Integrated Nutrient Agriculture 2025 जमिनी राष्ट्राची फार मोठी ठेव आहे. भारतासारख्या कृषी प्रधान देशात जमिनीची जोपासना करणे फार महत्त्वाचे आहे. कारण याच जमिनीतून मानवासाठी अन्न, जनावरांसाठी चारा, आणि कृषी औद्योगिक धंद्यासाठी कच्चामाल उत्पादित केला जातो. जमीन ही पीक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक आहे.

Integrated Nutrient Agriculture 2025 एक उत्पादन मुख्यत्वेकरून जमिनीवर अवलंबून असते. उत्पादन वाढीच्या पोटी जमिनीत आपण पाणी, रासायनिक खते, व इतर रसायनांचा अनिर्बंध, अवास्तव, अयोग्य वापर केला तर, अपरिमित व भरून न येणारे नुकसान होऊ शकते. अन्नद्रव्य ही महत्त्वाची निविष्ठा आहे.
तुरीच्या बाजारात तेजी; लाल जातीला मिळतोय चांगला दर!!
जमीन अन्नद्रव्यांचा स्त्रोत असली तरी वर्षभर पीक लागवडीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत असतो. जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता वाढत आहे. जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत असून जमिनीचे आरोग्य खालावत चालले आहे. जमिनीच्या समस्या वाढत आहेत. त्याचे प्रमुख कारणे आहेत.

- खतांचा असंतुलित वापर
- सेंद्रिय खतांचा अभाव
- एकच एकच पीक घेण्याची पद्धत
- सिंचनाच्या पाण्याचा अयोग्य वापर
Integrated Nutrient Agriculture 2025 शेतामध्ये कोणतेही पीक घेण्यापूर्वी किंवा निश्चित रचना ठरविण्यापूर्वी जमिनीतील मूलद्रव्यांची उपलब्धता माहीत असणे आवश्यक आहे. विकसित कृषी तंत्रामुळे आता मृद परीक्षण पद्धत विकसित झाली आहे. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे वाढत्या लोकसंख्येचा भार मर्यादित शेती क्षेत्रावर पडत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच उद्योग व्यवसायकरता लागणाऱ्या जमिनी यामुळे शेती योग्य क्षेत्रात घट होत आहे.
जमिनीचा वरील सुपीक थर धूप होऊन वाहून जात आहे. रासायनिक खते पाणी आणि कीटकनाशके यांच्या अमर्याद वापरामुळे जमिनीची प्रत खालावत चालली आहे. लागवडी योग्य शेती क्षेत्र कमी आणि जमिनीचे खालावत चाललेले आरोग्य अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर उत्पादन वाढीचे आव्हान आहे. शेती टिकवायची असेल तर माती जिवंत राहिली पाहिजे.
Integrated Nutrient Agriculture 2025 पहिल्या हरितक्रांतीच्या वेळेस नैसर्गिक साधन संपत्ती विपुल होती. नैसर्गिक आपत्ती वादळ गारपीट दुष्काळ यांचे प्रमाणही कमी होते. आता शेती समोरील आव्हाने वाढत चालली आहे. पाऊसमान कमी होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न उभा आहे. कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. गारपिटी सारखे अस्मानी संकट येत आहे. शेत निष्ठांच्या खते, पाणी, रसायने यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे.
गेल्या काही वर्षात कृषी क्षेत्रातील उत्पादन खर्च वाढत आहे. हे लक्षात घेऊन नवे तंत्रज्ञान आणि सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पीक उत्पादकता वाढीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना ठेवावे लागणार आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खते आणि रासायनिक खतांचा योग्य वापरही काळाची गरज आहे.

Integrated Nutrient Agriculture 2025 आजच्या परिस्थितीत महागड्या खतांचा वापर अतिशय कार्यक्षम व काटकसरीने करणे हे प्रत्येक शेतकऱ्यांचे व राष्ट्राच्या दृष्टीने हितकारक आहे. रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करून देखील कृषी उत्पादनात वाढ होत नाही. सध्या मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर व उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी 10-15 टन हेक्टर वाहून जात आहे.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. मातीमध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मातीतून तयार होणाऱ्या अन्नात देखील अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. व याचा परिणाम मानवाच्या व जनावरांच्या आरोग्यावर होत आहे.
मातीच्या सुपीकतेची मूलभूत संकल्पना समजून घेऊन जोपासण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शाश्वत शेतीसाठी जमीन व पाणी या मूलभूत नैसर्गिक घटकांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. जमिनीची सुपीकता मुळता ही एक मोठी नैसर्गिक देणगी आहे. जमिनीची सुपीकता स्थिर नसून बदलत असते. त्याचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
Integrated Nutrient Agriculture 2025 पिकांच्या उत्पादन वाढीसाठी योग्य प्रमाणात पोषक अन्नद्रव्य पुरवणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीत एकूण अन्नद्रव्य जास्त प्रमाणात असले तरी अन्नद्रव्य पिकांची मुळे शोषून घेतील अशा स्वरूपात असणे आवश्यक असते. याशिवाय जमिनीचा उतार पीक पद्धती अशा निरनिराळ्या घटकांमुळे या अन्नद्रव्यांचा प्रमाणावर परिणाम होत असतो. आणि ते प्रमाण सतत बदलत असते.
योग्य व्यवस्थापनाअभावी जमिनीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सातत्याने पिके घेतल्याने अन्नद्रव्यांची कमतरता भासत असून जमिनीची सुपीकता खालावत आहे. जमिनीचे आरोग्य खालावल्याने वापरलेल्याने निष्ठांचा कार्यक्षम वापर होत नाही. परिणामी खर्चात वाढ होईल उत्पादनात घट होते. पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी तसेच रासायनिक खतांचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा, जिवाणू खतांचा, समतोल वापर करून जमिनीचा पोत व सुपीकता कायम ठेवणे ही गरजेची गोष्ट आहे.
सेंद्रिय असेंद्रिय आणि जैविक खतांचा एकत्रित वापर करून पिकास अन्नद्रव्य पुरवण्यासाठी पद्धतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणतात. अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पर्यावरणाचा विचार करून जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवून ती शाश्वत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याकरिता आपणाकडे असणार्या सर्व स्त्रोतांचा एकात्मिकपणे योग्य तऱ्हेने वापर करणे गरजेचे आहे. उदा. सेंद्रिय खते, भरखते, जोरखते व हिरवळीची खते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सर्व संभावित अन्नद्रव्य व पुरवण्याच्या साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून जमिनीच्या सुपीकतेची जोपासना करीत पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवण्याची पातळी राखत पिकांचे उत्पादन घेणे त्यामध्ये रासायनिक खते, सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, जिवाणू खते यांचा समन्वयत वापर करणे.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे फायदे!!
- विविध सेंद्रिय पदार्थांच्या उपयोगामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थात वाढ.
- जमिनीचा पोत सुधारतो.
- जमिनीची सुपीकता वाढते.
- फायदेशीर सूक्ष्म जीवाणूंच्या संख्येत वाढ.
- जमिनीत हवा खेळती राहते.
- पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- सर्व आवश्यक्य अन्नद्रव्यांच्या उपलब्धित वाढ.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज!!
- जमिनीच्या आरोग्यासाठी
- रासायनिक खतांची अनउपलब्धता
- मातीतील सूक्ष्म जीवाणूंसाठी
- जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी
- अन्नद्रव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर
Integrated Nutrient Agriculture 2025 एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे उद्देश:
रासायनिक खतांचा समतोल वापर करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे.
रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा पूरक वापर करून उत्पादकतेशी सांगड घालणे.
शेतातील उपलब्ध पीक अवशेष जमिनीच्या सुपीकतेसाठी वापर, त्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती करून त्यांचा वापर करणे.
Integrated Nutrient Agriculture 2025 एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातील महत्वाचे घटक:
- रासायनिक घटक
- हिरवळीचे घटक
- पिकांचे फेरपालट
- सेंद्रिय घटक
- जैविक खते
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |