Limestone Soils 2025 जमिनीचे व्यवस्थापन हे तिच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मावर अवलंबून असते. जमिनीत विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असणे, जमीन चोपण असणे, जमिनीत पाण्याचा निचरा न होणे, जमीन दलदलीची असणे, जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असणे, जमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असणे, या कारणांमुळे पिकांच्या वाढीस व अन्नद्रव्य पुरवठा प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.

Limestone Soils 2025 महाराष्ट्र राज्यात कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी मोठ्या प्रमाणात आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता कोरडे हवामान कमी पाऊस तसेच भुसावळ खडकापासून तयार झालेल्या भिम धर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते.
पीएम किसानचा पुढील 20 वा हप्ता ‘या’ तारखेला वितरित होऊ शकतो;
जमिनीत मुक्त चुन्याचे दोन प्रकार आढळून येतात एक वेड्यावाकड्या खड्यांचे स्वरूपात आढळून येते. आणि दुसरा प्रकार पावडर स्वरूपात मातीत आढळून येतो, म्हणून अशा जमिनी पांढऱ्या, भुरकट रंगाच्या दिसून येतात. या दोन्ही चुन्याचा प्रकारात पावडर स्वरूपात मातीत चुनखडीचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त असल्यास पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतात.

सिंचन क्षेत्रात हलक्या जमिनीत मुक्त चुन्याचे प्रमाण पृष्ठभागाखालील मुरमाच्या थरात जाऊन साठतात. तर चोपण जमिनीत सामू 8.5 पेक्षा जास्त असलेल्या जमिनीतील खालच्या थरातून चुनखडीचे थर दिसून येतात. याला शेतकरी शाडू लागला असे म्हणतात.
असे चुनखडीचे थर 1 मीटरच्या आत दिसून आल्यास फळबाग लागवडीसाठी जमिनी योग्य नसते, किंबहुना फळ बागेचे आयुष्य कमी होऊन उत्पादकता कमी होते. म्हणून फळबाग लागवड करताना खड्डे घेऊन असे चुनखडीचे थर 15 सेमी पेक्षा जास्त रुंदीचे थर 1 मीटरच्या आत साठलेले नसावेत अन्यथा फळबाग लागवड यशस्वी होत नाही.
Limestone Soils 2025 जमिनीतील योग्य प्रमाणातील मुक्त चुन्याचे महत्त्व:
योग्य प्रमाणात मुक्त चुण्याचा साठा जमिनीत असणे ही एक महत्त्वाची बाब आहे. पिकाखालील बागायती जमिनीत मुक्त चुन्याचे प्रमाण शेकडा 3 पासून 20 ते 25 पर्यंत आढळते. हे प्रमाण जेवढे जास्त तेवढे जमीनचे व्यवस्थापन करणे कठीण असते योग्य प्रमाणात मुक्त चुनखडीचे प्रमाण 3 ते 5 टक्के असल्यास काही विशेष फायदे होतात.
मुक्त चुन्याचे प्रमाण योग्य असेल 3 ते 5 टक्के तर जमिनीची घडण रवाळ बनण्यास मदत होते.
हवा व पाणी यांचा समतोल राहून पिकांची वाढ जोमदार होते. जमिनीची धूप काही प्रमाणात कमी होणे, जमिनीची सुपीकता टिकून राहणे, जमिनीस रवाळपणा येणे, जमिनीचे फुल सुधारणे पेरलेले बी लवकर रुजते.
मातीचे पाणी धरून ठेवण्याचे प्रमाण वाढते व पाण्याचा योग्य निचरा होतो.
हलक्या जमिनीची घडण सुधारते,जमिनीची घडण सुधारल्याने जमिनीत सूक्ष्मजीवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते, व जमीन जास्त सुपीक बनते.

चोपण जमिनीचा पोत व फुल सुधारते, जमिनीची जलधारणा क्षमता वाढते, जमिनीतील नत्र स्थिर करण्याचा वेग वाढतो, आम्ल जमिनीत मुक्त चुन्याचे वापरामुळे पिकास स्फुरद अन्नद्रव्य मिळण्यास मदत होते.
चिकन मातीचे लहान लहान कण एकत्रित बांधले जाणे, मुक्त चुण्याचे प्रमाण योग्य असल्यास जमिनीतून सेंद्रिय पदार्थ वाहून जात नाही त्यांचा चुन्याशी संयोग होऊन कॅल्शियम ह्युमेट तयार होतो. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घट्ट धरून ठेवली जातात. यामुळे जमिनीला गडद तपकिरी अथवा काळा रंग येतो. (1 टक्के चुनखडे म्हणजे 6 इंच खोलीच्या 1 एकर क्षेत्रात सुमारे 10 टन वजनाचे असते.)
Limestone Soils 2025 चुनखडी युक्त जमिनीचे गुणधर्म:
- माती परीक्षणाद्वारे मातीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त असते हेच प्रमाण 15 टक्के पेक्षा जास्त असल्यास पिकांना फळ पिकांना हानिकारक ठरते.
- जमिनीचा रंग भुरकट पांढरा दिसून येतो, जमिनीची घनता वाढते म्हणजेच जमिनीची घडण कडक बनते, त्यामुळे बियाणांची उगवणक्षमता कमी होते.
- जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, जमिनीतील मातीचा सामू विमलधर्मीय सामू 8.0 पेक्षा जास्त तर क्षारांचे प्रमाण कमी असते.
- जमिनीतील मुख्य (नत्र, स्फुरद, पालाश) दुय्यम (मॅग्नेशियम गंधक) तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची (लोह, जस्त, बोरॉन) उपलब्धता कमी होते.
Limestone Soils 2025 जास्त चुनखडीचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम:
- जमिनीतील चुनखडीचे शेकडा प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त झाले तर त्यांचा पिकांना अन्नद्रव्य पुरवठ्यावर अनिष्ट परिणाम होतो व त्यामुळे पिकांची शेकड्यावरील वाढ खुंटते.
- जास्त चुनखडी असलेल्या जमिनीत पिकाला स्फुरद अन्नद्रव्य घेण्यास फार अडचणी येतात त्याचप्रमाणे आवश्यक के सहजासहजी न मिळाल्याने पीक पिवळे पडते यालाच आपण केवडा रोग असे म्हणतो.
- चुनखडीचे पीक व जमिनीवर होणारे प्रत्यक्ष परिणाम हे जमिनीतील चुनखडीचे प्रत्यक्ष प्रमाण काय आहे ही चुनखडी जमिनीच्या उभ्या छेदातील कोणत्या छेदात विखुरलेली आहे यावर अवलंबून राहतात.
- चुनखडीचा दुसरा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे लोह मंगल जस्त, तांबे, बोरॉन यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत स्थिरता वाढून ते पुरेशा प्रमाणात पिकांना मिळू शकत नाहीत.
- चुनखडीयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने वाळवी आणि सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.

Limestone Soils 2025 चुनखडीयुक्त जमिनींचे सुधारणा व्यवस्थापन:
- जमिनीची खोलवर नांगरट करावी, जमिनीत सेंद्रिय खते शिफारस केल्याप्रमाणे दरवर्षी टाकावेत, शेणखताचा अपुरा पुरवठा असल्यास हिरवळीची पिके पेरून ती 45 ते 50 दिवसात फुलोऱ्यात आल्यावर जमिनीत गाढावीत.
- चुनखडी युक्त जमिनीत आंतरपीक म्हणून द्विदल पिकांचा समावेश करावा.
- रासायनिक खते पृष्ठभागावर फेकून न देता ती पेरून द्यावीत अथवा मातीआड करावीत.
- रासायनिक खतांचा वापर करताना माती परीक्षणाद्वारे नत्र हे अमोनियम सल्फेट द्वारे द्यावे, स्फुरद हे डायमोनियम फॉस्फेट द्वारे द्यावे, आणि पालाश शक्यतो सल्फेट ऑफ पोटॅश द्वारे पिकांना द्यावे.
- जमिनीत मॅग्नेशियम सल्फेट एकेरी 10 ते 15 किलो सेंद्रिय खतात मिसळून द्यावे.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर मातीत परीक्षणानुसार करावा. उदा. लोहासाठी फेरस सल्फेट हेक्टरी 25 किलो, जस्ताच्या कमतरतेसाठी झिंक सल्फेट हेक्टरी 20 किलो, बोरॉन साठी बोरॅक्स 5 किलो प्रती हेक्टरी किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 1 हेक्टरी 25 किलो या प्रमाणात जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून पिकात द्यावीत.
- चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरद खतांचा वापर करताना ते सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावीत.
- चुनखडे युक्त जमिनीमध्ये सुपर फॉस्फेट देताना ते सरळ जमिनीत न मिसळता कंपोस्ट किंवा शेणखतात मिसळून मग ते 3 ते 4 इंच खोलीवर चळी करून द्यावी.
- सुरत विरघळविण्याऱ्या जैविक खतांचा वापर बीजप्रक्रियेद्वारे अथवा शेणखातात मिसळून करावा.
- चुनखडीयुक्त जमिनीत सहनशील पिकांची लागवड करावी . उदा कापूस, गहू, ऊस, सोयाबीन, बाजरी, सूर्यफूल, तूर, भुईमूग, सीताफळ, अंजीर, आवळा, बोर, चिंच इ.
- अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी कारखान्यातील मळी कंपोस्ट हेक्टरी 5 टन उन्हाळ्यामध्ये जमिनीत समप्रमाणात मिसळावे व नंतर नांगरट करावे.
Limestone Soils 2025 जमिनीमध्ये मुख्यत्व करून फळबागांचे व इतर पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना त्या जमिनीतील चुनखडीचे प्रमाण किती आहे व ती कोणत्या थरात आहे, याची प्राथमिक माहिती करून घेणे आवश्यक आहे. हे मातीच्या परीक्षणाद्वारे कळते त्याचवेळेस आपण चुनखडीयुक्त जमिनींचे चांगले व्यवस्थापन करून सहनशील पिकांचे अपेक्षित उत्पादन घेऊ शकतो.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |