Cotton Procurement Extension 2025 यंदा सततच्या पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे कापसाचा हंगाम उशिरा सुरु झाला आहे. परिणामी भरतीय कापूस महामंडळाच्या CCI हमीभाव खरेदीसाठी सुरु असलेल्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात अली आहे.

Cotton Procurement Extension 2025 सुरुवातीला नोंदणीची अंतिम तारिक 30 सप्टेंबर होती. मात्र, शेतकऱ्यांकडे अद्याप कापूस उपलब्ध नसल्याने हि मुदत आता 31 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात अली आहे.
केळी विम्यातील प्रशासकीय अडसर झाला दूर, जिल्हाधिकारी काय म्हणाले पहा!!
Cotton Procurement Extension 2025 या निर्णयामुळे बोंडगळ, सडलेला कापूस आणि उशिरा येणाऱ्या हंगामामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोबाईल ॲपवर नोंदणी: Cotton Procurement Extension 2025
भारतीय कापूस महामंडळाने (CCI) शेतकऱ्यांच्या सोयीसाठी यावर्षी ‘कपास किसान मोबाईल ॲप’ सुरु केले आहे. 1 सप्टेंबर पासून या ॲपवरून नोंदणीला सुरुवात झाली असून राज्य शासन व शेतकरी संघटनांच्या मागणीनंतर केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उशिरा येणाऱ्या कापूस हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रतिकूल हवामानाचा फटका: Cotton Procurement Extension 2025
गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला पाऊस, सततचे ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाचा अभाव याचा थेट फटका कापसाला बसला आहे.
पानगळ व बोंडगळ सुरु झाली असून, काही ठिकाणी बोंडसळ व सडण्याची समस्या गंभीर झाली आहे.
बोन्डे फुटण्यासाठी आवश्यक असलेला पावसाचा ताण मिळत नसल्याने कापूस अजूनही काढणीला तयार झालेला नाही.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कि, बोंड फुटण्यासाठी किमान 8 ते 10 दिवस कोरडा ताण आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन महिन्यापासून हा ताण न मिळाल्याने उत्पदनावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
एचटीबीटीचा परिणाम: Cotton Procurement Extension 2025
यंदा जिल्ह्यात प्रतिबंधित एचटीबीटी कापसाची (HTBT Cotton) मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसून आले त्यावर वेळेत नियंत्रण आणल्याने शेतकऱ्यांना फटका बसला असून उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने कृषीतज्ञ पवन देशमुख यांनी सांगितले. हवामानातील प्रतिकूल बदल व कीडरोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे यावर्षीचा कापसाचा हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे.

| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |