सिंचन पाणी परीक्षण!! Irrigation Water Testing 2025

Irrigation Water Testing 2025 शेतकरी बंधुनो आपण शेतीच्या सिंचनासाठी जे पाणी वापरतो त्याचे स्रोत मुख्यत्वे विहीर कूपनलिका कालवा नदी शेततळे इ. असतात बऱ्याचदा बागायती क्षेत्रातील विहीर किंवा कूपनलिकेतील पाणी पिण्यास मचूळ खारट लागते.

Irrigation Water Testing 2025

Irrigation Water Testing 2025 अशावेळी त्यात विद्राव्य क्षारांचे प्रमाण वाढलेले असते पाणी क्षारयुक्त असल्यास पिकांच्या वाढीवर त्याचा अनिष्ठ परिणाम होतो. जमिनीतून क्षारांचा निचरा जर चांगला होत नसेल तर क्षरांचे प्रमाण वाढत जाते.

वनस्पतीशास्त्र: ऊसाचा तुरा!!

Irrigation Water Testing 2025 जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पांढरे क्षार जमिनीवर येतात याला आपण जमिनीला मीठ फुटले असेही म्हणतो. या जमिनी पुढे क्षारयुक्त बनतात. जर जमिनीत उदासीन क्षारांचे प्रमाण (कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड व सल्फेट) जास्त असल्यास जमिनीची घडण भुसभुशीत वाटते परंतु पिकांच्या मुळांची वाढ खुंटून पिके पिवळी पडतात.

WhatsApp Group Join Now

पाण्यात सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम कार्बोनेटचे प्रमाण जास्त असल्यास जमिनी घट्ट होतात. पाण्यात कोणत्या प्रकारचे क्षार आहेत हे आपल्याला पाणी परीक्षण केल्याशिवाय समजत नाही सर्वसाधारणपणे विविध स्रोतामधील क्षारांचे प्रमाण खालील तक्त्यात दिले आहे.

सिंचनाच्या पाण्याचे विविध स्रोत व क्षारता:

स्रोत क्षारता डेसी सा. मी.
पावसाचे पाणी0.5 पेक्षा कमी
विहीर0.50 ते 12.0
कूपनलिका0.40 ते 14.0
धरण0.10 ते 0.30
तलाव0.10 ते 0.50

पाण्यातील विविध क्षारांचे प्रमाण हे खडकांचा प्रकार, खडकातील विद्राव्य खनिजांचे प्रमाण, पाऊसमान, पाण्याची पातळी /खोली, समतोष्ण हवामान, सिंचनाची पद्धत, रासायनिक खतांचे वापराचे प्रमाण, सेंद्रिय खतांचा कमी वापर या सर्व गोष्टींचा परिणाम पाण्यातील क्षार वाढण्यावर होत असतो.

तपासणीसाठी पाणी नमुना घेण्याची पद्धत:

Irrigation Water Testing 2025 पाणी तपासण्यासाठी परीक्षणासाठी अर्धा लिटर पाणी पुरेसे होते. पाणी नमुना स्वच्छ काचेच्या किंवा प्लास्टिक बाटलीत घ्यावे. विहिरीतून किंवा कुपनलिकेतून पाणी नमुना घेताना विद्युत पंप 15 ते 20 मिनिटे चालू करावा व त्यानंतर प्लास्टिक किंवा काचेची बाटली त्याच पाण्याने स्वच्छ करावी व नंतर पाणी त्यात भरावे. बाटलीचे झाकण घट्ट बसवून शक्यतो त्याच दिवशी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून द्यावी.

WhatsApp Group Join Now

बाटलीसोबत शेतकऱ्याचे नाव, पत्ता, नमुना, घेतल्याचा दिनांक, पाण्याचा स्रोत कोणत्या पिकासाठी वापरायचा इ. माहिती पाठवावी. तपासणीसाठी आवश्यक घटक व त्याची सर्वसाधारण तक्त्यात दिले आहे. पाण्यात काडीकचरा, शेवाळ, माती येणार नाही याची काळजी घ्यावी व बाटलीत भरून प्रयोगशाळेत पाठवावे.

पाणी तपासणीसाठीचे महत्वाचे घटक आणि त्याची प्रतवारी:

घटकउत्तम प्रतीचेमध्यम प्रतीचेअयोग्य पाणी
सामू6.5 ते 7.57.5 ते 8.58.5
क्षार (डेसी /मि.)0.250.25 ते 2.252.25
कार्बोनेट (मि. ई. लि.)नसावे0.5 ते 1.51.5
बायकार्बोनेट (मि. ई. लि.)1.51.5 ते 8.08.0
क्लोराईड (मि. ई. लि.)4.04 ते 1010
सल्फेट (मि. ई. लि.)2.02 ते 1212
रीसिड्युअल सोडियम कार्बोनेट (मि. ई. लि.)1.251.25 ते 2.52.5
सोडियम शोषण गुणांक1010 ते 2626
मॅग्नेशियम कॅल्शियम गुणांक1.51.5 ते 3.03.0
बोरॉन (मिली ग्रॅम /लि.)1.01.0 ते 2.02.0

Irrigation Water Testing 2025 पाण्यामध्ये क्षार हे विरघळलेल्या अवस्थेत असतात असे पाणी पिकांना दिले तर जमिनीमध्ये क्षार साठत जातात. खालील तक्त्यामध्ये पाण्याची क्षारता आणि एका पाण्याच्या पाळीद्वारे किती क्षार मिसळले जाते हे दिले आहे.

क्षारयुक्त पाण्याद्वारे जमिनीत मिसळणारे क्षार:

पाण्याची विद्युतवाहकता ( क्षारता डेसी सायमन मी.)एका पाण्याच्या पाळीद्वारे (6 सेमी) जमिनीत मिसळणारे क्षार (किलो /हेक्टरी)
0.5192
10384
1.5576
2.0768
2.5960
3.01152
4.01536

क्षारयुक्त पाणी चांगल्या जमिनीस वापरताना घ्यावयाची काळजी:

  1. जमिनीचा निचरा चांगला राहिल्याची काळजी घ्यावी गरज पडल्या शेताच्या बाजूस चोर खुदा हवे.
  2. रासायनिक व सेंद्रिय खतांचा एकत्रित शिफारसीप्रमाणे करावा.
  3. पिकांना सुरवातीच्या काळात चांगल्या प्रतीचे पाणी द्यावे, आणि नंतरच्या काळात क्षारयुक्त पाणी हलके परंतु वारंवार द्यावे, अतिरिक्त पाण्याचा वापर टाळावा.
  4. क्षार सहनशील पिकांची निवड करावी.
  5. पारंपारिक सिंचनाच्या पद्धती वापरण्याऐवजी ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था करावी.
  6. पेरणीसाठी 15 ते 20 टक्के अधिक बियाणे वापरावे.
  7. क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचनातून देताना जमिनीचा निचरा चांगला असावा तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असावे.
  8. जेव्हा आपण ठिबकद्वारे सिंचन करतो तेव्हा पाण्यातील क्षारांचे प्रमाण 3.15 डेसी सायमन प्रति मीटर किंवा 2000 मिली ग्रॅम लिटर पेक्षा कमी असावे अन्यथा ठिबक संचामध्ये क्षार साठून बंद पडतो.
  9. लॅटरल्स व ड्रीपर्स यामध्ये क्षारयुक्त पाण्यामध्ये साचलेले क्षणाचे थर काढून टाक ण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड 0.1 किंवा नायट्रिक ऍसिड वापर करावा.
  10. सिंचनाचे पाण्याचा सामू 8.5 पेक्षा जास्त असल्यास ठिबक सिचंनातून देण्यापूर्वी नायट्रिक ऍसिडचा वापर करून सामू कमी करावा.
  11. फॉस्फरिक ऍसिड बरोबर चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित मिसळून देऊ नये कारण त्याची उपलब्धता कमी होते.
  12. अमोनियम फॉस्फेट (12:61:00) या विद्राव्य खतासोबत मॅग्नेशियम सल्फेट व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र मिसळून देऊ नये.
  13. ठिबक सिंचनाद्वारे खते देताना कॅल्शियम नायट्रेट या विद्राव्य खतासोबत पोटॅशियम सल्फेट, अमोनियम फॉस्फेट (12:61:00) फॉस्फरिक ऍसिड, मॅग्नेशियम सल्फेट व सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र मिसळून देऊ नये.

अशाप्रकारे पाणी परीक्षण करून पाणी ठिबक साठी योग्य आहे की नाही हे जाणून घ्यावे. क्षारयुक्त पाणी असल्यास सिंचनासाठी जमिनीच्या प्रकारानुसार व पिकांच्या सहनश्रेलतेप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment