Seed Germination 2025 बियाणाची एखाद्या लॉटची उगवण क्षमता तपासण्यासाठी त्याच्या प्रतिकारात्मक नमुन्यातील कमीत कमी 420 तपासावे लागते. ज्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासावयाची आहे त्याच कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाणातूनच घेतलेल्या असावे प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासण्यासाठी आवश्यक्य असणाऱ्या साहित्यांमध्ये उगवण कक्ष हे मुख्य उपकरण आहे.

यामध्ये बियाणाच्या उगवण्यासाठी आवश्यक्य लागणारे तापमान आणि आद्रता राखता येते तसेच बियाणे उगवणे ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरतात याला ‘टॉवेल पेपर’ असे म्हणतात. ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि त्यामुळे बियाण्याची उगवण व वाढ होण्यास मदत होते.
तूर पिकासंबंधी महत्त्वाच्या टिप्स!!
Seed Germination 2025 उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती:
शोषकागदाच्या वरती लहान आकाराच्या बियाण्यांची उगवण क्षमता या प्रकारे तपासले जाते यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोषकागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून ओले करावे पाणी जास्त झाले असेल तर ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी या प्लेट उगवण कक्षामध्ये उगवणीसाठी ठेवाव्यात किंवा चांगल्या प्रकारे आद्रता असलेल्या बंद खोलीत ठेवल्या तरी उगवण होण्यास पुरेसे होते.

कागदामध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे:
Seed Germination 2025 उगवण क्षमता तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या 2 ओल्या केलेल्या कागदांमध्ये बी मोजून ठेवावे असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेन कागद खालच्या 3/4 भागास गुंडाळून ते उगवण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या तापमानात आणि आद्रता असलेल्या जर्मिनेटरमध्ये ठेवतात. ओला कागद बोटाने दाबला असता बोट भोवती पाणी दिसू नये इतपतच कागद ओला असावा.
Seed Germination 2025 वाळूमध्ये उगवण क्षमता पाहणे:
कुंडी किंवा ट्रेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत 1 ते 2 सेंटीमीटर खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावेत बियांच्या आकारमानानुसार वाळूचा ओलेपणा ठरवतात अशा कुंड्या जर्मिनेटरमध्ये उगवण्यासाठी ठेवतात. बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे त्यासाठी ओलावा प्रमाणातच ठेवावा तसेच बियाणास आवश्यक्य असणारे तापमान आणि आद्रता राखण्याचा प्रयत्न करावा साधारण 8, 10 दिवसात बियाण्याची उगवण होते.

Seed Germination 2025 उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण:
उगवण क्षमता चाचणीत आठ-दहा दिवसात बियाणे उगवणे या उगवलेल्या रोपांच्या वाढीवरून यांचे वर्गीकरण केले जाते. ज्या रोपांची चांगली वाढ झालेली असते आणि ज्यांची अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडांमध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते त्यांना साधारण किंवा चांगली रोपे असे संबोधले जाते.
या रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते मुळांची वाट चांगली होऊन त्यावर तंतुमुळे वाढलेली असतात. व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु थोडी मुळांची खुरटलेली वाढ अशी रोपे सुद्धा साधारण किंवा चांगल्या प्रकारात मोडतात. तसेच व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु त्यांना बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असला तरी अशी रोपे सुद्धा चांगल्या प्रकारात मोडतात.
विकृत रोपे : Seed Germination 2025 दुसऱ्या प्रकारची रोपे ही विकृत असतात आणि अशी रोपे अनुकूल परिस्थितीत सुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाही पूर्ण झाडांमध्ये वाढ होण्याचे क्षमता त्यांच्यात नसते त्यांचा कोंब आणि मुळांना इजा असलेले, तसेच बियाणांशी निगडित असलेल्या बुरशीमुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात.
कठीण बी : तिसरा प्रकार हा न उगवलेल्या बियाण्यांचा असतो असे उगवणीला ठेवल्यानंतर आठ दहा दिवस अजिबात उगवत नाही यामध्ये काही बियाणे पाणी न शोषल्यामुळे उगवत नाही यांनाच कुचर किंवा कठीण म्हणतात. परंतु काही बी हे त्याच्या स्तृप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाहीत, काही बी हे पोकळ बियाणे, किडलेले बियाणे, हे सर्व याच प्रकारात मोडतात.

Seed Germination 2025अशा प्रकारे उगवलेल्या बियाणांची वर्गवारी करून साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियाणांची टक्केवारी काढतात. प्रत्येक पिकांमध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रामाणिक केलेली आहे. प्रमाणापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.
उगवणीच्या टक्केवारी मध्ये 10 टक्क्यापर्यंत कमी उगवण असल्यास एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा 10 टक्के जास्त बियाणे वापरावे परंतु त्यापेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास असेही आणि वापरू नये.
पेरणीसाठी वापरावयाच्या बियाणांचे शेतकऱ्यांनी परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जवळील बीजप्रयोग शाळा, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यालय, कृषी विज्ञान, कृषी विभाग, यांच्याशी संपर्क साधून वापरण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणशक्ती तपासून घ्यावी.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |