Brassica Crops 2025 कोबी वर्गीय पिकांमध्ये कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रोकोली या पिकांचा समावेश होतो ही पिके थंड हवामानात येणारी असल्यामुळे यांना कॉल क्रोप म्हणतात. कृष्ण हवामानात चांगले उत्पादन देणाऱ्या जातींमुळे या पिकांच्या लागवडीच्या हंगाम फक्त हिवाळापुरता मर्यादित न राहता ही पिके जवळपास वर्षभर घेता येतात.

तसेच कोबीवर्गीय पिके आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कोबी वर्गीय भाज्यांमध्ये जीवनसत्व अ आणि क मुबलक प्रमाणात असते कोबी वर्गीय पिकांमध्ये प्रामुख्याने घाण्या रोग, रोपे कोलमडणे पानावरील ठिपके व पानांवरील पांढरे फोड हे रोग आढळतात. किडीमध्ये प्रामुख्याने मावा चोकोनी ठिपक्यांचा पतंग व काळी माशी या किडी आढळतात.
राज्यात ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता;
रोग Brassica Crops 2025
1. घाण्या रोग : हा रोग जिवाणूजन्य असुन झान्थोमोनास कॉम्पेस्त्रीस जिवाणूमुळे होतो. या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या रोगाचे जिवाणू झाडांचा पालापाचोळा रोगग्रस्त झाडांचे अवशेष यामध्ये सुमारे दोन वर्षा जिवंत राहू शकतात. 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात या रोगाची वाढ व प्रसार झपाट्याने होतो.

सुरुवातीच्या काळात या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणामुळे होतो हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. या रोगाच्या सुरुवातीच्या काळातील लक्षणे ही पानांच्या कडावर दिसून येते. नंतर पान पिवळे पडण्यास सुरुवात होते. पानांच्या शिरा काळ्या होतात तसेच खोडाच्या आतील भाग व मुळे काळपट होऊन रोगग्रस्त झाड सडून जाते.
Brassica Crops 2025 या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बी 50 अंश सेल्सिअस तापमानाच्या कोमट पाण्यात 30 मिनिटे बुडवून घ्यावे व सुकवावे. त्यानंतर ते रोपवाटिकेत पेरावे तसेच कॉपर ऑक्झीक्लोराइड 30 ग्रॅम व स्टेप्टोमासिन 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दर 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करावी.
2. रोपे कोलमडणे : हा रोग पिथियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे रूपे जमिनीलगतच्या भागात कुजून कोलमडतात म्हणून या रोगास टायपिंग ऑफ असे म्हणतात. हा रोग रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झीक्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण रोपांच्या मुळाभोवतीत ओतावे. तसेच वाफ्या मध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

3. पानावरील ठिपके : Brassica Crops 2025 हा बुरशीजन्य रोग असून अल्टरनेरिया ब्रासिकोला नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरुवातीच्या काळात पानांवर लहान आकाराचे पिवळसर करड्या रंगाचे ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके हळूहळू मोठे होत जातात व त्याचा रंग काळपट पडतो रोगग्रस्त झाडाचे पान तोडून असे ठिपके सूर्यप्रकाशाच्या दिशेने पाहिले असता करड्या रंगाच्या या ठिपक्यांमध्ये वलय दिसतात. झाडाची कोवळी पाने या रोगास लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसतात मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
4. पानांवरील पांढरे फोड : हा रोग अल्ब्यूगोकँडिडा नावाच्या बुरशीमुळे होतो या रोगाची बुरशी पर्णरंधरामधून रोपांच्या पानांमध्ये प्रवेश करते. त्यामुळे पानाच्या वरच्या व खालच्या बाजूवर फोड आल्यासारखे दिसतात कालांतराने हे फुटल्यावर त्यातून चमकदार पांढऱ्या रंगाची भुकटी आलेली दिसते.
ही भुकटी म्हणजे बुरशीचे बीजाणू असतात ते हवेमार्फत सहज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. अशा प्रकारे निरोगी रोपास या रोगाची लागण होते 10 ते 15 या रोगाचा प्रसार जास्त होतो या रोगाच्या नियंत्रणासाठी सल्फर 80% (थझ) 25 ग्रॅम किंवा डायथेन एम 45 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
किडी Brassica Crops 2025
1. मावा : हिरव्या व काळ्या रंगाचे बारीक किडे कोवळ्या पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाणी सुरकुत्यासारखी होऊन पिवळी पडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडायक्लोप्रिड (17.8 % )3 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून वापरावे.

2. चौकोनी ठिपक्यांचा पतंग : Brassica Crops 2025 या किडीची अळी पानाच्या खालच्या बाजूस राहून छिद्री पाडून पानातील हरितद्रव्य खाती ही कीड पाने खाऊन त्याची चाळण करते. ही कीड सप्टेंबर पासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते. या किडीच्या नियंत्रणासाठी मुख्य पिकाच्या कडेने मोहरी पेरावी. मोहरी हे सापळा पीक असल्याने ही कीड मोहरी पिकाकडे आकर्षित होऊन कमी नुकसान होते. क्लोरनटेनिलीप्रोल 3 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच निंबोळी तेल (10 हजार पी पी एम) 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3. काळी माशी : ही एक प्रकारची माशी असून पाण्याच्या पेशीत अंडी घालते अंड्यातून निघालेली काळ्या रंगाची अळी कोवळ्या रोपांची पाने खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाणी खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडायक्लोप्रिड (17.8 % )3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |