Ginger Crop 2025 आले पौराणिक काळापासून लागवड करतात आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जीवनातील मसाल्यात आल्याचे महत्त्व स्थान आहे. ओल्या आले प्रक्रिया करून पिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरूपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याचा खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात.

Ginger Crop 2025 हवामान व जमीन:
आल्याला उष्ण व दमट हवामान मानवते थंडीमुळे आल्याची पालेवाढ थांबते व जमिनीत खोडाची वाढ सुरू होते. मात्र शेतकऱ्यांच्या अनुभवावरून असेही लक्षात आले की, साताऱ्यापासून मराठवाड्यापर्यंत पीक येऊ शकते. समुद्रकिनाऱ्याच्या भागात येथे 200 सेंमी किंवा थोडा जास्तच पाऊस पडतो. तेथे पावसाळी पाण्यावर घेतले जाते समुद्रसपाटीपासून 100 ते 1500 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात आल्याची लागवड करता येते.
पावसाळ्यात केळी व पपई पिकांची काळजी अशी घ्याल!!
आल्यासाठी मध्यम खोलीची उत्तम निचरा असलेले कसदार जमीन उत्तम असते. नदीकाठच्या पोयट्याच्या गाळमिश्रित जमिनीत आले उत्तम येते. जमिनीवर पाणी तुंबून राहिलेले या पिकास नुकसानकारक असते. तसेच जमिनीत विमलतेचे प्रमाण जास्त नसावे, एकाच जमिनीत मात्र वरचेवर आले घेऊ नये कारण, त्यावर येणाऱ्या मर रोगाचे नियंत्रण करणे अवघड जाते.

Ginger Crop 2025 पूर्व मशागत:
आल्याचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे सखोल पूर्व मशागत करणे गरजेचे असते. जमीन लोखंडी नांगराणे 30 ते 40 सेमी खोल उभी आडवी नांगरून घ्यावी. कुळव्याच्या पाळ्या देऊन माती भुसभुशीत करून घ्यावी. या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची आखणी निरनिराळ्या पद्धतीने केली जाते. हळव्या जमिनीत सपाट वाफे पद्धत मध्यम व भारी जमिनीत सरीवर वरंबे पद्धत वापरतात. जमिनीत हेक्टरी 40 गड्ड्यांपर्यंत 20 टन शेणखत टाकावे.
महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत रुंद वरंबाची पद्धत फायदेशीर ठरले आहे. सपाट वाफे 3 बाय 2 मीटर आकाराचे असतात. 2 वरंब्यात 60 सेमी अंतर ठेवतात. तर गादीवाफ्यावर लागवड करताना 3 बाय 1 मीटर आकाराच्या 15 ते 20 सेमी उंच वाफ्यावर लागवड करतात.
Ginger Crop 2025 बीज प्रक्रिया करण्यासाठीचे प्रमाण:
पाणी 100 ली. + सि.बी.झेड-50: 200 ग्रॅम + सुदामा 50 मिली + ह्युमिफोर / हंस 200 मिली
वरील तयार केलेल्या द्रावणात आल्याचे बियाणे 10-15 मिनिटे बुडवून लागणीसाठी वापरावे. या मुळे कंदकुज नियंत्रित होते. व उगवण क्षमता वाढण्यास मदत होते.
लागणी वेळी खतांचा डोस प्रति एकर
10:26:26-4 बॅग + दुय्यम अन्नद्रव्ये 2 बॅग फोरेट-जी 7 किलो + एसआरपी 9: 1 बॅग किंवा मॅक्सवेल-एस 5 किलो निंबोळी पेंड 5 बॅग + न्युट्रीपंच 10 किलो
लागणी नंतर 25, 45 व 50 दिवसांनी खालील प्रमाणे ड्रेचिंग किंवा आळवणी द्यावी.
25 दिवसांनी पाणी 100 ली. सि.बी.झेड-50 : 200 ग्रॅम + सुदामा 50 मिली + समरूप ह्युमिफोर / हंस 300 मिली + 19:19:19-300 ग्रॅम (पूर्ण उगवण झाल्या नंतर पहिले ड्रेचिंग करावे)
हळदीमध्ये कंदकूज झाल्यास रुटगार्ड -2.5 मिली + सिलीस्टीक 0.25 मिली घेवून ट्रेंचिंग करावे व यानंतर 15-20 दिवसांनी दुसरे ट्रेंचिंग करावे.
45 दिवसांनी पाणी 100 ली. रामबाण 300 मिली / ब्लुफोर 250 ग्रॅम + सुदामा 50 मिली.
50 दिवसांनी पाणी 100 ली + 13:40:13-500 ग्रॅम + हंस 300 मिली + मॅक्सवेल डिएफ 300 मिली.
(वरील ड्रेचिंग / आळवणी केल्या मुळे पांढरी मुळी वाढते, पिकाची वाढ चांगली होते तसेच कंदमाशी व कंदकूज यांना
अटकाव होतो.)
लागणी नंतर एका महिन्याने हंस 1 ली. 19:19:19-3 किलो + सुदामा 750 मिली + ब्लूफोर 1 किलो ड्रीपमधून द्यावे.

Ginger Crop 2025 भरणी व्यवस्थापन:
पहिली भरणी लागणी नंतर 70-75 दिवसांनी (2-2.5 महिने) खालील खते घालून करावी.
डी.ए.पी. 5 बॅग पोटॅश 2 बॅग मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो + गंधक 10 किलो + एस.आर.पी .9 1 बॅग निंबोळी पेंड 5 बॅग + मॅक्सवेल-एस 5 किलो किंवा न्युट्रीपंच 10 किलो + ह्युमिफोर-जी 10 किलो + फोरेट-जी 7 किलो प्रति एकर द्यावे.
दुसरी भरणी लागणी नंतर 4 ते 4.5 महिन्यांनी खालील प्रमाणे करावी.
डी.ए.पी. 3 बॅग पोटॅश 2 बॅग मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो + गंधक 10 किलो + एसआरपी 9 1 बॅग निंबोळी पेंड 3 बॅग + मॅक्सवेल-एस 5 किलो किंवा न्युट्रीपंच 10 किलो + ह्युमिफोर-जी 10 किलो + फोरेट 5 किलो प्रति एकरी द्यावे.
फुटव्यांची संख्या वाढविण्या साठी ॲमिनोलाईट 1 लिटर/एकर ड्रिपमधून द्यावे. व दोन दिवसांनी मॅक्सवेल डिएफ 1 ली + फुलविलाईट 500 ग्रॅम + सिलिस्टिक 200 मिली / एकर ड्रिपमधून द्यावे.
Ginger Crop 2025 फवारणी व्यवस्थापन:
लागणी नंतर 25-30 दिवसांनी करपा व पाने खाणारी व गुंडाळणारी अळी नियंत्रणासाठी खालील प्रमाणे फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली. सी.बी.झेड-50:200 ग्रॅम + हंस 200 मिली + सुदामा 50 मिली + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 100 ग्रॅम + स्टिकफोर 100 मिली. किंवा पाणी 100 ली + सिफॉन 150 मिली + सिलीस्टीक 30 मिली.
लागणी नंतर 40 दिवसांनी करपा व रसशोषक किडींच्या नियंत्रणा साठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली + सुदामा 50 मिली + ब्लुफोर 150 ग्रॅम.
करपा रोगाच्या नियंत्रणा साठी फवारणी सिफॉन 150 मिली + सिलिस्टिक 30 मिली + पाणी 100 ली. (सदरच्या द्रा वणा मध्ये कोणतेही बुरशी नाशक, किटकनाशक किंवा मायक्रो न्युट्रीयंट मिसळू नये)
लागणी नंतर 50 दिवसांनी अळी , पाना वरील चट्टे यांच्या नियंत्रणा साठी तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्या साठी खालील प्रमाणे फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली. + स्लोगन 40 ग्रॅम क्लोरो 50 % 150 मिली + यु.एस. झायटॉप 250 मिली + एस.आर.पी. 200 ग्रॅम + स्प्रेवेल 150 ग्रॅम + स्टारफोर्स 200 मिली.
लागणी नंतर 80-85 दिवसांनी करपा व रसशोषक किडींच्या नियंत्रणा साठी तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्या साठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली. + मेटॅलॅक्झील 8% + मॅन्कोझेब 64% 200 ग्रॅम + स्लोगन 40 ग्रॅम एस.आर.पी 200 ग्रॅम + स्ट्रॉबेरी 100 ग्रॅम
लागणी नंतर 90-100 दिवसांनी खालील फवारणी करपा रोगाच्या नियंत्रणा साठी घ्यावी.
पाणी 100 ली. + रामबाण 200 मिली + झेड-78: 200 ग्रॅम किंवा पाणी 100 ली. सिफॉन 150 मिली. + सिलिस्टिक 30 मिली.
लागणी नंतर 110 दिवसांनी आले लागू नये म्हणून ड्रिपमधून रामबाण 3 ली. + एस.आर.पी . 9 : 4.5 किलो प्रति एकर द्यावे.
लागणी नंतर 120-130 दिवसांनी ड्रीपमधून प्रति एकर 12:61:00 7 किलो रुटशाईन 500 ग्रॅम + मॅक्सवेल-एस 1 किलो 10 दिवसाच्या अंतराने 4 वेळा पांढरी मुळी वाढण्या साठी तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्या साठी द्यावे.
आल्याच्या कुडीचे वजन वाढविण्यासाठी तसेच गुणवत्ता सुधारण्या साठी 180-200 दिवसांनी 00:52:34-7 किलो + एस.आर.पी. 9 : 2 किलो प्रति एकर 10 दिवसाच्या अंतराने 250 दिवसां पर्यंत ड्रिपमधून द्यावे.
कॅलस्ट्रोक मिल्की 6 महिन्या नंतर एकरी 2 ली. ड्रिपमधून द्यावे. लागणी नंतर 150-200 दिवसांनी फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली + 00:52:34-400 ग्रॅम + स्टारफोर्स 200 मिली + सायमो / (सायमोक्झीनील 8% + मॅन्कोझेब 64%) 200 ग्रॅम + स्लोगन 40 ग्रॅम + डायक्लोरोव्हास 100 मिली.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी व तसेच कॅल्शियमच्या पुरवठ्यासाठी खालील फवारणी घ्यावी:
100 ली. पाणी + सुमॅक 200 मिली + 00:00:50-200 ग्रॅम + सी.बी.झेड.-50 200 ग्रॅम.
(सु-मॅक मध्ये असलेल्या चिटोसानमुळे आले पिकास ऑरगॅनिक कॅल्शियम मिळतो. त्यामुळे पाने रसरशीत व हिरवी गार राहतात त्या मुळे अन्नसाठा वाढून कंदाचे पोषण होते.)
(आले लागल्यास ब्लुफोर 250 ग्रॅम + पेनिट्रेटर 300 मिली + मेटॅलॅक्झील 200 ग्रॅम + सुदामा 50 मिली प्रति 100 ली. पाण्यातून ड्रेचिंग करावे व 5 दिवसांनी रामबाण 500 मिली + एस.आर.पी. 200 ग्रॅम प्रति 100 ली. पाण्यातून ड्रेचिंग करावे.)

Ginger Crop 2025 टीप :
आले काढणी अगोदर 3 आठवडे 00:00:50 10 किलो + एस.आर.पी -9 4.5 किलो ड्रिपमधून 8-10 दिवसाच्या अंतराने 2 वेळा द्यावे. यामुळे आल्याचे वजन वाढते व गुणवत्ता सुधारते. माती परिक्षण अहवालानुसार शेड्युलमध्ये दिलेल्या अन्नद्रव्यांचे वर्गीकरण करून त्यानुसार खतांची मात्रा द्यावी. तसेच शेणखत व पेंडीचा वापर सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी करावा.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |