केळी पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन!! Nutrient Management for Banana Crop 2025

Nutrient Management for Banana Crop 2025 केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे या पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होणे अत्यंत गरजेचे आहे. केळीचे अपेक्षित उत्पादन व दर्जा मिळवण्यासाठी काटेकोरपणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Nutrient Management for Banana Crop 2025

Nutrient Management for Banana Crop 2025 सर्वसाधारणपणे एक टन केळीच्या उत्पादनासाठी 6 ते 8 किलो नत्र, 1.5 ते 2 किलो स्फुरद, 17 ते 20 किलो पालाश, 1 ते 1.5 किलो गंधक, 3 ते 4.5 किलो कॅल्शियम व 2 ते 2.5 किलो मॅग्नेशियम जमिनीतून शोषून घेतले जाते म्हणूनच रासायनिक खतांचा संतुलित वापर आजच्या आधुनिक शेतीसाठी अपरिहार्य आहे. रासायनिक खतांचा वापर करीत असतानाच सेंद्रिय खतांचा ही वापर करणे अनिवार्य आहे.

सिंचन पाणी परीक्षण!! 

सेंद्रिय खत वापराचे फायदे:

  • सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
  • सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते.
  • जमिनीतील सूक्ष्म जीव जंतूंची वाढ होते व त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.
  • सेंद्रिय पदार्थांचे विघटन झाल्यावर त्यातील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात.
  • सेंद्रिय पदार्थामुळे कुजल्यावर सेंद्रिय आम्ल तयार होतात. आम्ल मुळे या जमिनीत स्थिर झालेले स्फुरदासारखी अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात.
  • सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचा सामू योग्य प्रमाणात टिकवून धरण्यास मदत होते.
  • सेंद्रिय पदार्थांमुळे जमीन भुसभुशीत झाल्याने मुळांची वाढ चांगली होते आणि ती कार्यक्षम राहतात.

WhatsApp Group Join Now

सेंद्रिय खते : शेण खत-10 किलो प्रति झाड किंवा गांडूळ खत-5 किलो प्रति झाड द्यावे.

जैविक खते: ऍझोस्पिरिलम – 25 ग्रॅम प्रति झाड व पी.एस.बी.- 25 ग्रॅम प्रति झाड केळी लागवडीच्या वेळी शेणखतासोबत केळी लागवडीच्या वेळी वापरण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

निबोळी पेंड : थंडीच्या दिवसात प्रति झाड 500 ते 1000 ग्रॅम निबोळी पेंड दिल्यास जमिनीत उबदापणा येतो.

हिरवळीचे खते: Nutrient Management for Banana Crop 2025

हिरवळीचे खते म्हणजे वनपस्तीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे किंवा वनस्पतीच्या हिरव्या अवशेषापासून तयार झालेले खत वापरणे हिरवळीचे पीक केळी लागवडीच्या आधी सलग पद्धतीने किंवा 2 ओळींमध्ये आंतरपीक म्हणून घेता येते.

हिरवळीचे पीक घेण्याकरिता ती निवडतांना जलद वाढणारी भरपूर सेंद्रिय पदार्थ तयार करणारी मुळांवर नत्र स्थिरीकरनाच्या गाठी असणारी कोणतीही द्विदल वर्गीय पिके हिरवळीची पिके म्हणून घेता येतात. यामध्ये प्रामुख्याने ताग, धैंचा, शेवरी, चवळी, उडीद, इ. द्विदल पिकांचा समावेश होतो 40 ते 45 हिरवळीच्या पिकांची कापणी करून शेतात गाडावे.

WhatsApp Group Join Now

शेणखत: केळीसाठी सेंद्रिय खत वापरणे हे उत्पादनाच्या दृष्टीने जितके महत्वाचे आहे. तितकेच जमिनीची जैविक आणि भौतिक सुपीकतेच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. केळीसाठी प्रतिझाड 10 किलो शेणखत लागवडीच्या वेळी शिफारस करण्यात आलेली आहे.

गांडूळ खत – केळी पिकासाठी प्रति झाड 5 किलो गांडूळखत वापरावे.

जिवाणू खतांचा वापर : रासायनिक खतांना पूरक म्हणून जिवाणू खतांचा वापर केल्यास रासायनिक खतात बचत करून फायदा मिळवता येतो. केळीसाठी ऍझोस्पिरिलम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येक 25 ग्रॅम प्रति झाड एकूण 50 ग्रॅम प्रति झाड शेणखतासोबत केळी लावडीच्या वेळी वापरण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

केळीसाठी मुख्य अन्नद्रव्यांचा वापर:

Nutrient Management for Banana Crop 2025 नत्रामुळे झाडांची वाढ चांगली होते हरितद्रव्यांची निर्मिती करून पानांना गडद हिरवा रंग येतो. प्रथिने व अमिनो आम्ल यांची निर्मिती होते. पेशींच्या रचनेतील हा एक महत्त्वाचा घटक असून अन्न संचयनाच्या क्रियेत महत्त्वाचे कार्य करतो. नत्राच्या अभावामुळे झाडांची वाढ मंदावते पाने फिक्कट हिरवी किंवा पिवळसर होतात. आणि पानांची वाढ कमी होते घडातील फळांची संख्या कमी होते. स्फुरदेमुळे वनस्पतीच्या मुळांची वाढ जोमदार होते.

प्रकाश संश्लेषा प्रथिने व पेशी विभाजनातील क्रियाशील भाग असतो. अभावामुळे केळीच्या मुळांचे वाढ खुंटते पानावर निळसर झाक दिसून येते. पानांच्या कडा करवतीच्या दात्यांच्या आकाराप्रमाणे करपतात.

केळीसाठी पालाश या अन्नद्रव्याची सर्वात जास्त गरज असते. पालाश हा वनस्पतीच्या शरीर क्रियेमुळे महत्त्वाची कामगिरी करतो. झाडांना रोग, किडी व थंडी यापासून प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. वनस्पतीच्या शर्करा पिष्टमय व प्रथिने यांचे चलन वलन होण्यास मदत होते. ही पिकांची प्रत वाढते. खोडे बळकट होतात पाण्याच्या टंचाई परिस्थितीत पीक तग धरून राहते.

केळीसाठी रासायनिक खतांचा वापर:

Nutrient Management for Banana Crop 2025 केळीच्या अधिकतम उत्पन्नासाठी प्रति झाड 200 ग्रॅम नंतर 60 ग्रॅम स्फुरद 200 ग्रॅम पालाश द्यावे. एकूण नत्राच्या मात्रेपैकी 75 टक्के मात्रा केळीच्या शाखीय अवस्थेत केळी लागवडीनंतर 210, 255 आणि 300 दिवसांनी युरिया 36 ग्रॅम प्रति झाड द्यावा. केळी लागवडीच्या वेळेस 275 ग्रॅम प्रति झाड सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. म्युरेट ऑफ पोटॅश 83 ग्रॅम प्रति झाड केळी लागवडीच्या वेळी लागवडीनंतर 165 ते 155 आणि 300 दिवसांनी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्याच्या दृष्टीने केळीसाठी बांगडी पद्धतीने किंवा कोली घेऊन त्यात खते देणे आवश्यक आहे.

केळीसाठी ठिबक सिंचनातून खतांचा वापर:

केळीच्या अधिक दर्जेदार उत्पदनासाठी मध्यम खोल काळ्या जमिनीत नत्र व पालाशयुक्त खतांचा शिफारशीत मात्रेच्या 75 टक्के मात्रा (150 ग्रॅम नत्र आणि 150 ग्रॅम पालाश प्रति झाड) ठिबक सिंचनातून देताना, हजार झाडांसाठी 1 ते 16 आठवड्यांपर्यंत 4.5 kg युरिया आणि 3 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा, 17 ते 28 आठवड्यांपर्यंत 13.5 किलो युरिया आणि 8.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा, 29 ते 40 आठवड्यांपर्यंत 5.5 किलो युरिया आणि 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा, 41 ते 44 आठवड्यांपर्यंत 5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा द्यावे.

तसेच स्फुरदाची एकूण 60 ग्रॅम प्रति झाड हे मात्र देण्यासाठी 1 ते 16 आठवड्यापर्यंत 6.5 किलो मोनो अमोनियम फॉस्फेट (12:61:00) प्रति आठवडा ठिबक सिंचनातून द्यावे. या सोबतच केळी लागवडीच्या वेळी प्रति झाड 10 किलो शेणखत 25 ग्रॅम ऍझोस्पिरिलम व 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू यांचा वापर करावा.

केळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर:

केळीच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी मध्यम खोल काळा जमिनीत लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात ईडीटीए जस्त आणि ईडीटीए लोह यांची प्रत्येकी 0.5 टक्के तीव्रतेची फवारणी द्यावी. तसेच पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीमधून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी 15 ग्रॅम प्रति झाड शेणखतात (150 ग्रॅम ) मुरवून शिफारसीत अन्नद्रव्य मात्रेसह वापर करावा.

केळीसाठी फवारणीद्वारे अन्नद्रव्यांचा वापर:

Nutrient Management for Banana Crop 2025 केळी घडाच्या गुणवत्ता वाढीसाठी, घड पूर्ण निसवल्यावर एकदा व नंतर 15 दिवसांनी पुन्हा एकदा हंस 2 पोटॅशिअम डाय हायड्रोजन फॉस्फेट (0.5 टक्के ) व युरिया (1 टक्का) या द्रावणाची संपूर्ण घडावर फवारणी करावी.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment