Jwari kharedi 2025 जळगाव: जिल्ह्यात शासकीय ज्वारी खरेदी सुरू असून शासन 3375 रुपये प्रतिक्विंटलने ज्वारी खरेदी करत आहेत. बाजारपेठेत फक्त 2000 ते 2200 रुपये भाव मिळत असल्यामुळे शासकीय खरेदी कडे शेतवर्गाचा कल वाढला आहे पण शासन शेतकऱ्यांकडून हेक्टरी 16 क्विंटलच ज्वारी खरेदी करीत असल्याने उर्वरित धान्य बाजारात कमी भावाने विकावे लागत आहे.

Jwari kharedi 2025 शेतकरी सहकारी संघामार्फत गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या धान्य खरेदीत 6600 क्विंटल ज्वारी खरेदी झाली असल्याची माहिती व्यवस्थापक विकास शिसोदे व लिपिक भैय्या साळुंखे यांनी दिली. चाळीसगाव तालुक्याला 11,000 क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकरी सहकारी संघाकडे तालुक्यातील 476 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. आज अखेर 203 शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी झाली आहे.
सातबारा उताऱ्यावरील ‘ह्या’ नोंदीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडिंग राहणार नाही…
Jwari kharedi 2025 धान्य खरेदी केंद्रावर धान्य मोजण्याचे काम संतपणे होत आहे. दीड महिना झाला तरी आपला नंबर आला नाही खरेदी बंद होईल की काय? अशी भीती शेतकरी वर्गाला आहे. मात्र, नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे धान्य मोजले जाईल असे आश्वासन संघाने दिले आहे. तसेच किमान 25 क्विंटल धान्याची अट ठेवली तर आणखी आर्थिक लाभ मिळू शकेल असे शेतकऱ्यांचे मत आहे.

Jwari kharedi 2025 सर्व नोंदणी ऑनलाईन:
शासनाने यावर्षी सर्व नोंदणी ऑनलाइन केली आहे आधारकार्डची पडताळणी करून मोबाईल नंबर वर ओटीपी तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्याचा फोटो काढूनच प्रक्रिया पूर्ण होते.

Jwari kharedi 2025 ज्या दिवशी नोंदणी नुसार नंबर येईल त्याच्या आदल्या दिवशी खरेदी केंद्रावर धान्य घेऊन येण्याबाबत मेसेज येतो. शेतकऱ्यांकडे नोंदणी तारीख अनुक्रमांक असल्यामुळे रोजची अपडेट शेतकरी ठेवतात. त्यामुळे गैरप्रकार यांना आळा बसला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |