Gram Cultivation Technology 2025 कडधान्य पिकांचे पीक फेरपालटी मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. जमिनीचा कस सुधारणे व टिकवून ठेवणे यामध्ये कडधान्य पिकांचे मोठे योगदान आहे. विविध पीक पद्धतीत कडधान्य पिकांचा समावेश केल्यामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमुळे हवेतील नत्र स्थिरीकरण होते व नत्र खतांच्या मात्रेत बचत होते. शिवाय कडधान्य पीकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी चांगल्या प्रकारचे बेवड होते.

रब्बी हंगामात घेतली जाणारी जी वेगवेगळी कडधान्य पिके आहेत त्यामध्ये हरभरा हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे अलीकडे या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. असे असले तरी महाराष्ट्राची सरासरी हरभरा उत्पादकता कमी (762 किलो प्रती हेक्टर) आहे. देशाच्या हरभरा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 14.84% आहे हरभरा पिकाची उत्पादकता व गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.
करडई बीजोत्पादन तंत्रज्ञान!!
जमीन: Gram Cultivation Technology 2025
हरभरा पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी काळी कसदार जमीन आवश्यक्य आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होणारा असावा अत्यंत हलकी जमीन लागवडीसाठी वापरल्यास उत्पन्नात घट येते पाणथळ चोपण किंवा क्षारयुक्त जमिनीत लागवड केल्यास आर्थिक दृष्ट्या फायदेशीर उत्पन्न मिळत नाही.

मशागत: Gram Cultivation Technology 2025
खरिपाचे पीक काढणीनंतर जमिनीची खोलवर नांगरट करावी खरीप हंगामातील पीकास शेणखत दिले नसल्यास हेक्टरी 5 टन शेणखत द्यावे.
पेरणीची वेळ: Gram Cultivation Technology 2025
हरभरा पीक रब्बी हंगामात घेतले जाते त्यामुळे त्यास कोरडी व थंड हवाला चांगली मानवते बागायती क्षेत्रामध्ये 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते. काबुली हरभरा पिकाची पेरणी ज्या ठिकाणी सिंचन सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणीच करावी.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेले हरभऱ्याचे वाण व त्यांची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत;
वाण | कालावधी (दिवस) | उत्पादन (क्विंटल/हेक्टर) | वैशिष्ट्ये |
विजय | 105 ते 110 | 35-40 | अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम. |
विशाल | 110 ते 115 | 30-35 | अधिक उत्पादन, आकर्षक पिवळे टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक |
दिग्विजय | 105 ते110 | 35-40 | पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मररोग, प्रतिकारक, जिरायत बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य. |
विराट | 110 ते 115 | 30-32 | काबुली वान, अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम. |
फुले विक्रम | 105 ते 110 | 35-40 | उंच वाढणारा वाण असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त, अधिक उत्पादन क्षमता मर रोग प्रतिकारक, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्य करिता प्रसारित |
Gram Cultivation Technology 2025 पेरणीची पद्धत:
पाभरणीने तिफणीने पेरणी : दोन ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व दोन रोपांतील अंतर 10 सेंटीमीटर.

टोकन : भारी जमिनीत 20 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सेंटिमीटर अंतरावर 1-1 बियाणे टोकावे. काबुली वाणांसाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी केली तर उगवण चांगल्या प्रकारे होते.
बीजप्रक्रिया : Gram Cultivation Technology 2025 हरभरा पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम+ 2 ग्रॅम बावीस्टीन 3 किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. पिकाच्या मुळांवरील नत्राच्या ग्रंथी वाढवण्यासाठी व नत्र स्थिरीकरणासाठी 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे.
खतमात्रा : हरभरा पिकास खतमात्रा ठरवण्यासाठी पेरणीपूर्वी माती परीक्षण करून माती परीक्षण अहवालानुसार खत देणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार खतमात्रा कमी जास्त होते. संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे शक्य होते. खतावरील अवास्तव खर्च टाळता येतो तसेच एखाद्या अन्नद्रव्य कमी असेल तर ते वाढवून त्याची गरज भागवली जाते व उत्पन्नात घट येत नाही.
शिफारसीत खत मात्रेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी हेक्टरी 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यासाठी हेक्टरी 125 किलो डीएपी आणि 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश 2 चाड्याच्या पभरणीने बियाणे व खते एकाच वेळी द्यावीत. पीक फुलोऱ्यात असताना दोन टक्के युरियाची फवारणी करावी.

अंतर मशागत : Gram Cultivation Technology 2025 पिकाची वाढ चांगली होण्यासाठी व चांगले उत्पन्न येण्यासाठी सुरुवातीपासूनच शेत तण विरहित ठेवावे. सपाट वाफ्यावर पेरणी केली असेल तर पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी वाफशावर करावी कोळपणे नंतर आवश्यकतेप्रमाणे एक खुरपणी करावी. तण नियंत्रणासाठी तणनाशक वापरावयाचे असल्यास पेरणी करताना वापश्यावर फ्लूयुक्लोरण अथवा स्टॉप हे तणनाशक 2.5 लिटर प्रति हेक्टर प्रमाणे 500 लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.
पाणी व्यवस्थापन: Gram Cultivation Technology 2025
हरभरा पिकास गरजेनुसारच पाणी देणे आवश्यक आहे पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास पीक पिवळे पडते व मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढते मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 35 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.
हरभरा पिकास 25 सेंटीमीटर पाणी लागते. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. हरभरा पिकास तुषार सिंचनाने पाणी दिल्यास आवश्यक तेवढेच पाणी देता येते. जमीन भुसभुशीत राहते, जमिनीची मशागत सुलभतेने करता येते, शेतामध्ये सर पाठ-वरंबा पडण्याची गरज नसते त्यामुळे रानबांधणी खर्चात बचत होते.
पीक संरक्षण: Gram Cultivation Technology 2025
हरभरा पेरणीच्या वेळी शेतामध्ये ज्वारीचे धान्य हेक्टरी 200 ग्रॅम या प्रमाणात विस्कटून दिले असता पीक फुलोऱ्यात व घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला तर पक्षी बसवण्यासाठी थांबे म्हणून ज्वारी पिकाचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो अथवा पक्षाने बसायला जागोजागी तूर काटक्याची मचाणी लावावीत.
घाटे अळी ही हरभरा पिकावरील मुख्य कीड आहे. घाटे अळीमुळे पिकाचे 30 ते 40% नुकसान होते, पीक आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानांवर पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात. यावेळी निंबोळी अर्क 5 टक्के द्रावणाची एक फवारणी पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस द्यावी. यासाठी 25 किलो निंबोळी पावडर रात्रभर 50 लिटर पाण्यात भिजत ठेवावी, सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क काढून त्यामध्ये 450 लिटर पाणी टाकावे व ते द्रावण एक हेक्टर क्षेत्रासाठी फवारावे.
पुढे 10 ते 15 दिवसांनी हेलीओकील 500 मिली 500 लिटर पाण्यातून पती हेक्टर या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यकता असल्यास तिसरी फवारणी 18.5 टक्के एस.सी. क्लोरएन्ट्रीनिलीप्रोस 100 मिली प्रति हेक्टरी 50 लिटर पाण्यातून फवारावे.

काढणी : 110 ते120 दिवसांमध्ये हरभरा पिक काढणीस तयार होते घाटे कडक वाळल्यानंतर हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. साठवणुकी दरम्यान कीड लागू नये म्हणून कडुलिंबाचा पाला 5 टक्के बियाणात टाकून ठेवावा.
उत्पादन : Gram Cultivation Technology 2025 अशा पद्धतीने सुधारित वाण, अन्नद्रव्य व्यवस्थापन, तन व्यवस्थापन, पीक संरक्षण या प्रत्येक गोष्टीचा अवलंब केल्यास हेक्टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |