Chilli Crop 2025 भाजीपाला पिकांमध्ये मिरची हे नगदी पीक आहे. बाजारात वर्षभर हिरव्या मिरचीला मागणी असते. आपल्या दररोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे. मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. अ, बी, क आणि ड जीवनसत्व असलेली मिरची रक्तवर्धक आणि कृमीनाशक आहे.

Chilli Crop 2025 मिरचीची लागवड वर्षभर केली जाते उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. अशा या भाजपाला वर्गातील विविध पिकावर अनेक किडी येतात व पिकाचे नुकसान करतात.
वनस्पतीजन्य कीटकनाशके व त्यांचा उपयोग!!
Chilli Crop 2025 बीजप्रक्रिया:
लागवडी पुर्वी 2-3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणास चोळावे. यामुळे बियाण्याद्वारे पसरणाऱ्या मर रोगा पासून मिरचीचे संरक्षण होते.
रोपवाटीकेत रोपांच्या वाढीसाठी व बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बी पेरतेवेळी प्रत्येक वाफ्यात शेणखत 5 किलो + समरूप 19:19:19- 1 किलो + एस.आर.पी. 9 : 1 किलो + ह्युमिफोर – जी 1 किलो + सि.बी.झेड -50 : 100 ग्रॅम मातीत मिसळावे.
मिरचीची रोपे उगवून आल्यानंतर 10-15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यात ब्लूफोर 2 ग्रॅम + सि.बी.झेड-50 : 2 ग्रॅम प्रति ली. पाणी किंवा रामबाण 2.5 मिली प्रति ली. पाणी याप्रमाणे आळवणी करावी (जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणारा मूळकूज रोग थांबविण्यासाठी)
रोपे 3-4 आठवड्याची झाल्यानंतर सुदामा 0.5 मिली किंवा स्लोगन 0.4 ग्रॅम + अबामेक्टीन 0.5 ग्रॅम प्रति ली. पाण्यातून फवारणी घ्यावी. यामुळे फुलकिडे, तुडतुडे व पांढरी माशी या किडी तसेच बोडक्या (पर्णगुच्छ) या रोगा पासून संरक्षण होते.
मिरचीची लागण करतेवेळी रोपे खालील द्रावणात बुडविल्यास रोपांची वाढ जोमदार होते. तसेच रोग व किडींना अटकाव होतो.
पाणी 100 ली. + सुदामा 50 मिली + ह्युमिफोर 200 मिली + सी.बी.झेड-50 : 150 ग्रॅम + स्ट्रॉबेरी 50 ग्रॅम.

Chilli Crop 2025 खत व्यवस्थापन:
शिमला /ढोबळी मिरची:
लागणीच्या वेळी डिएपी 3 बॅग + एस.आर.पी. -9 :1 बॅग + गंधक 10 किलो + सल्फेट ऑफ पोटॅश 1 बॅग + मॅक्सवेल-एस 5 किलो+ ह्युमिफोर- जी 10 किलो प्रति एकर द्यावे.
लागणी नंतर 30 दिवसांनी अमोनियम सल्फेट 2 बॅग प्रति एकरी द्यावे.
लागणी नंतर 50 दिवसांनी अमोनियम सल्फेट 1 बॅग + युरिया 25 किलो + एस.आर.पी .-9 : 9 किलो + मॅक्सवेल-एस 5 किलो + ह्युमिफोर-जी 5 किलो. प्रति एकर द्यावे.

मिरची (ज्वाला): Chilli Crop 2025
लागणीच्या वेळी डिएपी 2 बॅग + सल्फेट ऑफ पोटॅश 1 बॅग + गंधक 10 किलो + एस.आर.पी .- 9 : 1 बॅग + मॅक्सवेल-एस 5 किलो+ ह्युमिफोर- जी 10 किलो प्रति एकर द्यावे.
लागणी नंतर 30 दिवसांनी डि.ए.पी . 1 बॅग + अमोनियम सल्फेट 25 किलो + युरिया 25 किलो + एस.आर.पी . -9 : 1 बॅग +
मॅक्सवेल-एस 5 किलो + ह्युमिफोर-जी 5 किलो प्रति एकर द्यावे.
रोपांची लागण झाल्यानंतर 5-6 दिवसांनी ड्रिपमधून एकरी 1 किलो रुटशाईन + 1 किलो थायोव्हीट द्यावे. यामुळे मूळांचा विकास होऊन पिकाची वाढ चांगली मिळते.
Chilli Crop 2025 आळवणी:
मिरचीचे मर रोग किंवा रोपे कोलमडणे यापासून संरक्षण करण्यासाठी लागणी नंतर 25-30 दिवसांनी खालील प्रमाणे ड्रेचिंग / आळवणी घ्यावी.
पाणी 100 ली + पेनिट्रेटर 250 मिली + कोसाईड 125 ग्रॅम किंवा कॉपर-टॉप 50 ग्रॅम + एस.आर.पी . 200 ग्रॅम + ब्लीचींग पावडर – 200 ग्रॅम.
वरिल ड्रेचिंग नंतर 10 ते 15 दिवसांनी खालील आळवणी द्यावी.
पाणी 100 ली. + मोरचूद 300 ग्रॅम + चुना 300 ग्रॅम + एस.आर.पी. 200 ग्रॅम + ब्लीचींग पावडर 200 ग्रॅम.
रोपाची चांगली वाढ होण्यासाठी व रोग व किडीं पासून संरक्षण होण्या साठी 8-10 दिवसांच्या अंतराने खालील मिश्रणाच्या 3-4 फवारण्या घ्याव्यात.
पाणी 10 ली. + हंस 25 मिली + एस.आर.पी. 20 ग्रॅम + सुदामा 5 मिली + सि.बी.झेड-50: 10 ग्रॅम.
सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्या साठी खालील प्रमाणे फवारणी घ्यावी.
पाणी 10 ली. + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 10 ग्रॅम + मेगा-मॅग 3 ग्रॅम + एम-45 : 25 ग्रॅम.
मिरचीतील फळधारणा वाढविण्यासाठी तसेच फुलगळ कमी करण्यासाठी सुपरस्टार-9 : 2 मिली प्रति ली. पाण्यातून फवारणी साठी वापरावे. तसेच तोडा सुरु झाल्या नंतर 15 दिवसांच्या अंतराने फवारण्या घ्याव्यात.
फळांचा आकार व गुणवत्ता वाढविण्या साठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 10 ली + आयकॉन शाईन 10 मिली + समरूप 13:00:45 : 30 ग्रॅम + टायकून 3 मिली + सि.बी.झेड – 50 : 10 ग्रॅम.
ठिबक सिंचनातून सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्या साठी एकरी 2 ली. मॅक्सवेल डिएफ किंवा 2 किलो मॅक्सवेल-एस + मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो याप्रमाणात प्रत्येक महिन्यास द्यावे.
मिरचीतील लीफ कर्ल (चुरडा मुरडा) रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडी नंतर 25-30 दिवसांनी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 10 ली + एस.आर.पी . 20 ग्रॅम + सुदामा 5 मिली किंवा स्लोगन 4 ग्रॅम ही फवारणी 4-5 वेळा 15 दिवसांच्या अंतराने घ्यावी.
कोळी नियंत्रणासाठी डायमाईट 2.5 मिली किंवा इथिऑन 2.5 मिली + थायोव्हीट 0.5 ग्रॅम/ली. पाण्यातून अलटून पलटून फवारणी घ्यावी.

मिरचीतील फळकूज व कांडी करपा कमी करण्यासाठी खालील फवारणी 15 दिवसाच्या अंतराने 3-4 वेळा घ्यावी.
पाणी 100 ली + एस.आर.पी. 200 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन – 2 पुड्या + ब्लुफोर 250 ग्रॅम + सी.बी.झेड-50-100 ग्रॅम.
पिका वरील झिंक व फेरसची कमतरता भरून काढण्या साठी झिंक व फेरो-चिल यांचा वापर ड्रीपमधून एकरी 1 किलो याप्रमाणात करावा किंवा फवारणी साठी 0.5 ग्रॅम प्रति ली. याप्रमाणात वापरावे.
मिरची ची तोडणी / तोडे सुरु झाल्यानंतर 00:52:34 – 2 ग्रॅम सि.बी.झेड-50 : 1 ग्रॅम + शुगर-फास्ट 2 मिली याप्रमाणात फवारणी घेतल्यास वजन वाढते तसेच चकाकी व टिकवण क्षमतेत वाढ होते व त्यामुळे बाजारात मागणी व दर वाढतो.
भुरी व करपा रोगाच्या नियंत्रणा साठी तसेच कांडी करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 ली. + सु-मॅक 200 मिली.
सदरच्या फवारणी मुळे चिटोसान स्वरुपात असलेले ऑरगॅनिक कॅल्शियम मिळाल्या मुळे मिरचीचे वजन वाढते. तसेच फूल व फळगळ कमी होते. व रोग व किडींचे प्रमाण आटोक्यात येते.
Chilli Crop 2025 टीप :
माती परिक्षण अहवाला नुसार सदरच्या खत नियोजना मध्ये बदल करू शकता, तसेच सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी पेंडी व शेणखताचा वापर करावा.
इतर माहितीसाठी | येथे क्लीक करा |