Drone Subsidy 2025 कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत 2024-25 साठी ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटकासाठी 100 ड्रोन चा राज्याचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी व पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येतो असे कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या (मानव विरहित वायू यान) या वापरास पुरेशा संधी आहेत. विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्य, विद्राव्य खते फवारणी या बाबी व्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामासाठी देखील वापर करता येऊ शकतो. ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते.
त्यामुळे केंद्र शासन पुरसकृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजने अंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था आदींना 40 टक्के अनुदान रक्कम 4 लाख, कृषी व पदवीधर 50 टक्के अनुदान रक्कम 5 लाख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व सीमांतिक/महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान रक्कम 5 लाख, सर्वसाधारण शेतकरी 40 टक्के अनुदान रक्कम 4 लाख मिळू शकेल.Drone Subsidy 2025
कृषी यांत्रिकीकरण उप अभियान काय आहे Drone Subsidy 2025 ?
- पिकावर रोग आल्यास किंवा रोग होऊ नये म्हणून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना भरमसाठ खर्च येतो.
- केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत ड्रोन चा समावेश करण्यात आला आहे.

कृषी यांत्रिक उप अभियानाचे उद्दिष्टे
- कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.
- कृषि क्षेत्रात ऊर्जा वापराचे प्रमाण वाढविणे.
- पीक रचनेनुसार कृषि अवजारे उपलब्ध करुन देणे.
- भाडेतत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा केंद्र उभारणे.
- शेतमजुरांच्या समस्येवर मात करणे.
- मशागतीचा खर्च कमी करुन उत्पादन खर्चात बचत करणे.
- शेतीकामाचा वेळ वाचविणे व पर्यायाने कृषि उत्पादनात वाढ करणे.
शेतकऱ्यांना करता येणार ड्रोन द्वारे फवारणी Drone Subsidy 2025
पिकावर फवारणी करणे हे अतिशय मेहनतीचे काम आहे. अनेकदा मोठ्या पिकामध्ये, मोठ्या क्षेत्रावर किंवा पाणी साचलेले शेतात फवारणी करणे खूपच जीकिरीचे असते.
Drone Subsidy 2025: यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळही खर्च होतो. शिवाय काही कीटकनाशकामुळे मानवी जीवितास धोका उद्भवू शकतो. अशा परिस्थितीत ड्रोनद्वारे फवारणी करणे सोपे झाले आहे.
शेतीतील कृषी यांत्रिकीकरणाचे महत्त्व आणि परिणाम
कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरण म्हणजे मूल्य साखळीत अन्नाची प्रभावीता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि प्रक्रियांचा वापर. हे लहान सोलर ड्रायर आणि तांदूळ थ्रेशर्सपासून ट्रॅक्टर आणि हाय-टेक ड्रोन-सक्षम माती परीक्षणापर्यंत आहे. लघुधारक शेतीच्या भविष्यातील विकास आणि वाढीची गुरुकिल्ली, यांत्रिकीकरणामुळे कृषी आणि अन्न प्रणालीमधील विविध भागधारकांना फायदा होऊ शकतो.(Drone Subsidy 2025)
- यामुळे वाढत्या हवामानातील बदल आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जमीन वेळेवर तयार करणे सुनिश्चित होते.
- हे अशा जगात उत्पादन खर्च कमी करते जेथे श्रमांची किंमत सतत वाढत आहे.
- हे कापणीपूर्व, काढणी आणि काढणीनंतरच्या अधिक कार्यक्षम पद्धतींच्या मदतीने नुकसान कमी करते.
- यामुळे अल्पभूधारकांचा बाजारपेठेतील वाटा वाढतो आणि रोजगाराच्या नवीन संधी आणि वैविध्यपूर्ण आजीविका निर्माण होते, ज्यामुळे ग्रामीण रोजगार अधिक आकर्षक होतो.
- हे खर्च कमी करते, उत्पन्न वाढवते आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करते.
- हे मशीनची कार्यक्षमता आणि जीवन चक्र सुधारते.
- यामुळे कृषी उत्पादकता वाढते आणि गरिबी कमी होते.
- हे टिकाऊपणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करते आणि टिकाऊपणाचे उपाय वाढवते.
कोणाला मिळणार अनुदान Drone Subsidy 2025?
स्वतः शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था यांना 40% म्हणजे चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषी व तत्सम पदवीधर यांना 50 टक्के म्हणजे 5 लाख रुपये अनुदान दिले जाईल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व सीमांतक महिला शेतकरी यांना 50 % म्हणजेच 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.Drone Subsidy
शेतीतील कृषी यांत्रिकीकरण गरज व फायदे
भारतीय शेतीत वापरात येणारी पारंपारिक ऊर्जा संसाधने यांचा दर वाढत असून, तो शेतक-यास परवडणारा नसून ऊर्जा किंवा शक्ती वापर दर हा फारच कमी आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ न होता येणारा खर्च हा जास्त आहे. त्यामुळेच सध्य परिस्थतीत भारतीय शेतीत मोठया प्रमाणात योग्य आधुनिक शेती औजारे व यंत्रे वापरणे गरजेचे आहे. सदर यंत्रांच्या वापरामुळे शेतीमध्ये उर्जेचा वापर दर वाढून उत्पादन वाढ व शेती खर्च कमी होण्यास मोठया प्रमाणात मदत होईल. शेती यंत्रे व औजारे वापर दर वाढविण्यासाठी आपणास तंत्रज्ञान प्रसार व प्रचार कार्य मोठया प्रमाणात हाती घेण्याची गरज आहे.Drone Subsidy 2025
- शेतीमध्ये यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बऱ्याच मोठया प्रमाणात बचत होते.
- पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर होतात.
- खते, बियाणे आणि किटकनाशकांचा वापर कार्यक्षमतेने होतो.
- एकूण मजुरांवरील खर्च कमी होतो.
- पेरणी आणि काढणी वेळेवर करता येते.
- शेतीतील कामाचा वेग वाढतो.
- मजुरा अभावी कामांचा खोळंबा होत नाही.
- कामाची गुणवत्ता वाढते.
- शेतमालाची प्रत सुधारते.Drone Subsidy 2025
- मजुर किंवा जनावरांच्या तुलनेत कमी खर्चात आणि कमी वेळात कामे पूर्ण होतात.
- अन्नधान्याची काढणी आणि मळणी व त्यानंतरची हाताळणी योग्य तऱ्हेने करता येत असल्यामुळे त्यांची नासाडी कमी होते.
- वर्षातून एकाच जमीनीवर एकापेक्षा जास्त वेळा पीक घेणे शक्य होऊ लागल्याने दोन हंगामातील कमीत कमी उपलब्ध वेळात शेताची मशागत करणे शक्य होते.
- यांत्रिकीकरणामुळे उत्पादनात वाढ होते.
- कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होतो.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होऊन सर्वांगिण विकास व सक्षमीकरण होते.
जुलै 2025 मध्ये हळद लागवड करताय ? हळद लागवड कशी करावी पहा संपूर्ण माहिती
अर्ज कोठे व कसा करावा ?
सन 2024-25 मध्ये ड्रोन ही उपकरण शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सवलतीच्या दरात मागवण्यात येणार आहे. यासाठी महाडिबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण या घटकात ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer यावर अर्ज करावेत.
शेती कृषी यांत्रिकीकरणाच्या मर्यादा Drone Subsidy
- शेतकऱ्यांची कमी गुंतवणूक करण्याची क्षमता.
- कृषि यंत्राची निगा व दुरूस्तीच्या सुविधांसाठी अभाव.
- तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव.
- सहकारी संस्था व यंत्र-औजारे बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये सहकार्याचा अभाव.
- यंत्र व औजारांची जास्त किंमत.
- यंत्र व औजारांच्या गुणवत्तेमध्ये अभाव.
शेतकऱ्यांना हे यंत्र खरेदीसाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान फवारणी यंत्र
लाभार्थ्यांची निवड
1)लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून अर्ज सादर करावेत.
2)ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3)प्राप्त झालेल्या अर्जातून लकी ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल.