Cotton Crop 2025 कापूस या पिकास पांढरे सोने असे संबोधले जाते. विदर्भ, मराठवाडा व खानदेश या भागात कापूस हे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

Cotton Crop 2025 कापसा मध्ये मुख्यत्वे रस शोषणाऱ्या किडी (मावा, तुडतुडे, पांढरी माशी व पिठ्या ढेकूण), बोंडे पोखरणाऱ्या अळ्या (अमेरिकन बोंड अळी, ठिपक्यांची बोंड अळी व शेंदरी बोंड अळी ), लाल्या रोग, मररोग, बुरशीजन्य करपा, जिवाणूजन्य करपा, मूळकूज व भूरी या प्रमुख समस्या उद्भवतात. कपाशीची उगवण झाल्या नंतर 8-10 दिवसानंतर एकरी ह्युमिफोर किंवा 1 लीटर रुटशाईन 1 किलो दिल्यास चांगला परिणाम मिळतो.
वांगी पीक नियोजन!!
Cotton Crop 2025 रसशोषक किडीं पासून कपाशीचे रक्षण करण्यासाठी पेरणी नंतर 21-30 दिवसा नंतर खालील फवारणी घ्यावी.
पाणी 100 लीटर + सुदामा 60 मिली + हंस 200 मिली किंवा सुपर हंस 100 मिली + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 150 ग्रॅम + सी.बी.झेड. -50 100 ग्रॅम किंवा

पाणी 100 लीटर + स्लोगन 40 ग्रॅम + हंस 200 मिली किंवा सुपर हंस 100 मिली + स्ट्रॉबेरी / स्प्रेवेल 150 ग्रॅम + सी.बी.झेड- 50 100 ग्रॅम.
वरील फवारणी मुळे रसशोषक किडींचा बंदोबस्त होतो. पिकास सुक्ष्म अन्नद्रव्ये पुरविली जातात. हंसमुळे कपाशीस फुटवे निघाल्या मुळे रोपांचा आकार डेरेदार होतो . सी.बी.झेड – 50 मुळे बुरशी जन्य करपा आटोक्यात येतो.
कपाशीच्या वाढीच्या काळामध्ये व पाते निघण्याच्या काळामध्ये खालील फवारणी घ्यावी.
- Cotton Crop 2025 पाणी 100 लीटर + बोरो-क्विक 100 ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट 300 ग्रॅम + स्ट्रॉबेरी /स्प्रेवेल 100 ग्रॅम + समरूप 19:19:19 300 ग्रॅम + एस.आर.पी. 200 ग्रॅम या प्रमाणात फवारणी घ्यावी. म्हणजे पाते गळ किंवा बोंडे गळणे समस्या थांबते व कपाशीच्या बोंडाचा विकास चांगला होतो.
- ज्या जातीं मध्ये बोंडाची संख्या कमी मिळते. अशा जातींची उत्पादकता वाढवण्या साठी सुपरस्टार-9 2 मिली / लीटर या प्रमाणात पाते निघण्या अगोदर 15 दिवस फवारणी घेतल्यास चांगले परिणाम मिळतात.
- रसशोषक किडींचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल या मुळे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कपाशीवर होऊ शकतो.
- लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खालील फवारणी 2-3 वेळा पिकाच्या बोंडे धरल्या नंतरच्या कालावधी मध्ये घेतल्यास लाल्या रोगाची समस्या बऱ्याच अंशी कमी करता येते.
- पाणी 100 लीटर यूरिया 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 400 ग्रॅम – एसआरपी 200 ग्रॅम + स्ट्रॉबेरी 100 ग्रॅम.
- ठिबक सिंचनाद्वारे कपाशी सदर 15 दिवसांच्या अंतराने विद्राव्य खतां सोबत 1-1.5 किलो एसआरपी -9 व 2 किलो मॅक्सवेल-एस चा वापर केल्यास कपाशीची गुणवत्ता चांगली मिळते व उत्पादनात वाढ होते.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |