक्य आहे. नांगरणी आणि कुळवणी करून शेत सपाट आणि भुसभुशीत करून घ्यावे. मशागत 10 ते 15 सेंटीमीटर खोल करावी. शेत तयार करताना 20 टन शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे.

उरलेल्या नत्राची मात्रा दोन भागात विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी व दुसरी मात्रा 45 ते 50 दिवसांनी द्यावी. जमिनीच्या मगदूरानुसार सपाट वाफे तयार करावेत. लागवड सरळ ओळी मध्ये कोरड्यात करून लगेच पाणी द्यावे. लागवड करताना तणनाशकांचा वापर केल्यास फायदा होतो.

लागवडीसाठी लसणाचे एकसारखे गड्डे निवडून मोठ्या पाकळ्या लागवडीसाठी वापरावे. लसणाच्या गोदावरी आणि श्वेता या जातीची लागवड करावयाची असल्यास हेक्टरी 500 किलो बियाणे वापरावे तर ॲग्रीफाउंड व्हाईट या जातीची निवड केल्यास हेक्टरी 700 किलो व यमुना सफेद-3 चे हेक्टरी 800 किलोपर्यंत बियाणे वापरावे. कारण या जातीच्या पाकळ्या आकाराने मोठ्या असतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन लागवडीसाठी जमीन तयार करताना दर हेक्टरी 30 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळावे. तसेच लागवडीपूर्वी हेक्‍टरी 100 ते 125 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. नत्राची उरलेली अर्धा मात्रा लागवडीनंतर एक महिन्यांनी वरखत म्हणून द्यावी.

लसणाची मुळे जास्त खोलवर जात नसल्यामुळे तसेच लसणाचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे पिकाला जास्त प्रमाणात पाणी देणे, पाण्याचा ताण देणे आणि वाफ्यामध्ये पाणी साचू देणे या गोष्टी टाळावेत. योग्य उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे. म्हणून लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे. दुसरे पाणी त्यानंतर 3-4 दिवसांनी द्यावे आणि त्यानंतर पुढच्या पाण्याच्या पाळ्या 8 ते 10 दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदूरानुसार द्याव्यात.

आंतरमशागत आणि आंतरपिके: Planting Garlic 2025

लसणाच्या चांगल्या वाढीसाठी तणांचे नियंत्रण वेळेवर करावे. पीक वाढीच्या सुरुवातीस 1.5 महिन्यांत तणे मोठ्या प्रमाणावर वाढतात. म्हणून दोन वेळा खुरपणी करून तणांचे नियंत्रण करावे. नंतर 45 ते 50 दिवसांनी खुरपणी करावी. गड्डे वाढायला सुरुवात झाल्यास कंदांना इजा होण्याची शक्यता असते म्हणून उशिरा खुरपणी करू नये. लागवड केल्यानंतर 2.5 महिन्यांपर्यंत म्हणजे गड्डे भरायला सुरुवात होण्याच्या काळात पिकाला मातीची भर द्यावी. त्यामुळे गड्ड्यांची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढते. लसूण पिकामध्ये वाफ्याच्या वरंब्यावर कोबी, कोथिंबीर, किंवा मुळा यासारखी कमी कालावधी येणारी पिके घेता येतात. लसून पिक आंतरपीक म्हणून ऊस, मिरची, फळबाग या पिकामध्ये घेता येते.

काढणी उत्पादन आणि विक्री: Planting Garlic 2025

पीक साधारणपणे 130 ते 150 दिवसात काढणीला येते. लसणाची पात पिवळी पडून सुकण्यास सुरुवात झाल्यावर पीक काढणीला तयार झाले असे समजावे. लसूण पूर्ण पक्व झाल्याशिवाय काढणी करू नये, तसेच पक्व झालेला लसून अधिक काळ शेतात राहू देऊ नये. गड्डे उपटून काढणी करावी. जमीन कडक असल्यास कुदळीने अथवा लाकडी नांगराने जमीन मोकळी करून गड्डे वेचून काढावेत. पात हिरवी असल्यास शेतात 4 ते 6 दिवस ओळीत पसरवून आणि गड्डे पातीने झाकले जातील अशा प्रकारे ठेवून सुकू द्यावेत.

नंतर आकाराप्रमाणे निवड आणि प्रतवारी करून जुड्या बांधून ठेवाव्यात अथवा 3 सेमी. मुळाचा भाग ठेवून पात कापून साठवणी करावी. 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त व्यासाचे मोठे गड्डे, 2.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त व्यासाचे मध्यम आणि गड्डे 1-2.5 सेंटीमीटर व्यासाचे लहान गड्डे अशा प्रकारे प्रतवारी करावी. फुटलेले, सडके किंवा इजा झालेले गड्डे वेगळे काढून टणक निरोगी आणि निवड केलेले गड्डे साठवावेत. गड्ड्यांच्या पॅकिंगसाठी 40 ते 60 किलोच्या जाळीदार पिशव्या वापराव्यात योग्य लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास लसणाचे उत्पादन हेक्टरी 10 ते 12 टणांपर्यंत मिळते.

साठवण आणि निर्यात: Planting Garlic 2025

वर्षभर पुरवठा होण्यासाठी लसणाची साठवण करावी लागते. लसणाच्या वाळलेल्या प्रमाणे पातीसहित जुड्या बांधून साठवण करता येते. जुड्या टांगून ठेवाव्या किंवा रचून ठेवाव्यात. पात कापून, निवड करून जाळीदार पिशव्यांमध्ये लसणाची साठवण करता येते. साठवण करण्याच्या ठिकाणी हवा खेळती राहणे आवश्यक आहे. तसेच साठवणी पूर्वी लसूण चांगला वाळलेला असावा. साठवणीत प्रामुख्याने वजनात घट होते.

भारतात काही प्रमाणात लसणाची निर्यात होते. निर्यातीसाठी मोठ्या आकाराच्या मोठ्या कळ्यांच्या पांढऱ्या शुभ्र गड्ड्यांना मागणी आहे. निर्यातीसाठी प्रतवारी करून लसूण कार्डबोर्डच्या खोक्यांमध्ये पॅकिंग करून पाठवण्यात येते. लसणाच्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांची ही निर्यात होते. निर्यातीसाठी मोठ्या कळांच्या पांढऱ्या रंगाची G-282 सारख्या वानांची लागवड वाढवण्यात येत आहे.

बीजोत्पादन: Planting Garlic 2025

लसणाची लागवड कळ्यांपासून करता येत असल्याने बीजोत्पादनासाठी वेगळे काही लागत नाही. बीजोत्पादनासाठी दोन वानांमध्ये मिश्रण होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. तसेच निवड व प्रतवारी करून एकसारखे जातिवंत कंद वेगळे साठवण बेणे म्हणून वापरता येते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment