Management of Animals 2025 भारतामध्ये प्रामुख्याने तीन ऋतू आढळून येतात. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा यापैकी पावसाळा व हिवाळा या दोन्ही ऋतू जनावरांची उत्पादन क्षमता चांगली असते तसेच भरपूर प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता असल्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते. अलीकडेच भारतीय कृषी अनुसंधान संशोधन परिषद अखत्यरित हवामान बदलाचा पशु उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची माहिती देण्यात आली आहे.

Management of Animals 2025 त्यानुसार तापमान आद्रता दर्शक वरून जनावरांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामाची तपासणी केली जाते. तापमान आद्रता दर्शक 65-72 च्या दरम्यान असल्यास जनावर सामान्य अवस्थेत राहतात जर हा दर्शकांक कमी किंवा जास्त झाला तर जनावरांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. सामान्य तापमानापेक्षा जर वातावरणातील तापमान वाढले किंवा कमी झाले तर वितातील गाईच्या अथवा म्हशीच्या दुग्ध उत्पादनावर याचा वाईट परिणाम होतो.
केळीसाठी ठिबक सिंचनातून पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन!!
Management of Animals 2025 पहिल्या वितातील गाई किंवा म्हशी दुग्ध उत्पादन 10.30% कमी देतात. याउलट दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील गाई अथवा म्हशी 5-20% दूध कमी देतात. जनावरांना देण्यात येणाऱ्या खाद्याचे रूपांतर हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रण करण्यासाठी खर्च केले जाते जनावरे सर्वसाधारण 18 ते 27 अंश सेल्सियस तापमानामध्ये निरोगी आयुष्य जगतात.

थंड हवेचा जनावरांच्या चयापचय क्रियेवर व शरीरावर होणारा परिणाम:
- जास्तीत जास्त ऊर्जा तयार करण्यासाठी वाळलेला चारा अतिप्रमाणात द्यावा लागतो.
- रवंथ क्रिया वाढते.
- पचनक्रिया सुधारते.
- चयापचय दर वाढल्यामुळे वजन कमी होते.
- शरीरातील निर्माण होणारी ऊर्जा शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी खर्च केली जाते. यामुळे रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन जनावरे हवामानातील bdlamu;ए जास्त प्रमाणात आजारी पडतात.
- हिवाळ्यात जनावरे जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीरात घेतात.
- हार्मोन्सच्या कार्यक्षमतेत बदल होतात.
- वाळलेला चारा कमी प्रमाणात शरीरात पचवला जातो.
सर्वसाधारण वातावरण (तापमान) आणि शरीरात ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी द्यावयाचे खाद्य
| सर्वसाधारण तापमान | जास्तीच्या ऊर्जेची गरज | जास्तीचे गवत | जास्तीचे धान्य |
| -1 | 0% | 0 | 0 |
| -12 | 20% | 1.6-1.8 | 0.9-1.0 |
| -23 | 40% | 3.2-3.6 | 1.8-2.3 |
प्रतिबंधात्मक उपाय: Management of Animals 2025
जनावरांच्या शरीरात निर्माण होणारी ऊर्जा हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरली जाते. यामुळे जनावरांच्या वजनावर याचा अनिष्ट परिणाम होतो. यासाठी हिवाळ्यात जनावरांना जास्त प्रमाणात खाद्य द्यावे.
जनावरांच्या गोठ्याचे तापमान नियंत्रित राखणे गोठ्यात बल्बची सुविधा करणे (40 व्होल्ट) जेणेकरून गोठ्यातील तापमान 2-4 अंश सेल्सियस वाढेल.
गोठ्यातील आद्रतेचे प्रमाण कमी करावे यासाठी गोठा धुतल्यानंतर जमिनीवर पाणी राहणार नाही याची काळजी घेणे. गोठा स्वछ व कोरडा ठेवावा.
थंडी वाऱ्यापासून जनावरांचे रक्षण करावे गोठ्याच्या बाजूला अशोक निलगिरी सुबाभूळ शेवगा हादगा अशा प्रकारची झाडे लावावीत. त्यामुळे थंड वारे गोठ्यात सरळ प्रवेश करू शकत नाही.
जनावरांना थंडीत जमिनीवर अच्छादन करून द्यावे यासाठी प्रामुख्याने तांदूळ किंवा गव्हाचा भुसा किंवा कडबा वापरावा. हे अच्छादन दररोज बदलावे व वापरलेले आच्छादन शेतात खत म्हणून वापरावे.
जनावरांना स्वच्छ व कोरडे ठेवावे. विद्युतरोधक चे काम करते यामुळे जनावरे हिवाळ्याचा ताण सहन करू शकतात.
सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात जनावरांना मिळेल याची व्यवस्था करणे. जनावरांचे गोठे सकाळी व रात्री गोणपाटाने झाकावेत. दुपारी जनावरांना स्वच्छ सूर्यप्रकाशात चरावयास नेणे.
हिवाळ्यात जनावरांना कोमट पाणी प्यावयास देणे.
जनावरांना जास्तीत जास्त प्रमाणात वाळलेला चारा खाण्यास देणे.
तीन आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या वासरुंना ब्लॅंकेट ने पांघरावे कारण तीन आठवड्यापर्यंत चारा किंवा पूरक खाद्य खात नाहीत यामुळे त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होत नाही.
हवामान बदलाशी जनावरांनी जुळवून घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडता येऊ शकतात. हिवाळा ऋतूत जुळवून घेण्यासाठी जनावरांचा चयापचय दर वाढवावा तसेच जनावरांच्या शरीरावरील कातडीची जाडी वाढली पाहिजे.
हिवाळ्यात दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते. याउलट प्रोटीन व स्निग्धतेत्तर घन घटकाचे प्रमाण वाढते.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |