Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 सोयाबीन हे खरीप हंगामातील कमी कालावधी तयार होणारे नगदी गळीत पीक आहे. हे पीक 90 ते 110 दिवसात तयार होते. त्यामुळे वर्षभरात आपल्या शेतात घ्यावयाच्या पिकांचे नियोजन योग्य प्रकारे करता येते, हे शेंगवर्गीय पीक असल्यामुळे यांच्या झाडांच्या मुळांवरील गाठीद्वारे हवेतील नत्राचे जमीन स्थिरीकरण होते. त्यामुळे या नत्रयुक्त खतांची मात्रा इतर पिकांपेक्षा कमी प्रमाणात लागते. शेतकऱ्यांमधील लोकप्रियतेमुळे या पिकाखालील क्षेत्र वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दैदिप्य मान यशामुळे सुधारित वाणांचा प्रसार बहू कालावधीत तयार होणाऱ्या वाणांचा प्रसार जैविक व अजैविक तणांस प्रतिरोध सहनशीलता सुधारित पीक उत्पादन पद्धतीचा प्रसार काढण्याच्या वेळी शेंगा फुटण्यास प्रतिरोध वाणांची निर्मिती बहुउद्देशीय वाणांची निर्मिती इत्यादींमुळे सोयाबीन शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. व याची लागवड करण्यास मोठ्या प्रमाणावर वाव निर्माण झाला आहे.
गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या; लसीकरणाची गरज, फायदे आणि संभ्रम!!
Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 आपल्या देशात या पिकाखालील असणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी 30 ते 33 टक्के क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्रामध्ये असते. हे पीक महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, आणि खानदेशी या प्रादेशिक विभागांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या राज्यात या पिकाखालील क्षेत्र दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. तसेच बाजार भाव वधरल्यामुळे यावर्षी देखील या पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची अपेक्षा आहे.

या पिकाचे अधिक उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणींपैकी शिफारस केलेल्या वाणांच्या माहितीचा अभाव बियांची उगवण शक्ती कमी असणे बियाणांच्या गुणवत्तेचा अभाव बियाणांची उगवण शक्ती तपासण्या विषयीच्या ज्ञानाचा अभाव यांचा समावेश होतो. सदर लेखाद्वारे पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासण्याचे महत्त्व व उगवण शक्ती तपासण्याच्या पद्धती जाणून घेणार आहोत.
पेरणीसाठी सोयाबीनच्या सुधारित वाणांची निवड करण्याचे महत्त्व;
Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे जर पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरले तर मिळणारे उत्पादन देखील चांगले मिळते. आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था यांनी महाराष्ट्रातील जमीन व हवामान यांना अनुकूल असणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची निर्मिती केली असून त्यांची राज्यात लागवड करण्यासाठी प्रसार शिफारस केलेली आहे. त्याचप्रमाणे पूर्वी प्रसारित झालेले वाण काढणे उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास तसेच रोग व किडींच्या प्रादुर्भाव बळी पडत होते.

परिणामतः उत्पादनात घट येत असेल म्हणून मध्यम कालावधीत येणारे शेंगा फुटण्यास प्रतिरोधक रोग व किडींना प्रतिबंधक असणारे आणि कमी पावसावर येणाऱ्या वाणांच्या निर्मितीकडे कल वाढत गेला परिणामी पश्चिम महाराष्ट्र, खानदेश विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये जमीन व हवामान यानुसार लागवड करता येऊ शकणारे व जास्त उत्पादन क्षम सोयाबीन वाणांची निर्मिती करण्यात आली.
Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 जास्त उत्पादन क्षम कीड व रोगांना कमी बळी पडणारे आणि शेंगा फुटण्यास प्रतिबंधक अशा सोयाबीन वाहनांची पेरणीसाठी निवड करणे गरजेचे असते. महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रामुख्याने एम. ए. सी. एस. 1188, एम.ए.सी.एस. 1281, एम.ए.सी.एस. 1460, एम.ए.सी.एस. 1520, के.डी.एस. 344 (फुले अग्रणी), के.डी.एस. 726 (फुले संगम), एम.ए.यु.एस. 162, एम.ए.यु.एस. 612, ए.एम.एस. 1001 (पीडीके व्ही येलो गोल्ड) व ए.एम.एस. – एम.बी. 5-18 या सुधारित वाणांची शिफारस करण्यात आलेली असून यापैकी वाणांची शेतकऱ्यांनी पेरणीसाठी निवड करावी.
सोयाबीन बियाण्याच्या गुणवत्तेचे महत्त्व
सोयाबीनच्या पिकाची सुदृढ व निरोगी वाढ होऊन त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीसाठी वापरावयाच्या बियाणांची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक असते. म्हणून जास्त असेल तर बियाण्याची गुणवत्ता चांगली असते व अशा बियाण्यांपासून अंकुरण म्हणून आलेले रोग निरोगी व सुदृढ तयार होते. सोयाबीनच्या बियाणांची गुणवत्ता ही त्यांची भॊतिक शुद्धता, उगवण क्षमता आणि त्यांचे सामर्थ्य हे या तीन प्रमुख घटकावर अवलंबून असते.

Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 बियाणांची शुद्धता:
पेरणीसाठी लागणारे बियाणे शुद्ध असावे बियाणांमध्ये रोगग्रस्त बिया उदा. जांभळी किंवा काळे डाग असणारे, पापुद्रा तुटलेले, पृष्ठभागावर रेषा व सुरकुत्या पडलेले, अर्धवट पोचलेले-हिरवट रंगाच्या बियाणांचे मिश्रण नसावे. किंवा काळा डाग असलेले बियाणे पेरल्यास पिकांमध्ये करपा व पिवळा मोझाईक रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. तसेच पापुद्रा तुटलेले पृष्ठभागावर रेषा सुरकुतलेल्या, अर्धवट पोचलेले हिरवट रंगाचे बियाणे पेरल्यास, पिकाची उगवण कमी होऊन शेतात रोपांची संख्या कमी होते. त्याचप्रमाणे बियाणे हे एका जातीचे असायला हवे त्यामध्ये दुसऱ्या जातीच्या बियाणांचे मिश्रण नसावे.
अशा प्रकारचे मिश्रण आपण बियांच्या आकार व त्याच्या नाकाडाच्या (हायलम) रंगावरून ओळखू शकतो. जर आपण वेगवेगळ्या जातीचे मिश्रण असणारे बियाणे पेरणीसाठी वापरले तर पिकाची काढणी एकाच वेळेस करता येत नाही व उत्पादनामध्ये घट येते.
Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 बियाणांची उगवण क्षमता:
बियाणाची उगवण क्षमता म्हणजे एका बी पासून ओलावा हवा व योग्य तापमान मिळाल्यास अंकुर तयार होऊन त्यापासून निरोगी व सुदृढ रोप तयार होण्याची क्षमता होय.
Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 बीज सामर्थ्य:
बियाण्याची यशस्वी अंकुरणनंतर निरोगी व सुदृढ रोप तयार होण्याच्या शक्तीस बीज सामर्थ्य म्हणतात. बीज सामर्थ्य चांगले असल्यास रूपांची वाढ अधिक चांगली व जोमाने होते व त्यामध्ये जैविक अजैविक या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुदृढ व निरोगी राहण्याची क्षमता निर्माण होते.
सोयाबीन पेरणीपूर्व बीज परीक्षण करण्याचे महत्त्व:
साधारणता छोट्या व मध्यम जमिनीचे क्षेत्र असणारे शेतकरी प्राप्त उत्पादनाखाली छोटा हिस्सा पुढील हंगामातील पेरणीसाठी राखून ठेवतात व उरलेला भाग बाजारात विकतात. सोयाबीनच्या बियाणांची गुणवत्ता हाताळणी साठवणुकीच्या वेळी कमी होते. सोयाबीनच्या बियाण्याचे गुणवत्ता कमी होण्याचे प्रमाण हे सोयाबीनचे वाण व साठवणुकीसाठी अवलंबलेली पद्धती यांवर अवलंबून असते.
बियाण्याचे साठवण करताना योग्य ती सावधानता राहण्याचा बाळगली नाही तर जास्त नुकसान होते. बियाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्राथमिक माहिती असल्यास शेतकरी असे बियाणे पेरणीसाठी वापरायचे की नाही याचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. सोयाबीन उत्पादक क्षेत्रामध्ये पेरणीसाठी गुणवत्तापूर्वक बियाण्याची कमतरता भासते त्यामुळे मूल्यवान बियाणे योग्य प्रमाणात पेरणीसाठी वापरले पाहिजे.
सोयाबीनच्या बियाणांची उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती:
आपल्या शेतावर सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी तीन पद्धती आहेत. त्यापैकी एका पद्धतीचा अवलंब करणे उपयुक्त ठरते.
पटकर किंवा गोणपाट वापरून:
Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 यामध्ये घरच्या बियाणाची चाळणी करून त्यातील काडी कचरा तुटके व खराब दाणे इतर पिकांचे बियाणे खडे साफ करून घ्यावे. प्रथम गोणपाट पाण्याने ओले करून घ्यावे त्यावर 100 बिया एका ओळीत 10 बिया याप्रमाणे 10 ओळीत मांडाव्यात त्यानुसार दुसरे पटकर किंवा गोणपाट घेऊन ठेवलेल्या बियांवर ओली करून अंथरून घ्यावे. 4 ते 5 दिवस ओलावा टिकून राहण्याकरिता त्यावर 4 ते 5 दिवसानंतर 100 दाण्यांपैकी किती बियांना अंकुर आले ते पहावे.

मोठ्या उथळ ट्रेमध्ये वाळू व मातीचे मिश्रण वापरून:
बियाणाची उगवण क्षमता तपासण्यासाठी एका मोठ्या उथळ ट्रेमध्ये वाळू व मातीचे मिश्रण भरून त्यामध्ये 50 टक्क्यांपर्यंत पाणी भरून ओले करावे. ओल्या मातीमध्ये बियाणे लॉट मधील 100 बियाणे 2 सेंटीमीटर खोलीवर व 2 बियांमधील अंतर 2 सेंटीमीटर व 2 ओळीतील अंतर 5 सेंटीमीटर राहील असेल पेरावे.
माती सुकू नये याकडे लक्ष द्यावे व गरजेप्रमाणे त्याच पाणी फवारून द्यावे 5 ते 7 दिवसानंतर उघडून आलेल्या रोपांची संख्या मोजावी जर 70 किंवा त्याहून जास्त रोपसंख्या उगवून आलेले असेल, तर बियाणे उत्तम आहे असे समजावे. उघडून आलेल्या रोपांचे योग्य तापासण्यासाठी 3 रोपे मधील मातीत पुरेसा ओलावा असताना मातीतून अलगद उपटून घ्यावेत मुळे व रोपांची वाढ यांचे व्यवस्थित निरीक्षण करावे सुदृढ रोपांची वाढ सरळ असते तर मुळांची व खोडांची वाढ योग्य प्रमाणात असते.
Germination Capacity of Soybean seeds at home before sowing 2025 कागद वापरून:
उगवण क्षमता तपासण्यासाठी वापरावयाचा कागद उपलब्ध न झाल्यास वर्तमानपत्राच्या आकाराचा एक कागद घेऊन त्यास 4 घड्या पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो घडी घातलेला पूर्ण कागद किंवा उगवण क्षमता तपासण्यासाठी वापरावयाचा कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून घडी केलेल्या कागदाच्या किंवा उगमन क्षमता तपासण्यासाठी वापरावा या जगाच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने 100 बियांच्या 10 गुंडाळ्या तयार कराव्यात नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत 4 दिवस तश्याच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |