Disease Controller 2025 बोर्डोमिश्रण मध्ये मोरचूद कळीचा चुना व पाणी हे तीन घटक आहे. आणि हे घटक सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे शेतकरी हे मिश्रण स्वतःच तयार करू शकतात. संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, आंबा, चिकू, डाळिंब, इत्यादी. प्रमुख फळ झाडांवरील टोमॅटो, मिरची, बटाटे, व इतर भाजीपाला पिकांवरील बुरशीजन्य रोगाचे नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण वापरता येते.

Disease Controller 2025 रोग आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन 1 0.8 किंवा 0.6 % बोर्डोमिश्रण वापरतात. बोर्डोमिश्रण या ताम्र युक्त बुरशीनाशकाचा शोध सन 1982 ते 85 च्या दरम्यान फ्रान्समधील पी. ए. मिलारडेट या शास्त्रज्ञाने लावला. बोर्डोमिश्रणाची उपयुक्तता सिद्ध झल्यानंतर आजतागायत विविध पिकांच्या रोगनियंत्रणासाठी या मिश्रणाचा वापर परिणामकाररित्या केला जात आहे. आणि आजही त्याचा वापर शेतकरी करीत आहेत.
उत्पादन वाढीसाठी पिकांची फेरपालट!!
Disease Controller 2025 रासायनिक तत्वांचे बोर्डोमिश्रण किंवा बोर्डो मलम तयार करण्याकरिता लाकडी, मातीची किंवा प्लास्टिकची भांडी घ्यावीत. लोखंडी अथवा तांब्या पितळेच्या भांड्यात मिश्रण तयार करू नये.

बोर्डोमिश्रण तयार करण्याची पद्धत:
एक टक्का तीव्रतेचे बोर्डोमिश्रण तयार करण्यासाठी 1 किलो मोरचूद, 1 किलो चुना आणि 100 लिटर पाणी लागते.
मोरचुदाचे द्रावण 50 लिटर पाण्यामध्ये तयार करावे त्याकरिता 1 किलो कापडी पिशवीत बांधून हि पिशवी पाण्यात रात्रभर बाहेर ठेवावे. किंवा मोरचूद बारीक वाटून तो पाण्यात विरघळवून घ्यावा. हे द्रावण 100 लिटर पेक्षा जास्त क्षमता असलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये करावे.
दुसऱ्या एका भांड्यात 1 किलो चुना 10-15 लिटर पाण्यात भिजत टाकावा चुना पाण्यात पूर्णतः विरघळल्यावर तो चांगला गाळून घ्यावा म्हणजे त्यातील न विरघळलेला भाग वेगळा करता येईल.
मोरचूद आणि चुना हि दोन्ही द्रवाने काठीने व्यवस्थित ढवळून घ्यावीत.
चुन्याचे द्रावण मोरचुदाच्या द्रावणामध्ये मिश्रणाचा सामू 7 येईपर्यंत हळूहळू ओतावे आणि काठीने सारखे ढवळावे हे तयार झालेले आकाशी रंगाचे द्रावण म्हणजेच बोर्डोमिश्रण होय.
अशा प्रकारे तयार झालेले बोर्डोमिश्रण फवारण्यास योग्य आहे किंवा नाही याची चाचणी घ्यावी.
बोर्डो मलम तयार करण्याची पद्धत:
फळवर्गीय पिकांच्या खोडांना बोर्डो मलम देखील लावतात. लिंबूवर्गीय फळ पिकांच्या डिंक्या खोडकूज इत्यादी. रोग नियंत्रणासाठी बोर्डो मलम चा वापर करण्यात येतो.
1 किलो मोरचूद 1 किलो कळीचा चुना आणि 20 लिटर पाणी घेऊन बोर्डो मलम तयार करावे 5 लिटर पाण्यात मोरचूद आणि 5 लिटर पाण्यात चुना वेगवेगळ्या भांड्यात विरघळवून घ्यावा. नंतर दोन्ही द्रवाने एकाच वेळी तिसऱ्या भांड्यात ओतावे आणि काडीने ढवळावे घट्ट द्रावण नंतर ब्रश अथवा कंचीच्या साहाय्याने झाडाच्या बुंध्यावर लावावे 3 ते 5 वर्षावरील झाडांना जमिनीपासून वर एक मित्र उंचीपर्यंत बोर्डोमलम वर्षातून 2 वेळा पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा संपल्यानंतर लावावा.
बोर्डोमिश्रणाच्या योग्यतेची चाचणी:
Disease Controller 2025 बोर्डोमिश्रण पिकावर फवारण्यापूर्वी फवारण्यास योग्य आहे कि नाही याची चाचणी घेणे आवश्यक असते मिश्रणात जास्त मोरचूद असल्यास कोवळ्या पिकास अपाय होण्याचा संभव असतो म्हणून या मिश्रणाची चाचणी करून घ्यावी.
बोर्डोमिश्रणाचा भाजीपाला रोगनियंत्रणासाठी वापर : बटाटा, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळावर्गीय, भाज्या, कोबी, कॉलीफ्लॉवर, हळद, आले, गाजर, गवार, वाल, घेवडा, वाटाणा, इ. पिकावरील करपा काळा करपा पानावरील ठिपके केवडा भुरी जिवाणूजन्य करपा अशा विविध रोगांचा नियंत्रणासाठी वापर करता येतो.
पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्रावणांची तीव्रता ठरवावी साधारणतः भाजीपाला पिकांसाठी 0.5 ते 0.6% तीव्रतेचे बोर्डोमिश्रण फवारणीसाठी योग्य असते. यापेक्षा जास्त प्रमाण वापरल्यास काही पिकांमध्ये दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. जमिनीतील बुरशीमुळे होणारे मर मूळकूज खोडकूज इ रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा बोर्डोमिश्रण 1.0 % हे एक उत्तम बुरशीनाशक आहे.
विविध तीव्रतेचे बोर्डोमिश्रण तयार करण्यासाठी लागणारे मोरचूद आणि चुना यांचे प्रमाण:
| मोरचूद (किलो) | कळीचा चुना (किलो) | पाणी (लिटर) | तीव्रता | टक्केवारी |
| 1000 ग्रॅम | 1000 ग्रॅम | 100 लिटर | 5:5:50 | 1.0 टक्के |
| 800 ग्रॅम | 800 ग्रॅम | 100 लिटर | 4:4:50 | 0.8 टक्के |
| 600 ग्रॅम | 600 ग्रॅम | 100 लिटर | 3:3:50 | 0.6 टक्के |
| 500 ग्रॅम | 500 ग्रॅम | 100 लिटर | 2.5:2.5:50 | 0.5 टक्के |
| 400 ग्रॅम | 400 ग्रॅम | 100 लिटर | 2:2:50 | 0.4 टक्के |
| 200 ग्रॅम | 200 ग्रॅम | 100 लिटर | 1:1:50 | 0.2 टक्के |
| 100 ग्रॅम | 100 ग्रॅम | 100 लिटर | 0.5:0.5:50 | 0.1 टक्के |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |