Pomegranate Orchards 2025 बहार नियोजन:
तेलकट डाग रोगग्रस्त भागात मृगबहार शक्यतो टाळावे.
वर्षातून फक्त एक बहार घ्यावा.
बागेला 3 ते 4 महिने दोन वर्षानंतरच पहिला बहार धरावा.

बहार | फुले कालावधी | फळे पकवता | शेरा |
मृग | जून-जुलै | नोव्हेंबर जानेवारी | झाडे रोगाला जास्त बळी पडतात, फळांची गुणवत्ता खालावते |
दोडका लागवड!! Dodka Cultivation 2025
झाडांना ताण देणे:
हलक्या जमिनीत 30 ते 35 दिवस
मध्यम ते भारी जमिनीत 40 ते 45 दिवस पाणी बंद करावे.

पानगळ:
छाटणीच्या तीन आठवडे आधी 20 मिली इथ्रेल 10 लिटर पाण्यातून घेऊन पानगळ करावी.
छाटणी:
पानगळ करून छाटणी करावी.
छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात.
रोगट फांद्या काढून टाकणे.
भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशा प्रकारे छाटणी करावी.
फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी.
छाटणी केल्यानंतर लगेच 1 % बोर्ड मिश्रण फवारणी करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन : Pomegranate Orchards 2025
चार वर्ष किंवा पूर्ण वाढ झालेल्या झाडांना 325:250:250 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश पहिले पाणी देतेवेळी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा गाठ सेट झाल्यानंतर 2 ते 3 हप्त्यात विभागून द्यावी.
बहार धरतेवेळी 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट वापरावे.
फळे लिंबू आकाराची असताना 500 ग्रॅम 18:46 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा.
फळे पेरू आकाराचे असताना 200 ग्रॅम 19:19:19 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा.

पाणी व्यवस्थापन | लिटर/दिवस/ झाड |
जून | 30 |
जुलै | 22 |
ऑगस्ट | 20 |
सप्टेंबर | 20 |
ऑक्टोबर | 19 |
नोव्हेंबर | 17 |
डिसेंबर | 16 |
फळ काढणी : Pomegranate Orchards 2025
60 ते 80 फळे प्रति झाड फळे ठेवावीत.
टोकाकडील पुष्प पाकळ्या मिटतात.
फुलोऱ्यानंतर 150 ते 210 दिवसांनी, फळधारणेनंतर 120 ते 130 दिवसांनी.
पावसाळ्यातील रोग व्यवस्थापन: Pomegranate Orchards 2025
बॅक्टेरियल ब्लाइंट/तेलकट डाग
रोगास कारणीभूत घटक
झान्थोमोनास ऑक्सिनोपोडीस पीव्ही पुनिकी
अनुकूल बाबी:
तापमान 26 ते 31 डिग्री सेल्सियस आद्रता 36 ते 88 %
ढगाळ व उष्ण आद्रतायुक्त हवामान, वादळी पाऊस.
रोगग्रस्त गुटी कलमांचा वापर बागेत अथवा बागे शेजारी रोगांचे अवशेष असणे.
बागेतील अस्वच्छता छाटलेले अवशेष कुजलेली फळे पालापाचोळा.
रोगाची लक्षणे:
पानावर करड्या रंगाचे तेलकट डाग दिसतात. कालांतराने गर्द तपकिरी ते काळ्या रंगाचे होतात.
फांदीवर काळपट अथवा काळे खोलगट चट्टे.
फळांवर तपकिरी ते काळा रंगाचे वेडेवाकडे ठिपके.
पीक संरक्षण:
मागील हंगामातील फळे काढणी झाल्यानंतर लगेच ब्रोमोपॉल 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यात घेऊन फवारावे.
बागेला तीन महिने विश्रांती देणे.
20 मिली इथ्रेल 10 लिटर पाण्यातून घेऊन पानगळ करावी.
रोगट फांद्या, फळे, फुले पाने जाळून नष्ट करणे.
छाटणी झाल्यानंतर लगेच ब्रोमोपॉल 25 ग्रॅम कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात घेऊन फवारावे.
झाडाच्या खोडाला निंबोळी तेल + ब्रोमोपॉल 5 ग्रॅम + कॅप्टन 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून लेप द्यावा.
बागेत जमिनीवर 25 किलो ब्लिचिंग पावडर किंवा 4 टक्के कॉपरडस्ट 8 किलो प्रती एकरी धुरळणी करणे.
नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल 25 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात घेऊन फवारावे.
यानंतर 10 दिवसांनी बोर्डोमिश्रण 0.5% फवारावे.
पुन्हा 10 दिवसांनी कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात घेऊन फवारावे.

टीप: Pomegranate Orchards 2025
ढगाळ दमट व पावसाळी हवामानात वरील औषधांची 10 दिवसांच्या अंतराने फवारणी सुरू ठेवावी.
निरोगी हवामानात 20 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर 30 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
मर रोग:
कारणीभूत घटक : सूत्रकृमी, खोड किडा, फ्युझरियम, रायझोक्टॉनिया आणि सिर्टोसिस्टीस बुरशी
रोगाची लक्षणे : शेंड्यांची पाने आणि फांद्या पिवळी पडून वाळतात. खोडातील गाभा काळा पडतो. खोडाच्या खालच्या बाजूला बुरशीची वाढ होते.
नियंत्रण Pomegranate Orchards 2025
नवीन लागवड करताना
हलकी मध्यम प्रतीची जमीन निवडावी.
लागवडीपूर्वी जमीन प्रखर सूर्यप्रकाशाने तापवून घ्यावी.
रोग विहरीत रोपे लागवडीसाठी वापरावे.
खड्डे 1*1*1 मी. आकाराचे 4.5*3.0 मी. अंतरावर द्यावेत.
कार्बेनडीझम 0.2% द्रावण 5 ली. प्रति खड्डा टाकावे.
क्लोरोपायरीफॉस 50 मिली प्रति खड्डा टाकावे.
कॅल्शिअम हायपोक्लोराइड 100 ग्रॅम प्रति खड्डा टाकावे.
खड्यात शेणखत 20 किलो, गांडूळखत 2 किलो, निंबोळी पेंड 3 किलो, ट्रायकोडर्मा + 25 ग्रॅम, अझोटोबँकटर 15 ग्रॅम, पीएसबी 15 ग्रॅम टाकावे.
गरजे नुसार पाणी द्यावे.

बाधित बागेस Pomegranate Orchards 2025
मर रोगाची लागण झाल्यास हेक्झोकोनॅझोल 15 मिली किंवा प्रोपीकोनॅझोल 15 मिली किंवा कार्बेनडीझम 20 ग्रॅम यापैकी कोणतेही एक आणि त्यात क्लोरोपायरीफॉस 25 मिली प्रति 10 ली द्रावण तयार करावे आणि 5 लिटर खड्डा रिंग पद्धतीने ओतावे.
संपूर्ण झाड हेक्झाकोनॅझोल 10 मिली किंवा कार्बेनडीझम 10 ग्रॅम प्रति 10 ली फवारावे.
वाळलेले आणि कोरडे झालेले झाड उपटून नष्ट करावे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |