Soybean Bajarbhav 2025 केडगाव : गेल्या वर्षी दिवाळीत पासून शेतकऱ्यांना सोयाबीन दर वाढीची अपेक्षा होती. मात्र भाववाढ न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मिळेल त्या दराने सोयाबीन विक्री केली. दरम्यान आता सोयाबीनचे भाव वाढत आहेत.

4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल असलेला दर काही दिवसांपासून 4,450 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र आता शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नाही.
तांबडा भोपळा लागवड!!
Soybean Bajarbhav 2025 अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी 66 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यास 4,200 पासून 4,450 पर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अहिल्यानगर तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आधार सोयाबीन आहे.

चांगला भाव मिळेल या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून शेतमाल विक्री केला नव्हता, परंतु हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनचा दर कमी होते.
हमीभावात 436 रुपये वाढ!! Soybean Bajarbhav 2025
- मागील वर्षी सरकारने सोयाबीन साठी 4,892 रुपये हमीभाव दिला. परंतु, प्रत्यक्षात बाजारात या दराने खरेदी विक्री झाली नाही.
- शासनाने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी केले. दरम्यान यंदाच्या खरिपातील सोयाबीनसाठी सरकारने 436 रुपयांची वाढ करून 5 हजार 328 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे.
नवीन हंगामाकडे लक्ष!! Soybean Bajarbhav 2025
यावर्षी सरकारने हमीभावात 436 रुपयांची वाढ केली, त्यामुळे प्रत्यक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसणार आहे.
शासनाने नाफेडमार्फत 4,892 रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला.
परंतु अनेक अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रांवर सोयाबीन विक्री करता आली नाही. परिणामी अनेकांना बाजारात मिळेल त्या दराने गरजेनुसार सोयाबीन विक्री केली.

जागतिक घडामोडींचा बाजारावर परिणाम
Soybean Bajarbhav 2025 सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा दरावर परिणाम पडतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे.
नाफेडच्या सोयाबीन विक्रीस सुरुवात
Soybean Bajarbhav 2025 गतवर्षी शासनाने नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी केले होते. त्यामुळे सोयाबीनचा शासनाकडे मोठा साठा आहे. परिणामी शासनाने मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनचे दर वाढले असले, तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी होत आहे.
“प्रक्रियादार कारखानदारांकडून सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी 100 ते 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. – अमोल राठी, सोयाबीन व्यापारी”

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |