Turmeric Crop 2025 महाराष्ट्रामध्ये हळदी प्रमुख मसाल्याच्या पिकाची लागवड केली जाते. या पिकाच्या दरामध्ये असलेले चढउतार पाहता येणाऱ्या हंगामामध्ये हे पीक चांगले उत्पादन देऊ शकते. त्यामुळे त्यांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने खतांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

Turmeric Crop 2025 या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार अन्नद्रव्यांची मात्रा कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे खतांचे नियोजन करीत असताना माती परीक्षण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
मूग व उडीद पिकावरील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन!!
साधारणतः पिकाच्या अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला असता असे दिसून आले आहे की 1 टन हळद तयार होण्यासाठी जमिनीतून हे पीक 16.5 की. नत्र 3.1 स्फुरद आणि 44.5 पालाश जमिनीतून घेते. या पिकांसाठी इतर पिकांप्रमाणेच विविध मूलद्रव्यांची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्या बरोबरच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांची गरज भासते. तर लोह, जस्त, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, आणि क्लोरीन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही गरज असते.

बीजप्रक्रिया: Turmeric Crop 2025
पाणी 100 ली. + सि.बी.झेड-50:200 ग्रॅम + सुदामा 50 मिली + ह्युमिफोर/हंस 200 मिली.
वरील तयार केलेल्या द्रावणात हळदीचे बियाणे 10-15 मिनिटे बुडवून लागणी साठी वापरावे यामुळे कंदकुज नियंत्रित होते. तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
लागणी वेळी खतांचा डोस प्रति एकर 10:26:26-4 बॅग + दुय्यम अन्नद्रव्ये 2 बॅग + निंबोळी पेंड 5 बॅग फोरेट-जी 7 किलो + एसआरपी – 9: 1 बॅग + न्युट्रीपंच 10 किलो किंवा मॅक्सवेल-एस 5 किलो + ह्युमिफोर-जी 10 किलो.
लागणी नंतर एका महिन्याने हंस 1 ली + 19:19:19-3 किलो + सुदामा 750 मिली + ब्लुफोर 1 किलो ड्रिपमधून द्यावे.
(हंसमुळे पांढरी मुळी वाढते तसेच वरील डोसमुळे कंदकुज व मररोगास अटकाव होतो.)
भरणी व्यवस्थापन: Turmeric Crop 2025
पहिली भरणी लागणीनंतर 70-75 दिवसांनी (2-2.5) महिने खालील प्रमाणे करावी.
डी.ए.पी. 5 बॅग + पोटॅश 2 बॅग मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो + गंधक 10 किलो + एस.आर.पी .-9:1 बॅग निंबोळी पेंड 5 बॅग + मॅक्सवेल-एस 5 किलो किंवा न्युट्रीपंच 10 किलो + ह्युमिफोर – जी 10 किलो + फोरेट 7 किलो प्रति एकर द्यावे.
दुसरी भरणी लागणीनंतर 4-4.5 महिन्यांनी खालील प्रमाणे खतांचा डोस द्यावा.
डीएपी 3 बॅग + पोटॅश 2 बॅग मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो गंधक 10 किलो + एस.आर.पी .- एस.आर.पी .-9: 1 बॅग निंबोळी पेंड 3 बॅग + मॅक्सवेल-एस 5 किलो किंवा न्युट्रीपंच 10 किलो + ह्युमिफोर-जी 5 किलो + फोरेट 3 किलो प्रति एकर द्यावे.

फवारणी व्यवस्थापन: Turmeric Crop 2025
लागणीनंतर 25-30 दिवसांनी करपा व पाना वरील ठिपके या रोगांच्या नियंत्रणा साठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली + सि.बी.झेड. 50:200 ग्रॅम + हंस 200 मिली + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 100 ग्रॅम + स्टिकफोर 100 मिली . किंवा पाणी 100 ली. + सिफॉन 150 मिली + सिलीस्टीक 30 मिली.
लागणी नंतर 45-50 दिवसांनी रसशोषक किडी , कंदमाशी तसेच बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणा साठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली. + रामबाण 300 मिली + सुदामा 50 मिली + झेड- 78:200 ग्रॅम.
लागणीनंतर 65-70 दिवसांनी फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली. + 13:40:13 -300 ग्रॅम आयकॉन शाईन 150 मिली + टायकून 30 मिली + स्टिकफोर 100 मिली.
फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी ॲमिनोलाईट 1 लिटर/एकर ड्रिपमधून द्यावे व दोन दिवसांनी मॅक्सवेल डिएफ 1 ली. + फुलविलाईट 500 ग्रॅम + सिलिस्टिक 200 मिली / एकर ड्रिपमधून द्यावे.
लागणी नंतर 85-90 दिवसांनी करपा व रसशोषक किडींच्या नियंत्रणा साठी तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्या साठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली. + मेटॅलॅक्झील 8 % मॅन्कोझेब 64%-200 ग्रॅम + स्लोगन 40 ग्रॅम + एस.आर.पी . 200 ग्रॅम + स्ट्रॉबेरी 100 ग्रॅम किंवा पाणी 100 ली. + सिफॉन 150 मिली + सिलीस्टीक 30 मिली.
लागणीनंतर 110-115 दिवसांनी कंदमाशी व कंदकूज नियंत्रणासाठी ड्रीपमधून एकरी 3 ली. रामबाण व दोन टप्या त 4.5 किलो एस.आर.पी.- 9 द्यावे.
हळदी मधील कंदकुज नियंत्रणासाठी रुटगार्ड 1 ली. + सिलीस्टीक 200 मिली प्रती एकर ड्रिपमधून द्यावे.
लागणी नंतर 120-130 दिवसांनी ड्रीपमधून एकरी 7 किलो 12:61:00 + 500 ग्रॅम रुटशाईन + 1 किलो मॅक्सवेल-एस 10 दिवसांच्या अंतराने 4 वेळा द्यावे. यामुळे पांढरी मुळी वाढते तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.
हळदीचे वजन वाढविण्या साठी तसेच गुणवत्ता सुधारण्यासाठी 180- 200 दिवसांनी ड्रिपमधून एकरी ७ किलो 00:52:34 + 2 किलो एस.आर.पी .-9 10 दिवसाच्या अंतराने 250 दिवसां पर्यंत द्यावे.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी – पाणी 100 ली . + सिफॉन 150 मिली + सिलिस्टिक 30 मिली (सदरच्या द्रावणामध्ये कोणतेही बुरशी नाशक, किटकनाशक किंवा मायक्रोन्युट्रीयंट मिसळू नये.)
हळदी मध्ये कंदकूज झाल्यास रुटगार्ड 2-2.5 मिली + सिलिस्टिक 0.25 मिली घेवून ट्रेंचिंग करावे व या नंतर 15-20 दिवसांनी दुसरे ट्रेंचिंग करावे.

हळद व आले यांना ड्रिपमधून खते देण्याची शिफारस
| खतांचा प्रकार व कंद संवर्धक | खतांची एकूण मात्रा (किलो /ली. प्रति एकर | खते देण्याचे प्रमाण (किलो /ली. प्रति एकर) | खते देण्याची वेळ |
| युरिया + समरुप 12:61:00 | 5 5 | 5 5 | उगवणी नंतर 7 दिवसांनी |
| हंस / रुटशाईन + थायोवीट | 1 1 | 1 1 | उगवणी नंतर 8 वा दिवस |
| मॅक्सवेल डि.एफ/ मॅक्सवेल-एस + मॅग्नेशियम सल्फेट | 2 5 | 2 5 | उगवणी नंतर 10 वा दिवस |
| समरुप 19:19:19 + युरिया | 25 50 | 25 50 | 11ते 53 दिवस (6 आठवडे) |
| रुटशाईन + ॲमिनोलाईट | 1 500 मिली | 1 500 मिली | 55 वा दिवस |
| समरुप 12:61:00 + युरिया | 25 20 | 5 4 | 56 ते 95 दिवस (5 आठवडे) |
| मॅक्सवेल डि.एफ/ मॅक्सवेल-एस | 2 | 2 | 96 वा दिवस |
| 13:00:45 एस.आर.पी. | 25 9 | 8.33 | 97 ते 117 दि वस (3 आठवडे) |
| 00:00:50 सल्फर | 25 10 | 8.33 | 118 ते 151 दि वस (3 आठवडे) |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |