Turmeric Crop 2025 पुरबाधित हळद पिकाचे व्यवस्थापन हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी सुरु आहे. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. तसेच हळदीचे गड्डे तयार होण्याची हि योग्य वेळ आहे.

पुराच्या पाण्याचा कालावधी पाण्यातील गाळ आणि जमिनीचा प्रकार यावर हळद पिकाचे नुकसान अवलंबून असते पुरबाधित क्षेत्रात तापमान फारच कमी असते. अशावेळी हळद पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव होत असतो. हळद पिकाची पाने जास्तीत जास्त काळ पाण्यात राहिल्याने पानांवर मातीचा थर बसून पाने वाळून जातात.
नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली; आज शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे!!
Turmeric Crop 2025 अन्नद्रव्य वाहून जातात किंवा अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते. तसेच नत्रयुक्त अन्नद्रव्यांचा निचरा होऊन डिनायट्री फिकेशन होते. पुराच्या पाण्यामुळे हळद पिकाचे उत्पादन 50 ते 80 टक्के पर्यंत कमी होऊ शकते. जास्त काळ हळद पिकात पाणी साठून राहिल्यास 2 ते 3 महिने वयाचे हळद पीक तग धरू शकत नाही.

Turmeric Crop 2025 हळदीच्या पानांचे शेंडे पुराच्या पाण्याच्या वर असल्यास हळद उत्पादनास 50 ते 60 टक्के पर्यंत घट येऊ शकते. ज्या शेतात सलग 5 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी पाणी साचले असेल अशा ठिकाणी हळद पीक तग धरू शकत नाही. सुरळीत पाणी, गाळ जाऊन पिकाची वाढ पूर्णतः थांबते, जमिनीतील कंद कुजतात.
पुरबाधित हळद पिकासाठी करावयाच्या उपाययोजना
पूरग्रस्त क्षेत्रातील साठलेले पाणी चरींद्वारे त्वरित काढून टाकावे.
वाळलेले रोगग्रस्त पाने काढून टाकावेत, मुळांभवती मोकळी हवा खेळती ठेवावी, उघडे पडलेले कंद मातीने झाकावेत.
पुरबाधित क्षेत्रातील हळकुंडांना कंदकुज, पानांवरील ठिपके आणि रोगाचा प्रादुर्भाव तात्काळ होतो. कमी काळ हळद पिकात पाणी साठून राहिल्यास खालील प्रमाणे उपाय योजना करावी.
Turmeric Crop 2025 कंदकूज:
रोगाची लक्षणे कंदाच्या कोवळ्या फुटव्यांवर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्यांची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकीर काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो मऊ लागतो, त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन तसेच साचलेले पाणी या रोगास पोषक असते. ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.

नियंत्रण:
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा + प्रति एकरी 2 ते 2.5 किलो पावडर 250 ते 300 किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.
रोगाची तीव्रता जास्त असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन हळदीच्या बुंध्याभोवती आवळणी करावी.
कार्बेडीझम 1 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करावा पाणी साठू देऊ नये.
सूचना : आवळणी करताना जमिनीस वापसा असावा आवळणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आवळणी करावी. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे चिकट पदार्थ 1 मिलि प्रति लिटर पाणी मिसळून फवारावे.
Turmeric Crop 2025 पानांवरील ठिपके:
हा बुरशीजन्य रोग असून वातावरणात सकाळी पडणारे धुके व दव असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. कोलेटोट्रिकम कॅपसीसी बुरशीमुळे अंडाकृती लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पानांवर पडतात व पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते वाळून गळून पडते.
नियंत्रण:
मॅंकोझेब 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारावे 15 दिवसांच्या अंतराने पीक सात महिन्यांचे होईपर्यंत औषधांची अलटून पालटून फवारणी करावी एकच औषध फवारणीसाठी सतत वापरू नये.
रोगाच्या व्यवस्थापनाकरिता कार्बेनडीझम किंवा मॅंकोझेब हे बुरशीनाशक अनुक्रमे 1 व 2.5 ग्रॅम किंवा कोपर ऑक्सिफ्लॉईड 2.5 प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रादुर्भाव लक्षात घेऊन 10 दिवसांच्या अंतराने औषधाचे आलटून पालटून फवारणी करावी. रोगप्रस्थ पाने वेचून नष्ट करावेत शेतात स्वच्छता ठेवावी.
हळद पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार रासायनिक तसेच जैविक खतांचा वापर करावा यावेळी शिफारसीत मात्रेपेक्षा 25% खतांचा वापर अधिक करावा.
दीर्घकाळ साठलेल्या पाण्यामुळे झाडे अशक्त बनतात त्यावर उपाय म्हणून चिलेटेड स्वरूपात सूक्ष्मअन्नद्रव्ययुक्त खतांची फवारणी करावी. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पाणंद्वारे लवकर शोषण होते. चिलेटेड जस्त, चिलेटेड मंगल, चिलेटेड तांबे, इ.
19:19:19 या विद्राव्य खतांची 1 टक्के या प्रमाणात किंवा दोन फवारण्या कराव्यात. फवारणी द्वारे विद्राव्य खते दिल्यास ती पिकांना त्वरित उपलब्ध होतात. पिकांची खालावलेली स्थिती सुधारते, उत्पादन वाढण्यास मदत होते.
सूत्र कृमी नियंत्रणासाठी एकरी 8 क्विंटल निंबोळी पेंड किंवा करंज पेंड द्यावा.

भविष्यात पुन्हा जमिनीवर सेंद्रिय पदार्थ उदाहरणार्थ वाळलेला पालापाळा, भाताचे तूस, गव्हाचा भुसा, यांचे आच्छादन करावे. जेणेकरून मातीची धूप होणार नाही.
पूर्णतः नामशेष झालेल्या हळद पिकाच्या ठिकाणी हंगामी भाजीपाला पिके किंवा चारा पिके घ्यावेत.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |