Soybean Crop 2025 सोयाबीन हे जागतिक पातळीवर आधुनिक शेतीमधील महत्त्वाचे तेलबिया व शेंगवर्गीय पीक आहे. भारत देश हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे. सन 2018 ते 19 मध्ये आपल्या देशात 10.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेण्यात आले होते.

देशातील या पिकाखाली असणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी 33% क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. क्षेत्राचा विचार करतात महाराष्ट्राचा मध्य प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो खरीप 2018 मध्ये महाराष्ट्र मध्ये 63.39 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली होते.
हवामान बदलाचे भारतीय शेतीवरील परिणाम आणि उपाय योजना!!
त्यापासून सरासरी 1054 किलो हेक्टर उत्पादकतेनुसार एकूण 38.35 लाख टन सोयाबीनचे उत्पादन मिळाले, हे पीक महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या प्रादेशिक विभागांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते. सोयाबीन 90 ते 105 दिवसात व कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे खरीप हंगामातील नगदी पीक असल्यामुळे या पिकाखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे.

Soybean Crop 2025 सोयाबीनचे महत्व:
सोयाबीनच्या बियांमध्ये 18 ते 20 टक्के खाद्यतेल व 38 ते 40 टक्के प्रथिने असतात. त्यामुळे पोषणदृष्ट्या या पिकास महत्त्व आहे.
पाळीव जनावरे व कुक्कुटपालन व्यवसायासाठी सोयाबीनचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो.
पीक फेरपालटीमध्ये सोयाबीन पीक महत्त्वाचे आहे. त्यांच्या झाडांच्या मुळांवरील रायझोबियम जिवाणूंच्या गाठीद्वारे हेक्टरी 80 ते 100 किलो नत्र जमिनीत स्थिर होते. त्यामुळे सोयाबीन साठी लागणाऱ्या रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.
सोयाबीनच्या झाडांचा पालापाचोळा जमिनीमध्ये पडून तो कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते त्यामुळे हे पीक बेवड म्हणून उपयोगाचे आहे.
सोयाबीनचा अन्नपदार्थ निर्मिती औषध कंपन्या तसेच अनेक औद्योगिक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
सोयाबीनचा सोया दूध, दही, पनीर, खीर, सोया नगेट्स, सोया आटा, बिस्कीट, सोया पापड, इ. पोषणदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या अन्नपदार्थांची निर्मिती करण्यासाठी वापर वाढत आहे.
सोयाबीनचे किफायतशीर उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी:
Soybean Crop 2025 सोयाबीनची उत्पादन क्षमता 25 ते 38 क्विंटल हेक्टर असली तरी प्रत्यक्षात उत्पादन 18 ते 20 क्विंटल हेक्टर इतकेच येत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. उत्पादनामध्ये तफावत असण्याच्या कारणांमध्ये जमिनीची योग्य मशागत न करणे, शिफारशी प्रमाणे सेंद्रिय व रासायनिक खत मात्रा न देणे, बीज प्रक्रिया व योग्य रोपसंख्या यांचा अभाव अयोग्य पाणी व तणांचे व्यवस्थापन रोग व किडींचा प्रादुर्भाव व त्यांचे व्यवस्थापन यांच्या माहितीचा अभाव इत्यादी घटकांचा समावेश होतो.
सन 1968 पासून आधारकर संशोधन संस्था पुणे ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली या अंतर्गत येणाऱ्या अखिल भारतीय समन्वयत सोयाबीन संशोधन प्रकल्पाचे मुख्य केंद्र म्हणून काम पाहते. आजपर्यंत या संस्थेद्वारे सोयाबीनच्या जास्त उत्पादन देणाऱ्या 8 वाणांची निर्मिती करण्यात आली आहे.
अलीकडेच ‘एमएसीएस 1188’ व ‘एमएसीएस 1281’ या सुधारित वाणांची महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या संस्थेमध्ये सुरू असलेल्या संशोधनावर आधारित निष्कर्षानुसार उपलब्ध उत्पादन घटकांचा योग्य वापर करून सोयाबीनचे सुधारित पद्धतीने शास्वत उत्पादन घेण्यासाठी खालील प्रमाणे पीक व्यवस्थापन करावे.

Soybean Crop 2025 हवामान
सोयाबीन हे पीक उष्ण तापमान संवेदनशील आहे. सोयाबीनच्या उगवणीसाठी वाढीसाठी फुले येण्यासाठी व शेंगेमध्ये दाणे भरण्यासाठी ठराविक उष्णतापमानाची गरज असते. तापमान 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत असल्यास बियांची उगवण चांगली होते, व रोपांची निरोगी वाढ होते.
तापमान 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी व 35 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असल्यास बियाणांची उगवण होत नाही. सोयाबीन वाढीवर हवामानाचा निश्चितपणे परिणाम होतो, अधिक तापमान, अधिक दमटपणा, सोयाबीनची झपाट्याने वाढ होण्यास कारणीभूत ठरतात. वार्षिक पर्जन्यमान 750 ते 1000 मिमी निश्चित व योग्य रीतीने विखुरलेले असेल तर सोयाबीन पीक चांगले येऊ शकते.
स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास सोयाबीनची वाढ चांगली होते व पानांचा रंग हिरवागार होऊन फुले व शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते सारखे ढगाळ हवामान असल्यास पिकाची वाढ साधारणकारक होत नाही परिणामी उत्पादन घट येते.
Soybean Crop 2025 जमीन:
सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी गाळाची चांगला निचरा होणारी जमिनी योग्य असते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे जरुरीचे आहे. सोयाबीनच्या उत्तम वाढीसाठी जमिनीचा रंग, पोत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण व इतर अन्न घटकांचा साठा समतोल प्रमाणात असणे गरजेचे असते.
उथळ, हलकी, मुरमाड, पाणी धरून न ठेवणारी जमीन सोयाबीनच्या लागवडीस योग्य नसते. ज्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो त्या जमिनीत हवा चांगली खिडकी राहते जमिनीत हवा खेळती राहिल्यामुळे मुलांची वाढ व त्यांचा विस्तार चांगला होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते जास्त आम्लयुक्त क्षारयुक्त तथा रेताळ जमिनीत सोयाबीन पीक घेऊ नये.
Soybean Crop 2025 पूर्वमशागत:
रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मार्च-एप्रिल जमीन खोल नांगरून घ्यावी त्यामुळे जमिनीचे उलटापालट होऊन ती उन्हामुळे चांगली तापली जाते. जमिनीत मोठे ढेकळ निघाल्यास ते मैदाच्या सहाय्याने बारीक करावेत पहिला पाऊस पडल्यानंतर वाफश्यावर कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. कुळवाची शेवटची पाळी देण्यापूर्वी जमिनीत हेक्टर 5 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. पेरणीपूर्वी जमिनीचे समतोल सपाटीकरण केल्यास विहीर किंवा कॅनल द्वारे सिंचन चांगल्या प्रकारे करता येते.
पेरणीसाठी वाणांची निवड:
Soybean Crop 2025 पेरणीपूर्वी वाणांची निवड करून बियाणाची उपलब्ध करून ठेवावी महाराष्ट्रातील जमीन व हवामान यांना अनुकूल असणाऱ्या एमएसीएस 1188, एमएसीएस 128, एमयुएस 158, एमयुएस 165, एमयुएस 612, केडीएस 344, केडीएस 726, एएमएस 1001, जेएस 335, जेएस 93-05 इत्यादी. शिफारस केलेल्या वाणांची बियाणे पेरणीसाठी वापरावे आधारकर संशोधन संस्थेद्वारे जास्त उत्पादन क्षम हे वाण नुकतेच विकसित करण्यात आलेले आहेत. व त्यांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
हेक्टरी 65 ते 70 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे ऊस, कापूस, तूर आणि इतर कडधान्य व अन्नधान्य पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेण्यासाठी हेक्टरी 30 ते 35 किलो बियाणे वापरावे. महाराष्ट्रातील हवामानवर जमिनी यानुसार लागवडीसाठी शिफारस केलेल्या नवीन सुधारित वाणांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.
एमएसीएस 1188 :
जास्त उत्पादन क्षमता: 25-35 क्विंटल/ हेक्टर
फुलांचा रंग: पांढरा
कालावधी: 100 ते 105 दिवस
शेंगा फुटण्यास प्रतिरोधक मशीन द्वारे काढण्यासाठी योग्य विविध किडी व रोगांना प्रतिबंधक मध्य, पूर्व व पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
एमएसीएस 1281 :
उत्पादन क्षमता: 25-32 क्विंटल/ हेक्टर
फुलांचा रंग: जांभळा
कालावधी: 95 ते 100 दिवस
शेंगा फुटण्यास प्रतिरोधक मशीन द्वारे काढण्यासाठी योग्य विविध किडी व रोगांना प्रतिबंधक मध्य, पूर्व व पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
एमयुएस 158 :
उत्पादन क्षमता: 25-31 क्विंटल/ हेक्टर
फुलांचा रंग: जांभळा
कालावधी: 93 ते 96 दिवस
मराठवाडा विभागात लागवडीसाठी शिफारस शेंगा फुटण्यास प्रतिबंधक.
एमयुएस 162 :
उत्पादन क्षमता: 25-30 क्विंटल/ हेक्टर
फुलांचा रंग: फिक्कट जांभळा
कालावधी: 100 ते 103 दिवस
मराठवाडा विभागात लागवडीसाठी शिफारस शेंगा फुटण्यास प्रतिबंधक, मशीन द्वारे काढणीस योग्य.
एमयुएस 612 :
उत्पादन क्षमता: 32-35 क्विंटल/ हेक्टर
फुलांचा रंग: जांभळा
कालावधी: 93 ते 98 दिवस
शेंगा फुटण्यास प्रतिबंधक, विविध रोग व किडींना प्रतिबंधक.
केडीएस 344 : (फुले अग्रणी)
उत्पादन क्षमता: 25-30 क्विंटल/ हेक्टर
फुलांचा रंग: जांभळा
कालावधी: 105 ते 110 दिवस
शेंगा फुटण्यास प्रतिबंधक, तांबेरा रोगास प्रतिबंधक, विविध किडींना प्रतिबंधक, पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
केडीएस 726 : (फुले संगम)
उत्पादन क्षमता: 20-25 क्विंटल/ हेक्टर
फुलांचा रंग: जांभळा
कालावधी: 100 ते 105 दिवस
तांबेरा रोगास प्रतिबंधक, पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
एएमएस 1001 : (पीडी केव्ही यलो गोल्ड )
उत्पादन क्षमता: 22-25 क्विंटल/ हेक्टर
फुलांचा रंग: जांभळा
कालावधी: 95 ते 100 दिवस
किडी बरोबर ना सहनशील, विदर्भ भागामध्ये लागवडीस योग्य.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |