Maize Crop 2025 महाराष्ट्र राज्यात तृणधान्य वर्गातील एक महत्वाचे पीक म्हणून मका या पिकाचा उल्लेख केला जातो. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात मका लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक शाश्वत आणि हमखास उत्पन्न मिळवता येते.

Maize Crop 2025 तृणधान्य पिकांच्या जागतिक उत्पादनात गहू आणि भात यांच्यानंतर मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्याच्या पलीकडेहि मक्याचा उपयोग स्टार्च, अल्कोहोल, गोंद, रंग, कृत्रिम रबर यांसारख्या विविध औद्योगिक उत्पदनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.
कोबी लागवड तंत्रज्ञान!!
राज्याच्या पातळीवर पाहता, यंदाच्या रब्बी हंगामात मका लागवडीचे क्षेत्र लक्षणीयरीत्या वाढले असून, ते 2.58 लाख हेक्टरवरून थेट 4.84 लाख हेक्टरपर्यंत पोहचले आहे. हि वाढ मुख्यतः केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी केलेल्या धोरणात्मक उपाययोजना, तसेच पशुखाद्य, कुकुटपालन खाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या मागणीमुळे झाली आहे.

यासोबतच मक्याच्या बाजारभावातील स्थिरतेनेही शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला असून, त्यामुळे रब्बी हंगामात लागवडीस उत्साहाने प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Maize Crop 2025 हवामान व जमीन:
मका हे उष्ण समशीतोष्ण आणि थंड अशा सर्व हवामानात येणारे पीक आहे. मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचरा असणारी, भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणारी व जलधारणा क्षमता अधिक असलेली जमीन चांगली असते.
Maize Crop 2025 पूर्वमशागत:
लागवडीसाठी निवडलेली जमीन तण आणि पूर्वी घेतलेल्या पिकांच्या अवशेषांपासून मुक्त असावी. जमिनीची खोल (15 ते 20 सें.मी. ) नांगरट करावी. कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेणखत हेक्टरी 10 ते 12 टन टाकावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेखताची आवश्यकता भासत नाही.
Maize Crop 2025 पेरणी:
रब्बी हंगामात 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करावी. एखादा दुसरा आठवडा पेरणीस उशीर झाल्याने उत्पादनात फारसा फरक पडत नाही. रब्बी हंगामात मका पिकाची लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी. 3 ते 4 सेमी खोलीवर बियाणे पेरावे.
पेरणीचे अंतर बियाणे प्रमाण:
सरी वरंबा पद्धतीत मका पिकाची पेरणी टोकन पद्धतीने करावी. पट्टा पद्धतीने पेरणी केल्यास उत्पन्न वाढ आढळून आले आहे उशिरा येणाऱ्या आणि मध्यम जातींसाठी 75 से.मी. *20 से.मी. अंतरावर टोकन करावे. लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी 60 से.मी. *20 से.मी. अंतरावर टोकन करावे. बियाणे प्रमाण 15 ते 20 किलो/हेक्टरी.
मका पिकाचे वाण व वैशिष्ट्ये:
- मांजरी – 90-110 दिवस संमिश्र वाण उत्पन्न 40 ते 50 क्विंटल/हेक्टर, नारंगी, पिवळे दाणे.
- राजश्री – 100-110 दिवस संकरित वाण उत्पन्न 55 ते 60 क्विंटल/हेक्टर
- डेक्कन – 105-110 दिवस संकरित वाण उत्पन्न 55 ते 60 क्विंटल/हेक्टर
- करवीर – 100-110 दिवस संमिश्र वाण उत्पन्न 40 ते 50 क्विंटल/हेक्टर, नारंगी, पिवळे दाणे.
- आफ्रिकन टॉल – संमिश्र वाण (चाऱ्यासाठी सर्वोत्तम ); उत्पन्न 60 ते 70 टन हिरवा चारा हेक्टर आणि धान्य 50 ते 55 क्विंटल हेक्टर.
Maize Crop 2025 बीजप्रक्रिया:
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम बुरशीनाशक प्रति किलो बियाणास लावावे. तसेच ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धन 25 ग्रॅम किंवा 100 मिली प्रति किलो बियाणास लावून नंतर पेरणी करावी.

Maize Crop 2025 खत व्यवस्थापन:
रब्बी मका पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र द्यावे. तसेच पेरणीनंतर 45 दिवसांनी उर्वरित 40 किलो नत्र द्यावे.
पाणी व्यवस्थापन:
मका पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते. म्हणून महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाणी देणे आवश्यक असते.
- पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे.
- पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पिकाची शाकीय अवस्था )
- पेरणीनंतर 40 ते 60 दिवसांनी (पक्ष फुलोऱ्यात असताना )
- दाणे भरण्याच्या वेळी (75-80 दिवसांनी )
रब्बी हंगामात जमिनीच्या मगदूरानुसार 10-12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. रब्बी हंगामात ठिबक सिंचनाचा वापर करून मका लागवड करता येते. यासाठी योग्य जमीन, हवामान, आणि वाणांची निवड आवश्यक आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. खते दिल्यावरही त्याचा उपयोग होतो. ठिबक वर लागवड करताना 4 फुट किंवा 5 फुट अंतरावर नळी असेल तर नळीच्या दोन्ही बाजूला साधारणता 8 ते 9 इंच अंतरावर लागवड करावी. 2 रोपांतील अंतर 10 इंच ठेवावे.
Maize Crop 2025 आंतरमशागत:
पेरणी समताच चांगल्या वाफश्यावर तण नियंत्रणासाठी आटुटॉप 50% प्रवाही 2 ते 2.5 किलो प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे. तणनाशक फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत अंतर मशागत करू नये.
Maize Crop 2025 पीक संरक्षण:
किड नियंत्रण:
खोड किडा नियंत्रण- इमिडाक्लोप्रिड 1 मिली लिटर पाण्यातून फवारावे किंवा कार्बारिल भुकटी (85%) 1700 ग्रॅम/हेक्टर 500 लिटर पाण्यातून फवारावी.
गुलाबी अळी ट्रायकोडर्मा चिलोणीस या परोपजीवीचे अंडी असलेले 8 कार्ड प्रति हेक्टरी लावावेत.
मावा व तुडतुडे – डायमिथोएट 1 मिली लिटर पाण्यातून फवारावे.
हिरवे कणसे पोखरणाऱ्या अळ्या मिथिल पॅराथिऑनची भुकटी 20 ते 30 किलो हेक्टर धुरळावी.

रोग नियंत्रण:
खोड कुजव्या रोग- रोगाची लक्षणे दिसतात 75 % कॅप्टन 12 ग्रॅम प्रति लिटर 100 पाणी या प्रमाणात जमिनीतून दिल्यास पिथियम खोड कुजव्या रोगाचे नियंत्रण करणे शक्य होते.
करपा रोग- रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार डायथेन एम-45 किंवा मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
काढणी मळणी व साठवणूक:
धान्यासाठी मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन-तीन दिवस उन्हात चांगले वाळवावीत. त्यानंतर मका सोलणी यंत्राने कणसातील दाणे काढावेत. सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे, म्हणजे साठवणुकीत किडी मुळे नुकसान होत नाही.
उत्पादन:
Maize Crop 2025 संकरित वाण 100 ते 110 क्विंटल/हेक्टर, संमिश्र वाण 40 ते 50 क्विंटल/हेक्टर, चारा पिके 60 ते 70 टन हिरवा चारा/हेक्टरी.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |