मिरची पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन!! Chilli Crops 2025

Chilli Crops 2025 भाजीपाला पिकांमध्ये मिरची हे नगदी पीक आहे. बाजारात वर्षभर हिरव्या मिरचीला मागणी असते. आपल्या दररोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे. मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. अ, बी, क आणि ड जीवनसत्व असलेली मिरची रक्तवर्धक आणि कृमीनाशक आहे.

Chilli Crops 2025

Chilli Crops 2025 मिरचीची लागवड वर्षभर केली जाते उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. अशा या भाजपाला वर्गातील विविध पिकावर अनेक किडी येतात व पिकाचे नुकसान करतात. या किडी व त्यांच्यावरील उपाय योजना संदर्भात आपण या लेखात सविस्तर माहिती देऊ.

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन!!

Chilli Crops 2025 फळे पोखरणारी अळी :

ही कीड बहुतेक वर्गातील असून तिच्या अळी अवस्थेमध्ये पिकास मोठ्या प्रमाणात नुकसान करते. सर्व भाजीपाला पिके, डाळवर्गीय पिके, ज्वारी, टोमॅटो, इत्यादी. पिकांमध्ये ही कीड आढळून येते. या किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोश, प्रौढ या चार वेगवेगळ्या अवस्थांमध्ये पूर्ण होतात. अळीच्या देखील पाच अवस्था असतात.

WhatsApp Group Join Now

तिसऱ्या अवस्थेतील अधिक नुकसानकारक असते. मादी पतंग, कोवळ्या शेंड्यांवर, फुलांवर किंवा कळीवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाची एक एक अंडी घालतात. अंड्यातून बारीक अळी आणि बाहेर पडल्यावर सुरुवातीचे दोन अवस्थेतील आणि मिरचीच्या कोवळ्या शेंड्यांवर असलेले पाणी खरडून खातात.

कळ्या, कोवळी फळ खाते. मोठे अळी फळावर उपजीविका करताना तिच्या शरीराचा अर्धा भाग फळांमध्ये व अर्धा बाहेर ठेवून विष्टा बाहेर टाकते. त्यानंतर आपला मोर्चा दुसरा फळाकडे वळवते काही वेळेला ही अळी फळांमध्ये लपून राहते. आणि फळांचा आतील भाग खाते. अशाप्रकारे ती पिकांमध्ये नुकसान करत असते.

Chilli Crops 2025 फुलकिडे (थ्रिप्स) :

ही कीड अतिशय लहान व नाजूक असते. 1 मिमी पेक्षा कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर असते. या किडीच्या पंखाच्या कणा केसाळ असून सूक्ष्मदर्शक यंत्रणे त्या बघता येतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात. व प्रथम तो भाग पांडुरंगा आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले, कळ्या अकसतात. झाडांची वाढ खुंटते. चुरडा-मुरडा हा विषाणूजन्य रोगाचा याच किडीमुळे प्रसार होतो.

Chilli Crops 2025 मावा (अफीड्स) :

या अवस्था मोठ्या प्रमाणात नुकसान करतात पिले व प्रौढ पाण्याच्या खालच्या बाजूस राहून रसशोषण करतात. त्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे फुल व फळगळ होते. त्याचबरोबर ही कीड रस शोषण करत असताना चिकट पदार्थ पानावर सोडतात. त्यामुळे तेथे बुरशीची वाढ होऊन त्याचा प्रकाश संश्लेषणावर विपरीत परिणाम होतो.

WhatsApp Group Join Now

Chilli Crops 2025 पांढरी माशी (व्हाईट फ्लाय) :

या किडीचे प्रौढ हे आकाराने लहान तसेच शरीराचा रंग पिवळा असतो व पंखावर पांढऱ्या रंगाची मेण्यासारखी पावडर असते. तर पिल्ले आकाराने लहान गोलाकार व फिक्कट पिवळ्या रंगाची असतात. या किडीचे पिले प्रौढ व पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात. त्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर रस शोषण करत असताना चिकट पदार्थ पानावर सोडतात. त्यामुळे तेथे बुरशीची वाढ होऊन त्याचा प्रकाश संश्लेषणावर विपरीत परिणाम होतो.

Chilli Crops 2025 कोळी (माईट्स) :

या किडीचा पिल्ले व प्रौढ या अवस्था पिकास नुकसानकारक असतात. पिल्ले व प्रौढ पानांतील रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो. चुरडलेल्या पानांचा कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात. फुलाचा अवस्थेत या किडीडचा प्रादुर्भाव झाल्यास फुलांची गळ होते. फळे वेडीवाकडी होतात आणि फळांचा आकार लहान राहतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन:

पाणी खते यांचे योग्य व्यवस्थापन करावे जास्तीची शाखीय वाढ होऊ देऊ नये.

पिकास फुल लागण्याच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

पिकामध्ये पक्षांना बसण्यासाठी काट्यांच्या किंवा बांबूंचे मचाण तयार करावे त्यामुळे पक्षी मचानावर बसून खातात.

जैविक नियंत्रणासाठी 20 ग्रॅम बी.टी पावडर 10 लिटर पाण्यातून फवारावे. याप्रमाणे एच. ए. एन. पी. व्ही. 500 एल. इ. हे कीटकनाशक 2 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

हे तरी पाच या प्रमाणात कामगंध सापळे वापरावेत त्यामध्ये किडीला आकर्षित करण्यासाठी हेलिल्युयर वापरावे व ते दर 15 ते 21 दिवसांनी बदलावे तसेच कामगंध सापळ्यांचे कुत्र्यांपासून संरक्षण करावे.

दोन दिवस 8 ते 10 पतंग आढळून आल्यास त्वरित फवारणी करावी.

फवारणी नियोजन करताना पहिली फवारणी फुलोरा अवस्थेच्या आधी 5 टक्के निंबोळी अर्काची करावी.

दुसरी फवारणी 50% फुलोरा अवस्थेत एच. ए. एन. पी. व्ही. किंवा बी. टि. पावडरची घ्यावी यानंतर देखील प्रादुर्भाव वाढत राहिल्यास खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.

आंतरप्रवाही कीडनाशकांची (इमिडाक्लोप्रिड, थायोमिथोक्झाम) प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे त्यामुळे 15 ते 20 दिवसांपर्यंत रस शोषक किडींपासून संरक्षण मिळते.

लागवड करताना मल्चिंग पेपरचा वापर करावा त्यामुळे बऱ्याच किडींपासून व सूक्ष्मजीवांपासून सौंरक्षण मिळते त्याच प्रमाणे जमिनीतला ओलावा टिकवून ठेवण्यास देखील मदत होते तणनाशकावरील खर्च कमी होतो.

कीडनाशकाचे नावप्रमाण (10 लिटर पाण्यात)नियंत्रित होणारे कीड
फेंव्हेलरेट 20% प्रवाही5 मिलीफळे पोखरणारी अळी
सायपरमेथ्रीन 25% प्रवाही4 मिली
इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस.जी.4 ग्रॅम
स्पिनोसॅड 45 % एस. सी.3 मिलीफळे पोखरणारी अळी, फुल किडे
लॅम्डा सायहॅलोथ्रीन 25 % प्रवाही4 मिलीफुल किडे
थायमिथोक्झाम 25 % डब्ल्यू . जी.4 ग्रॅमपांढरे माशी
इमिडाक्लोप्रिड 17.8 % एस. सी.4 मिलीमावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुल किडे
मिथिल डेमेटोन 25 % प्रवाही10 मिलीसर्व रस शोषक किडी
मोनोक्रोटोफॉस 36 % प्रवाही15 मिलीमावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुल किडे,कोळी
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment