Intercropping in Banana Orchard 2025 केळी हे देशातील प्रमुख फळपीक आहे देशातील फळपिकाखाली असणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी 12% क्षेत्र केळीने व्यापले असून एकूण फळ उत्पादनात केळीचा वाटा सुमारे 38.3% एवढा प्रचंड आहे. मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन होत असले तरी उत्तम दर्जाची केळी उत्पादित करण्यासाठी योग्य वाणांची निवड खत, पाणी, रोग, कीड व्यवस्थापन बरोबरच अंतर मशागतीची कामे वेळेवर व काटेकोरपणे करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

यामध्ये प्रामुख्याने बागेची कुळवणी, बांधणी, आंतरपीक व्यवस्थापन, तन नियंत्रण, पिके कापणी, अच्छादनाचा वापर, केळफुल कापणे, बाष्परोधकांचा वापर, झाडांना आधार देणे, इत्यादी. बाबींचा समावेश होतो. ही अंतर मशागतीची कामे वेळीच केल्यास पीक वाढीस पोषक परिस्थिती उपलब्ध होऊन चांगली अन्नद्रव्य पाणी यांची अधिकतम कार्यक्षमता मिळवून पिकांची वाढ चांगली होते व पर्यायाने उत्पन्न आणि चांगला दर्जा मिळून चांगले बाजारभाव मिळतात.
दुधी भोपळा लागवड तंत्रज्ञान!!
Intercropping in Banana Orchard 2025 बागेची कुळवणी व बांधणी
लागवडीपासून केळी बाग 3 ते 4 महिन्याची होईपर्यंत केळीच्या 2 ओळीतील जमीन छोटा ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरच्या साह्याने भुसभुशीत करून घ्यावी. चौरस पद्धतीत केळीच्या दोन्ही बाजूने तर पट्टा (जोड ओळ) पद्धतीत एकाच दिशेने कुळवणी करता येते. बाग मोठी झाल्यावर वाटपाण्यावर असलेल्या बागेची 3 ते 5 पाण्यानंतर टिचणी तर 2 ते 3 टिचण्यानंतर एकदा बागेची बांधणी करावी.

Intercropping in Banana Orchard 2025 ठिबक संच लावलेल्या बागेत झाडांना मातीची भर द्यावी अशा प्रकारे बागेची कुळवणी व बांधणी केल्यामुळे वाफ्यातील भेगा बुजवल्या जाऊन जमिनीचे तापमान योग्य राखण्यास मदत होते. झाडांना मातीची पुरेशी भर लागून झाडे पाण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे मुळांच्या वाढीस वाव मिळतो.
पिले कापणे
केळीचे कंद किंवा उतीसंवर्धित रोप लावल्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर मुख्य खोडा लागतात. पिले येण्यास सुरुवात होते हे पिले मुख्य पिकाचे अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश, पाणी याबाबत स्पर्धा करतात. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ कमी होते निसवन उशिरा होते फळांच्या दर्जात घट होऊन घडाची पक्वता ही लांबते त्यामुळे अशी सर्व पिले दर 15 ते 25 दिवसांनी धारदार विळीच्या साह्याने नियमितपणे कापावीत. ही पिले पशुखाद्य, अच्छादन किंवा कंपोस्ट बसवण्यासाठी वापरावीत.
Intercropping in Banana Orchard 2025 रोगग्रस्त पाने कापणे
केळी पानांवर करपा रोग अथवा इतर बुरशीजन्य रोगांची लक्षणे दिसत असल्यास पानांचा रोगग्रस्त भाग किंवा रोगाची तीव्रता अधिक असल्यास संपूर्ण पाने कापून घ्यावे. सर्व रोगग्रस्त पाने गोळा करून बागेबाहेर जाळून नष्ट करावीत केळीच्या पानांचे सर्वसाधारण आयुष्य 5 महिन्यांचे असते नंतर ती पाने पिवळी होऊन सुखतात त्यामुळे थंडी उष्ण वाऱ्यांपासून खोडांचे संरक्षण होते.

रोगग्रस्त झाडे काढणे
केळी बागेत कोणत्याही प्रकारची विषाणूजन्य झाडे आढळल्यास झाडे समूळ उपटून बागेबाहेर जाऊन नष्ट करावेत. बागेत एवीरनिया रॉट या जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास वरील प्रमाणे झाडे नष्ट करावेत व 100 लिटर पाण्यात 300 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 15 ग्रॅम स्ट्रॅप्टोसायक्लिन 300 मि.ली. क्लोरपायरीफॉस मिसळून द्रावण तयार करावे प्रत्येक झाडास 200 मि.ली. द्रावणाची अळवणी करावी.
Intercropping in Banana Orchard 2025 अंतर पीक घेणे
केळी पिकात लागवडीनंतर सुरुवातीच्या साडेतीन ते चार महिन्यांच्या काळात आंतरपीक घेणे शक्य होते. मात्र ही आंतरपिके मुख्य केळी पिकाशी स्पर्धा करणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच पिक विषाणू रोगांची पर्यायी यजमाने पिके नसावीत.
केळी पिकात दोन ओळी दरम्यान भुईमूग किंवा चवळी या आंतरपिकाची शिफारस करण्यात आली आहे. मूग किंवा चवळीचे आंतरपीक घेतल्यास जमिनीचा पोट सुधारून मातीतील नत्राची अधिक उपलब्धता होते. व जमिनीची सुपीकता टिकवली जाते, त्याप्रमाणे तणांचेही नियंत्रण होते.
Intercropping in Banana Orchard 2025 आच्छादनाचा वापर
पीकास दिलेल्या पाण्याच्या पुरेपूर उपयोग होऊन पाण्याच्या मात्रेत बचत व्हावी यासाठी वाफ्यांमध्ये खोडाभोवती केळीची वाळलेली निरोगी पाणी, उसाचे पाचट, बाजारीचे सरपट, जुन्या गव्हाचे भुसा, डाळवर्गीय पिकांचे कड, इत्यादी. सेंद्रिय पदार्थांचा पंचवीस सेंटीमीटर जाडीचा थर देऊन आच्छादन करावे.
अशा प्रकारे अच्छादन केल्याने जमिनीतून होणारे पाण्याचा बाष्पीभवनचा दर कमी होतो जमिनीचे तापमान नियंत्रित राहिल्याने मुळांना इजा पोहोचत नाही. सेंद्रिय पदार्थ कुजून तपासून त्यापासून पिकास अन्नद्रव्य व सेंद्रिय अम्ले उपलब्ध होतात. तसेच तणांचे प्रमाण कमी होऊन उत्पन्नातही वाढ होते.
Intercropping in Banana Orchard 2025 तन नियंत्रण
केळी पिकात एकूण 22 द्विदल व 6 एकदल तने आढळतात. पिकांच्या सर्व अवस्थांना संवेदनशील आहेत म्हणून पीक वाढीच्या सर्व अवस्थेत केळी पीक तणमुक्त असावे, सर्वसाधारण खरिपात तणांचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त असतो. तसेच तनही विषाणूजन्य रोगांची विशेषता कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगाची पर्यायी यजमान पिके असल्याने भाग नेहमी तणमुक्त ठेवावी.
कडक थंडीपासून बागेचे संरक्षण
हिवाळ्यात कडाकाच्या थंडीमुळे झाडांची वाढ खुंटते नवीन पाने येण्याचा वेग मंदावतो घडपक्व होण्यास अधिक कालावधी लागतो त्याचप्रमाणे घड वण्याचे प्रमाण वाढते अशावेळी थंडीपासून बागेचे संरक्षण व्हावे यासाठी पहाटेच्या वेळी बागेत पाणी द्यावे.
झाडांना कणखरता येण्यासाठी शिफारसीत खतांची मात्रा द्यावीत विशेषता पिकास पालाशयुक्त खतांची कमतरता भासू देऊ नये. प्रत्येक झाडाला एक ते दीड किलो लिंबोळी पेंड द्यावी, तसेच थंड व कोरड्या वाऱ्यापासून खोडाचे संरक्षण होण्यासाठी त्यावर लोम्बकळणारी वाळलेली मात्र निरोगी पाणी तशीच राहू द्यावीत.
झाडांना आधार देणे
Intercropping in Banana Orchard 2025 केळीचे झाड निवसल्यानंतर बाहेर पडणाऱ्या घडांच्या वजनात झपाट्याने वाढ होते. झाडाच्या अक्षाबाहेर लोम्बणाऱ्या घडामुळे झाड अचानक वाकते व काही वेळा मोडून पडते. घड परिपक्व होण्यापूर्वी झाड मोडू नये म्हणून झाडांना आधार देणे महत्त्वाचे आहे. यासाठी रोप कंदाची खोल सरीत लागवड व खोडाला मातीची भर लागण्याबरोबरच झाडांना आधार देणे ही आवश्यक्य ठरते. यासाठी काठा किंवा पॉलिप्रोपिलीन पट्ट्यांचा वापर करता येतो.
केळी पिकाचे वाऱ्यापासून संरक्षण
Intercropping in Banana Orchard 2025 वाऱ्याच्या दिशेला आडव्या व उंच दाट झाडांच्या रांगा म्हणजे वारा संरक्षक होय सर्वच फळबागांना वारा संरक्षकाची गरज असली तरी केळीच्या बाबतीत जास्त आवश्यक आहे. केळीच्या बागांना सोसाट्याच्या व जोराने वाहणाऱ्या वाऱ्यापासून तसेच उन्हाळ्यात वाहणाऱ्या गरम आणि थंडीच्या काळात वाहणाऱ्या अति थंड वाऱ्यापासून केळी बागेचे संरक्षणासाठी वारा संरक्षके आवश्यक्य असतात.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |