Tur Crop 2025 तुर हे काही भागांमध्ये एक प्रमुख कडधान्य पीक आहे. विदर्भ, मराठवाडा, तसेच खानदेश परिसरात आंतरपीक व सलग पीक म्हणून याची लागवड होते. महाराष्ट्रमध्ये दरवर्षी साधारणपणे तुर पिकाखाली 13.85 लाख हेक्टर क्षेत्र असते. त्याची उत्पादकता 803 किलो/ हेक्टर तर देश पातळीवर 697 किलो/ हेक्टर इतकी आहे.

Tur Crop 2025 या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु उत्पादन मात्र त्या प्रमाणात मिळत नाही. त्यांचे महत्त्व कारण म्हणजे पिकांवर पडणारे बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोग व त्यांच्या नियंत्रणाकडे होत असलेले दुर्लक्ष, महाराष्ट्र राज्यामध्ये तूर पिकावर प्रामुख्याने खालील रोग आढळून येतात.
आले पीक नियोजन!!
Tur Crop 2025 मर रोग:
हा रोग फ्युजेरियम उडम या बुरशीमुळे उद्भवतो यालाच मर रोग म्हणतात. फुले येण्यापूर्वीच आला तर 100 टक्के नुकसान होते. तसेच शेंगा झाडावर पक्क होत असताना रोग आल्यास उत्पादनात 30 टक्के घट होत असते. या रोगाचे महत्त्व लक्षात घेता कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे तुर मररोग ग्रस्त नर्सरीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या नर्सरीमध्ये दरवर्षी मर रोगाचे प्रतीकारकता तपासण्यासाठी वेगवेगळ्या वाणाची शास्त्रीय चाचणी घेण्यात येते.

सदर नर्सरीमध्ये मररोग ग्रस्त झाडाची लक्षणे खालील प्रमाणे:
हा रोग रोप अवस्थेपासून ते परिपक्वतेच्या काळात केव्हा ही येऊ शकतो. तसेच झाडांना कळ्या लागल्यापासून ते फुलोरा येणाऱ्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
या रोगामध्ये प्रथम झाडाची शेंड्याकडील पाने कोमजतात कालांतराने पाणी पिवळी पडून जमिनीकडे झुकतात.
काही झाडांवर जमिनीपासून खोडा पर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा दिसून येतो. हे या रोगाचे ओळखण्याचे मुख्य लक्षण आहे. व नंतर फांद्या शेंड्यांकडून खाली वाढतात.
खोडाचा उभा छेद घेतल्यास त्याचा मधला भाग संपूर्ण तपकिरी काळा पडल्याचे आढळून येते.
काही झाडांवर एकाच फांदीवर मर रोगाचे लक्षणे दिसून येतात यालाच अर्धमर रोग असे म्हटले जाते.
या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बियाणे व रोगग्रस्त जमिनीतील बुरशीच्या बीजाणूपासून होतो. या बीजाणूचे कवक तंतू मुळा वाटे झाडात शिरून अन्ननलिकेत वाढत जातात. त्यामुळे अन्ननलिकेतून पाणी आणि अन्नद्रव्य घेणे बंद होते. हे बियाणे जवळपास 5 ते 6 वर्षापर्यंत जमिनीमध्ये वास्तव करतात.
मर रोगग्रस्त झाड सहजासहजी उपटले जात नाही.
वर्षांनुवर्ष एकाच शेतात रोगाला बळी पडणाऱ्या वाणाची लागवड केल्यास जमिनीमध्ये प्यूजेरियम नावाच्या बुरशीची वाढ होते व मर रोगाचा प्रसार वाढतो.
नियंत्रण:
पेरणीसाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी उदाहरणार्थ. बीएसएमआर-736 बीएसएमआर-853 आयसीपीएल-87119 आणि विपुला. विपुला (फुले तूर-9230) हे वाण मर रोगग्रस्त नर्सरीमध्ये रोगप्रतिकारकक्षम दिसत आहेत. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सन 2012 मध्ये राजेश्वरी हा तुरीचा वाण प्रसारित केलेला आहे. हा वाण रोगग्रस्त नर्सरीमध्ये मर रोगास प्रतिकारक्षम दिसून आलेला आहे. तसेच आयसीपी-2376 हा हा वाण नर्सरीमध्ये मर रोगाला 100 टक्के बळी पडणारा आहे. यामुळे या वाणाची पेरणी करू नये.
पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो 2 ग्रॅम कार्बेनडीझम + 2.0 ग्रॅम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी व शेवटी बियाणास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचे बीजप्रक्रिया करावी.
जमिनीची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी व जमीन चांगली तापू द्यावे. कारण मर रोगाची बुरशी उष्ण तापमानामुळे नष्ट होते.
ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा शेतात पिकाची लागवड करू नये.
शेतामध्ये मर रोगाची रोगट झाडे दिसताच लगेच उपटून काढावेत.
मर लागवडीच्या क्षेत्रात तृण धान्यांसारखी फेरपालटाची पिके घ्यावीत.

Tur Crop 2025 वांझ रोग:
वांझ रोगामध्ये झाडाला फुले व शेंगा येत नाहीत या रोगाचे मुख्य लक्षण आहे. वांझ या रोगाचा फक्त विषाणूमुळेच होत असून सदर रोगाचा प्रसार हा एरिओफिडमेट या कोळी जातीच्या कीटकामार्फत वाऱ्याच्या दिशेने होतो. सदर कोळी जवळपास 0.2 मिली लांबीचा असून हे कोळी साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत ते आपली अंडी कोवळ्या शेंड्यांवर टाकत असून ते आपली एक पिढी 2 आठवडे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण करतात.
वांझ रोगाला बळी पडणाऱ्या जातीची निवड केली तर या रोगामुळे 100 टक्के नुकसान देखील झालेले आहे. या रोगाचे महत्व लक्षात घेता कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, येथे वांझ रोगग्रस्त नर्सरी असून त्यामधून रोगप्रतिकारक वाणांची निवड केली जाते.
लक्षणे:
रोपावस्थेत झाडाच्या पानावर प्रथम तेलकट पिवळे डाग पडतात. अशी पाने आकाराने लहान राहतात. व कालांतराने आकसतात.
सदर पाने पिवळी पडून झाडाच्या दोन पेऱ्यातील अंतर कमी होते त्यांना अनेक फुटवे फुटतात व झाडांची वाढ खुंटते.
वांझ रोग्रस्त झाडाला फुले व शेंगा येत नसून सदर झाड शेवटपर्यंत हिरवे राहून झुडपासारखे दिसू लागते.
रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व अवस्थेच्या काळात केव्हाही आढळून येतो.
बऱ्याच वेळेस काही फांद्यावर वांझ रोगाची लागण व काही फांद्यावर शेंगा देखील लागलेल्या असतात. अशा झाडांना अर्ध विध्यत्व वांझ रोग असे म्हटले जाते.
प्रसार व वाढीस अनुकूल हवामान:
रोगप्रसारक कोळी वाऱ्याच्या दिशेने 500 मीटर पर्यंत रोग्रस्त झाडांपासून निरोगी झाडांवर वाहून नेले जातात. व तेथे विषाणू प्रसार करतात.
तुरीचा खोडवा घटलेला असेल किंवा उन्हाळ्यात आपोआप उगवलेल्या झाडांवर हे कोळी तग धरून राहतात आणि पुढील हंगामात वाढणाऱ्या तुरीच्या पिकावर सदर कोळी वांझ रोग आणण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे तुरीचा खोडवा घेऊ नये.
नियंत्रण:
आधीच्या हंगामातील बांधांवरील तुरीचा खोडवा उपटून नाश करावा.
शेतामध्ये वांझ रोग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपटून काढावीत.
पेरणीसाठी विपुला बीएसएमआर -736 बीएसएमआर -853, बहार आणि आयपीए 204 या सारख्या रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.
रोगाचा प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा डायकोफॉल 20 टक्के प्रवाही 25 मिली किंवा फिप्रोनील 25 टक्के प्रवाही 6 मिली किंवा प्रोफिनोफॉस 50 टक्के प्रवाही 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी रोगाची तीव्रता जास्त असल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
Tur Crop 2025 खोड कुजव्या लक्षणे:
हा रोग फायटोप्थोरा ड्रेश्चलेरी या बुरशीमुळे होतो.
या रोगा मध्ये झाडाची मर अतिशय वेगाने होते यामध्ये झडाची पाने अत्यंत जलदगतीने वाळतात व पाने सुसकून जाऊन वरच्या दिशेने वळतात हा रोग रोपावस्थेत पडल्यास सर्व रोपे एकदम मरून जातात.
बरेच दिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. या रोगाची लक्षणे फक्त झाडाच्या जमिनीलगत भागावरच आढळून येतात. या रोगामुळे 3 ते 5 टक्क्यांपर्यंत नुकसान झालेले आढळून आलेले आहे.
जमिनीस लागून असलेल्या खोडावर म्हणजे 10 ते 20 सेंमी. अंतरावर गर्द तपकिरी रंगाचे खोलगट लांब चट्टे दिसून येतात. सुरुवातीला ते उथळ असतात परंतु कालांतराने ते आत दबले जाऊन खोलवर जातात. तसेच फांद्यावरही असे चट्टे दिसून येतात. या चट्ट्यांवर अनुकूल वातावरणात पांढरट गुलाबी रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते.
मागील हंगामातील शेतात राहिलेली रोगग्रस्त धस्कटे व माती या पासून ह्या रोगाचा प्रसार होतो.
नियंत्रण:
शेतामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
पेरणीपूर्वी बियाणास मेटॅलॅक्सिल 35 डब्ल्यू एस 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रकिया करावी.
उथळ पाणथळ जमिनीमध्ये तुरीचे पीक घेऊ नये तसेच रोग ग्रस्त झाडी उपटून त्याचा नायनाट करावा.
Tur Crop 2025 पर्णगुच्छ लक्षणे:
पर्णगुच्छ युक्त झाडे शेतामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पटकन ओळखता येतात.
झाडांच्या शेंड्यांची वाढ थांबल्यामुळे आजूबाजूच्या फांद्या वाढतात. त्यामुळे झाडास पर्णगुच्छ आकार येतो.
या रोगाचा प्रादुर्भाव अतिशय अल्प प्रमाणात दिसून आला आहे.
पीक फुलोऱ्यात असताना या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास फुलांची संख्या कमी होऊन ती छोट्या आकाराचे वाळलेली व पोपटी रंगाची दिसून येते.
शेंगा आकाराने लहान होऊन वेड्यावाकड्या स्वरूपात दिसतात अशा शेंगातील दाणे सुरुकतलेली असतात.
या रोगात निरोगी फुलांचे रूपांतर पर्ण गुच्छामध्ये होते.
काही वेळेस झाडांच्या काही फांद्या निरोगी तर काही फांद्या पर्णगुच्छ ग्रस्त असतात.
हा रोग जिवाणू मुळे होत असून सदर जिवाणूंचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो.
नियंत्रण:
या रोगाच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% प्रवाही 10 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात किंवा इमिडायक्लोप्रिड 17.8 ओके दोन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतामध्ये रोगग्रस्त झाडे दिसून येताच त्याचा नायनाट करावा.

भुरी रोग लक्षणे:
भुरी रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या उत्तराअवस्थेत दिसून येतो.
रोगास अनुकूल वातावरण असल्यास या रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले व कळ्या यांच्यावर दिसून येतो.
या रोगाची तीव्रता जास्त असल्यास पाने पिवळी पडून आकसलेली दिसतात.
पाण्याच्या वरच्या माप खालच्या पृष्ठभागावर भूरकट रंगाचे डाग पडलेले आढळतात. हे भुरकंडा एकत्र होऊन संपूर्ण पान पांढरे पडते.
सदर रोगामध्ये पानगळ सुद्धा होऊ शकते.
Tur Crop 2025 नियंत्रण:
या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेडीझम 0.1 टक्का म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा डायथेन एम- 45, 0.25% म्हणजेच 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
रोग प्रतिकारक जातीचा वापर करावा.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |