Sugarcane Management 2025 महाराष्ट्रात एकूण 10 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यातील अंदाजे 40 टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावर उसाचे खोडवा पीक ठेवले जाते.

Sugarcane Management 2025 वास्तविक खोडवा उसाचे उत्पादन हे सरासरी लागणी पेक्षा जास्त येण्यास हवे मात्र, तसे होताना दिसत नाही म्हणून खोडवा उत्पादन वाढीसाठी विद्यापीठाने विकसित केलेली शिफारसीत तंत्रज्ञान वापरल्यास त्याचा नक्की फायदा होईल.
बाजारात वाढली सोयाबीनची आवक कसा मिळतोय दर!!
Sugarcane Management 2025 उसाच्या पाचटामध्ये 0.7 टक्के नत्र, 0.2% स्फुरद व 1 टक्का पालाश असते. एका हेक्टर क्षेत्रातून खोडव्यासाठी 8 ते 10 टन पाचट उपलब्ध होते. त्यातून 50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, व 75 ते 100 किलो पालाश जमिनीत उपलब्ध होतो व अंदाजे 4000 किलो सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये साठवता येतो त्यामुळे असे पाचट जाळू नये. अशा पाचटाचे आच्छादन केल्यास 50 टक्के पाण्याची बचत होते व दुष्काळी परिस्थिती मध्ये देखील ऊस पिक तग धरून उत्पादन देते.

Sugarcane Management 2025 काही विशेष बाबी
15 फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुटलेल्या उसाचा खोडवा अधिक उत्पादनक्षम असतो.
4*2, 5*2 फूट किंवा पट्टा पद्धत असणाऱ्या ऊस लागणीचा खोडवा ठेवावा त्यामुळे अशा सऱ्यामध्ये पाचट दाबणे, गाढणे, पाणी देणे, सोपे होते. सुरुवातीला उसाचे पाचट बुडख्यांपासून दूर करावे जेणेकरून सूर्यप्रकाशामुळे त्यांना नवे कोंब फुटतात. गरज पडल्यास बुडखे समांतर जमिनीस छटावेत व त्यावर 1 टक्के बाविस्टीनची फवारणी करावी.
40 टनापेक्षा अधिक हेक्टरी उत्पादन देण्याऱ्याच लागणीचा खोडवा ठेवावा.
लागणी उसात कानी, तांबेरा, पोक्का, बोईंग, जीएसडी इत्यादींचे प्रमाण 20 ते 40 टक्के पेक्षा अधिक नसलेल्या लागणीचा खोडवा ठेवावा.
खोडवा उसात हेक्टरी 500 किग्रॅ शेणखतामध्ये 60 किलो गंधक व 400 किग्रॅ सिलिकॉन किंवा यूएसके कंपनीचे एस आर पी 9- 9 किलो प्रति एकर या प्रमाणात 15 दिवसाच्या आत द्यावे बगला फोडून पहारीच्या अवजाराने खते द्यावीत.
लोहाची कमतरता जाणवल्यास खोडव्यात केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशा ठिकाणी प्रतिलिटर पाण्यात 5 किलोग्रॅम झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेट सल्फेट, व 25 ग्रॅम युरिया याची फवारणी 40 ते 60 दिवसाच्या नंतर करावी. याच्या दोन तीन फवारण्या गरजेनुसार द्याव्यात.

Sugarcane Management 2025 खते देण्याच्या 10 ते 15 दिवसांनी युरिया 5 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट 7 आणि एमओपी 2 गोण्या प्रति हेक्टरी 90 ते 120 दिवसांनी-युरिया 6 गोण्या हेक्टरी सिंगल सुपर फॉस्फेट 7 आणि एमओपी 2 गोण्या प्रति हेक्टरी
रासायनिक खतांना पूरक म्हणून जिवाणू खतांचा वापर ठरतो. त्यामुळे रासायनिक खताची बचत होते. त्यासाठी 2 लिटर ऍझेटोबॅक्टर व 2 लिटर पीएसबी ची फवारणी 50 व 90 व्या दिवशी संध्याकाळी करावी. त्यामुळे नत्राचे 50 टक्के व स्फुरदाची 25 टक्के बचत होते.
बुडखे छाटणी बगला फोडणे इत्यादी. कामे वेळेवर केल्याने नवे कोंब जोमाने फुटतात व रोग व कीडग्रस्त फुटवे छाटले जातात. बगला फोडल्याने अनावश्यक मुळांची संख्या कमी होऊन नवीन पांढरी मुळे वाढतात.
आंतरमशागत करताना सुरुवातीला अडीच ते तीन महिन्यांपर्यंत प्रत्येक बेटास 4 इंच माती लावावी खते मातीआड द्यावीत. 4 महिन्यानंतर मोठी भरणी करावी त्यामुळे फुटव्यांची संख्या मर्यादित राहते.
खोडवा पिकामध्ये टरबूज, खरबूज, काकडी, इत्यादी वेल वर्गीय पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत.

| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |