पावसाळ्यात केळी व पपई पिकांची काळजी अशी घ्याल!! Banana and Papaya Crops 2025

Banana and Papaya Crops 2025 पावसाळा म्हटलं म्हणजे पाऊस अनिश्चित वेळ त्याची तीव्रता ही अनिश्चितच, वातावरणात आद्रतेचे जास्तीचे प्रमाण, जोराचे वादळ, कधी कधी गारपीटसुद्धा असते. केळी आणि पपई हि दोन्ही द्विवार्षिक पिके उष्णकटिबंधीय पिके हवामानाच्या थोड्या बदलांसही अतिशय संवेदनशील. शेतात पावसाच्या अतिरिक्त पाणी साचले तर जमिनीतले हवेचे प्रमाण कमी होऊन मुळांना इजा होते.

Banana and Papaya Crops 2025

Banana and Papaya Crops 2025 जास्त काळ पाणी शेतात साचून राहिल्यास मुळ्या सडतात केळीत मातृकंद खराब होतो. पपई पिकात मुळ्या व बुंधा सड होऊन नुकसान होते. यामुळे झाडे उन्मळून पडतात. अशा परिस्थितीत खूपच नुकसान होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घड सटकणे, झाडे अर्ध्यातून मोडणे किंवा झाडे उन्मळून पडणे या प्रकारचे नुकसान होते. जास्तीची आद्रता हवेत असणे सुद्धा खूप नुकसानकारक ठरते.

मिरची पीक नियोजन!! 

Banana and Papaya Crops 2025 यामुळे विविध बुरशीजन्य, जिवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोगजंतूंची वाढ होते. अन्नद्रव्य पुरेशी शोषली जात नसल्याने झाडे शारीरिकदृष्ट्या अशक्त राहतात. ती या रोगजंतूच्या प्रादुर्भावास बळी पडतात. रोगाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरतात आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

WhatsApp Group Join Now

Banana and Papaya Crops 2025 केळी:

बागेची सर्वसाधारण स्वच्छता : रोगयुक्त पाणी कोरडी वाळलेले पाणी कापावे बागे बाहेर नेऊन कंपोस्ट खड्ड्यात टाकावेत किंवा पाण्याचा रोगट भाग काढून तो जाळून नष्ट करावा. शेत तनमुक्त ठेवावे वाफसा असताना कुळव्याच्या साह्याने 2 ओळीतली तने काढावीत. झाडाजवडील तने खुरपीच्या साह्याने काढावीत. घडाच्या दांड्यांवरील केळपत्रि काढावी. व केळ फळाच्या अंगभागावर असलेल्या फुलांचा भाग काढावा. घडांवरील शेवटचे पान नवीन केळींना घासणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. बागेतील केळ कमळे तोडून विल्हेवाट लावावी. मुख्य बुंध्यांशेजारी येणारी पिल्ले धारदार विळीने कापावे, ही पिल्ले नियमित कापावीत.

Banana and Papaya Crops 2025 अंतर मशागत:

नवीन लागवडीत नांग्या झाल्यास त्या भराव्यात. बागेची दोन्ही बाजूने कुळवणी करावी. झाडांजवळील तणे काढावीत झाडांना मातीची भर लावावी. रोगट पाने किंवा पाण्याचा भाग कापून झाड नष्ट करावा. रस शोषणाचा किडींचा प्रादुर्भाव असल्यास योग्य त्या शिफारसीत कीडनाशकाची फवारणी करावी. बागेत इर्विनिया रॉट या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्या पुढील प्रमाणे आवळणी करावी यासाठी 200 लिटर पाण्यात 600 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्‍लोराईड + 600 मिली क्लोरोपायरीफॉस + 30 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट यांचे संयुक्त द्रावण करून प्रति झाड 1 लिटर याप्रमाणे आवळणी करावी.

अन्नद्रव्य व पाणीपुरवठा व्यवस्थापन:

शिफारसीत मात्रेत अन्नद्रव्य मुख्य व सूक्ष्म द्यावेत. सध्या पावसाळी हंगाम असल्याने दिलेल्या अन्नद्रव्यांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर होत नाही. अशावेळी झाडांवर फवारणीतून पाण्यात विरघळणारी खते उदा. 19:19:19 फवारावेत. त्यामुळे अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे दिसणार नाहीत पावसाळ्यात पाणीपुरवठा व्यवस्थापन हे पीक वाढीच्या अवस्था, हवामान, पावसाचा खंड, या बाबी विचारात घेऊन करावे.

WhatsApp Group Join Now

Banana and Papaya Crops 2025 घड व्यवस्थापन:

घडात इच्छित फण्या ठेवून घडाच्या खालच्या फण्या कापाव्यात. घडावर 0.5 टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट 1 टक्का युरिया यांच्या संयुक्त द्रावणाची फवारणी करावी. नंतर घड पॉलीप्रॉपिलीन पिशवीने झाकावा. फुल किडीचे प्रभावी नियंत्रण व्हावे म्हणून घडावर 3 टक्के व्हर्टिसीलियम लेकॅनि या जैविक कीडनाशकाची फवारणी करावी. या दोन्ही संस्कारामुळे केळीच्या फळांची वाढ व गुणवत्ता वाढीस लागते.

कापणी योग्य घडाची काढणी करावी काढणीनंतर त्या उभ्या झाडांची सर्व पाने काढावी. अतिरिक्त पावसाचे पाणी साचल्यास ते बागे बाहेर काढावे.

बागेत जास्त पाणी साचल्यास आवळणी करावे आवळणीसाठी कॉपर ऑक्सिक्‍लोराईड (300 ग्रॅम) प्रति 100 लिटर पाण्यात घेऊन झाडांच्या अवस्थेत परत्वे प्रति झाड 1 लिटर या प्रमाणात घालावे.

सिगाटोका या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावित पाने किंवा पानाचा तेवढा भाग काढून नष्ट करावा. झाडांवर प्रथम स्पर्शजन्य घोषित बुरशीनाशकाची व नंतर 10 ते 15 दिवसांनी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.

Banana and Papaya Crops 2025 पपई पिक व्यवस्थापन:

सर्वसाधारण बागेची स्वच्छता राखावी. शेत तणमुक्त ठेवावे. कोरडी, रोगट पाने, प्रादुर्भाव फळे शेतातून वेचून बागेबाहेर नेऊन नष्ट करावे.

शेतात पावसाचे पाणी साचू देऊ नये ते बागे बाहेर जाण्यासाठी उतार बघून चर काढावेत.

डोळे पडतील फळे वेळोवेळी काढावेत विक्रीस पाठवावीत.

नवीन लागवडित विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करा.

बुरशीजन्य रोग जसे पानावरील ठिपके मूळसड बुंधासड यासाठी शिफारसी बुरशीनाशकाची फवारणी करावी. कॉपर ऑक्सिक्‍लोराईड बाविस्टीन तसेच आवळणीसाठी डायथेन एम 45 आणि बाविस्टीन किंवा रिडोमिल यांचा वापर करावा.

Banana and Papaya Crops 2025 खते व पाणी व्यवस्थापन:

पपई पिकास दर 2 महिन्यांनी 50 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद व 50 ग्रॅम पालाश द्यावे. प्रती झाड किमान 10-15 किलो शेणखत द्यावे.

पपई सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्यास चांगले उत्पादन व गुणवत्ता मिळते.

बागेभोवती सजीव कुंपण करावे.

काही पपई वाणात फळे गुच्छात येतात, फळांची विरळणी करावी.

अशा पद्धतीने केळी व पपई पिकांचे पावसाळ्यात काळजी घ्यावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment