जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? Soil Fertility 2025

Soil Fertility 2025 शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य कसे असावे यासाठी शेतकऱ्यांनी जागृत हवे तसेच पिकाचे उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी शेतीचे तंत्रज्ञान वापरायला पाहिजे.

Soil Fertility 2025

WhatsApp Group Join Now

Soil Fertility 2025 अयोग्य खताचा वापर:

माती परीक्षण करूनच खताचे व पिकाचे नियोजन करायला पाहिजे कारण महाराष्ट्रातील जमिनीत नत्र व स्फुरद कमी तर पालाश भरपूर असे प्रमाण आहे. परंतु सध्य स्थितत असे आढळून येत नाही तर पालाश प्रमाण सुद्धा काही ठिकाणी कमी होत आहे. एकाच एक खताचा उपयोग करणे तर गंधक व मॅग्नेशियम यासारख्या खताचा उपयोग न करून त्याचे प्रमाण अत्यंत कमी होणे म्हणजेच सुपीकता न टिकवणे.

केळी पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन!!

Soil Fertility 2025 जमिनीमध्ये खताची उपलब्धता पाहून शिफारसीत मात्रा देणे गरजेचे आहे. बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये जमिनीमध्ये खत टाकताना ती झाकण्याची उणीव जाणवते. त्यामुळे खताचा ऱ्हास होऊन झाडांना उपलब्ध होत नाही.

WhatsApp Group Join Now

Soil Fertility 2025 पिकांची फेरपालट:

आपल्या जमिनीमध्ये वर्षानुवर्षे एकच पीक घेणे म्हणजे जमिनीमध्ये असलेल्या उपलब्ध पीक पोषणाचा ऱ्हास होऊन रोग व किडींचे प्रमाण वाढवणे होय. पिकाची फेरपालट करताना तृणधान्या नंतर कडधान्य द्यायला पाहिजे. उदा. खरीप मध्ये जर ज्वारी, मका, घेत असेल त्यानंतर हरभरा, करडई, भातानंतर गहू व उन्हाळी मूग, कापूस नंतर ज्वारी, मका, इत्यादी. त्यामुळे कडधान्य किंवा द्विदल पिकात नत्राच्या गाठी असल्यामुळे पुढील पिकाला नत्राचा जमिनीत साठा होतो व प्रमाण वाढते. व सुपीकता टिकून राहते. तसेच फेरपालटीमुळे वेगवेगळे पिकांच्या पालापाचोळ्याचे जमिनीत प्रमाण वाढून एकापेक्षा जास्त अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते व जमिनीचा कस टिकून राहतो.

हिरवळीचे खत जमिनीत गाडणे:

Soil Fertility 2025 जसे धैंचा, ताग, शेवरी, सुबाभूळ, गिरीपुष्प इत्यादी. पिके नत्र खतांची गरज भागवते. धैंचा पेरून फुलावर येण्याआधी जमिनीत ट्रॅक्टरच्या साह्याने गाडून तसेच शेताच्या बांधावर गिरिपुष्पाचे झाडे लावून पेरणी आधी तो पाला जमिनीमध्ये गाडावा. 60-90 किलो नत्र प्रति हेक्टरी मिळते व जमिनीचा कस टिकून राहतो. असे केल्याने पाणी धरण्याची क्षमता नत्राचे प्रमाण वाढते व जमिनीची धूप होत नाही पर्यायाने जमिनीचा कस टिकून राहून पीक पोषणासाठी झाडांना किंवा पिकांना अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन उत्पादनात चांगली वाढ होते.

सेंद्रिय कर्बाचे अयोग्य प्रमाण:

Soil Fertility 2025 बऱ्याचदा शेतकऱ्यांना शेतावर असे पाहणीत येते की न कुजलेले शेणखत जमिनीत फेकतात असे केल्याने अन्नद्रव्ये झाडांना उपलब्ध होत नाहीत उलट कर्बा नत्राचे प्रमाण वाढवून किडी व रोगाला पिके बळी पडतात. उदा. हुमणी अळी ही न कुजलेल्या शेणखतावर संगोपन करून पिकांना नष्ट करतात.

गोठ्यातून काढलेले गुरा ढोरांचे मलमूत्र व पालापाचोळा व इतर कचरा जसे बांधांवरील पालापाचोळा, घरातील भाजीपाल्यांची फेकलेले अवशेष, इत्यादी खड्ड्यात भरून व थरावर थर देऊन पाणी शिंपडून आणि पाणी लिपून त्याला दीड महिना कुजू द्यावे व कुजल्यानंतर शेतात टाकावे. असे केल्याने अन्नद्रव्यांचा पुरवठा तर होतोच आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते.

Soil Fertility 2025 आंतरपीक पद्धती:

शाश्वत शेतीसाठी आंतरपीक पद्धती खूप महत्त्वाची आहे. अशा पद्धतीमध्ये मुख्य पिकाची प्रतिहेक्टरी रोपांची संख्या कमी न करता पेरणी अंतर्गत बदल करून जास्तीची आंतरपिके घेतली जातात. पिकांच्या वाढीच्या काळात परस्परांशी स्पर्धा न करता एकमेकांना पूरक ठरतील अशी पिके निवडावीत. पिकांची पक्वता कालावधी, वाढीचा प्रकार, मुळांची वाढ भिन्न प्रकारचे असल्यामुळे पिकांच्या योग्य वाढीस जमिनीत ओलाव्याची व पीक पोषणाची गरज योग्य प्रकारे भागवली जाते. पावसाच्या खंडामध्ये कमीत कमी एक पीक तरी हाती लागते. आंतरपीक पद्धतीमध्ये बाजरी + तूर (2:1), सूर्यफूल + तुर (2:1), तुर + गवार (1:2), एरंडी + गवार (1:2), तूर + शेपू (भाजी) (1:2), तर तूर + कोथिंबीर (1:2), अशा पद्धती आहेत.

Soil Fertility 2025 जैविक खते:

पिकांच्या वाढीसाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान म्हणजे जैविक खते. जैविक खतांमध्ये ऍझोटोबॅक्टर, पीएसबी, रायझोबियम, ट्रायकोडर्मा, अझोला, इत्यादी. जैविक खते बाजारात आहेत. अशा खतांची पेरणीच्या पूर्वी बीजप्रक्रिया जर केली तर 15-20% उत्पादनात वाढ निश्चितच होते. ऍझोटोबॅक्टर, अझोला व राजोबियम नत्र खताची बचत करते तर पीएसबी हे स्फुरद्वाला पोहोचवण्याचे काम चांगल्या रीतीने करते. ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळले असल्यास बुरशीजन्य रोगास पिके बळी पडत नाहीत. अशा जैविक खताच्या बीज प्रक्रिया केल्याने बियाणे जोमदारपणे उगवतात व वाढ चांगली होते, फक्त बीजप्रक्रिया योग्य रीतीने करावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment