PM Kisan Scheme 2025 गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीएम किसान च्या पुढील हप्ताच्या प्रतीक्षेत होते. अखेर पीएम किसानची योजनेच्या 20 व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली असून पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे स्पष्टीकरण कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.

PM Kisan Scheme 2025 पीएम किसानचा 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये वितरित केल्यानंतर शेतकऱ्यांना 20 वा हप्ता कधी होईल याची प्रतीक्षा होती. याबाबत अनेकदा तर्कवितर्क लावण्यात येत होते, मात्र प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना निराशाला सामोरे जावे लागले. मात्र आता 20 वा हप्त्याची तारीख ठरली असून येत्या 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता वितरित होणार आहे.
सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन भाग 2: सुधारित वाणांची निवड, लागवड, तन नियंत्रण, काढणी, मळणी व साठवणूक!!
PM Kisan Scheme 2025 कारण 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत येथील वाराणसी मध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला असून मोदी उत्तर प्रदेशसाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकतात. याच वाराणसी दौऱ्यात पीएम किसानचा 20 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. जवळपास साडेनऊ करोड पेक्षा अधिक शेतकरी बांधवांना याचे वितरण 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

असे करा हप्त्याचे स्टेटस चेक!! PM Kisan Scheme 2025
सर्वप्रथम पीएम किसान या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. त्यानंतर पहिल्या लिंक वर क्लिक करा आपल्यासमोर अनेक ऑप्शन्स येतील त्यातील फार्मर कॉर्नर वरील Know Your या पर्यायावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज दिसेल यात पीएम किसान चा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर Captcha कोड टाकून द्या. ओटीपी या बटणावर क्लिक करा. जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास तुम्ही (Know Your Registration Number) पर्यायावर क्लिक करून आधार किंवा मोबाईल नंबर द्वारे नोंदणी क्रमांक मिळू शकता मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी पुन्हा भरावा आणि Get Data या बटणावर क्लिक करावे.
PM Kisan Scheme 2025 यानंतर आपल्यासमोर अर्ज करताना भरलेली संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल तुम्हाला जर यातील काही माहितीत बदल करायचा असेल तर Update Details बटनावर क्लिक करून तुम्ही ती माहिती अपडेट करू शकता.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |