सेंद्रिय विचार हिरवळीची खते!! Organic Greenhouse Fertilizers 2025

Organic Greenhouse Fertilizers 2025 जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवण्याच्या हेतूने काही पिके घेऊन ती तशीच मातीत घडणे किंवा दुसऱ्या शेतातून आणून ती मातीत गाडणे. याला हिरवळीचे खत म्हटले जाते. नवीन या वनस्पतीच्या मुळावर नत्र स्थिर करणाऱ्या गाठी असतात, द्विदल अशी प्रकारची शेंगवर्गीय पिके हिरवळीच्या खतासाठी चांगली.

Organic Greenhouse Fertilizers 2025

WhatsApp Group Join Now

हिरवळीच्या खतांचे फायदे!

  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.
  • जमिनीच्या भौतिकवर रासायनिक गुणधर्मावर चांगला परिणाम होतो.
  • जमिनी मधल्या सूक्ष्मजीवाणूंना ऊर्जा व अन्न मिळते, त्याची वाढ जलद होते.
  • माती मोकळी राहते. मुळांची वाढ चांगली होते.
  • काही हिरवळीच्या पिकांपासून चारा व इंधनही मिळते.
  • जमिनीचा पोत सुधारतो.
  • जमिनीतले ह्युमसचे प्रमाण वाढते.
  • जमिनीत अच्छादित राहून तापमान फार वाढत नाही. झीज कमी होते.
  • जमिनीच्या खोल भागातूनही पिके पोषणद्रव्य खेचून घेतात. हीच पिके मातीत गाडल्यामुळे खोलवरची पोषणद्रव्ये वरच्या थरात येऊन पिकांना मिळतात.
  • पोषणद्रव्यांचा निचरा थोपविला जातो.
  • कडधान्य (शेंगवर्गीय) हिरवळ पिके रायझोबियम या नत्र स्थिर करणाऱ्या बॅक्टेरियांना आश्रय देतात. हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होतो.
  • एक एकर क्षेत्रात 25 ते 40 किलो नत्र स्थिर होतो.
  • क्षारयुक्त जमिनीत ढेंचाचे पीक सतत 4 ते 5 सीजन घेतले तर घातक सोडियमचे प्रमाण कमी होते. जमीन चांगली होते.
  • पिवळा धोतरा किंवा चिंचेचा पाला क्षारपड जमिनीत गाडल्यास सोडी जमिनीची सुधारणा होते.
  • हिरवळीचे खत केलेल्या जमिनीत उसाचे 15 ते 20 टन उत्पादन वाढते.
  • करंज किंवा कडू लिंबाची पाने हिरवळीच्या खतात असल्यास कीड कमी होते.

खरीप हंगामाचे नियोजन! 

Organic Greenhouse Fertilizers 2025 वैशिष्ट्ये

लेंग्यूमवर्गीय पिके –

वातावरणातला नत्र स्थिर करतात. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कुजण्यासाठी जमिनीतील पाणी कमी घेतले जाते. आच्छादन पर्यंत चांगला उपयोग होतो. जमिनीची भौतिक गुणवत्ता सुधारते.

नॉनलिग्युमिनस –

वातावरणातील नत्र स्थिर करू शकत नाहीत. पाण्याचे अंगी भूत प्रमाण कमी असते. त्यामुळे पुजण्यासाठी जमिनीतील पाणी घ्यावे लागते.

WhatsApp Group Join Now

Organic Greenhouse Fertilizers 2025 हिरवळीच्या खतांच्या पिकाची निवड

अनेक वनस्पती नत्र स्थिरीकरण करतात. त्यांचा हिरवळ खतासाठी उपयोग करता येतो. काही कडधान्य हिरवळ खतासाठी लावली तर त्यातील नायट्रोजन शेंड्यांकडे वाहून साठवला जातो.

शेंगा तोडून हिरवळ खत म्हणून वापरणे तितकेसे प्रभावी होत नाही. पण कडधान्यही मिश्र पिके किंवा फेरपालटीची पिके म्हणून चांगली.

हे पिके रायझोबिनच्या सानिध्यात चांगली वाढतात. यासाठी बीज प्रक्रिया चांगली पाण्याचा ताण प्रतिकूल पीएच पोषणद्रव्याची कमतरता यामुळे हिरवळ पिकांची वाढ खुंटते. त्याची पूर्तता थोडे रासायनिक अथवा सेंद्रिय खत देऊन करावी. हिरवळीच्या पिकास स्फुरदाची मात्रा दिल्याने मुख्य पिकासाठी उपयुक्त ठरते.

काही महत्त्वाची हिरवळीच्या खताची पिके

1. धेंचा (सेस्ब्यानीया अक्युलियाटा)

Organic Greenhouse Fertilizers 2025 अतिशय जलद वाढणारे हे पीक विविध प्रकारचे हवामान आणि जमिनीशी लवकर ताब्यात होते. पाण्याची कमतरता आती पाणी क्षारयुक्त जमीन अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे हिरवळीचे पीक येऊ शकते.

चार ते पाच हंगाम हे पीक घेतले तर क्षार जमिनी सुद्धा सुधारतात. यांच्या मुळावर गाठी असतात. त्यात बॅक्टेरिया राहतात. त्यामुळेच नत्र स्थिरीकरण होते.

याचे खोड नरम असते. त्यामुळे लवकर कुजते. दीड पावणे दोन महिन्यात खूप चांगली वाढ होते. त्यापासून एकही 6 ते 8 टन हिरवळीचे खत मिळते तीन महिन्यानंतर खोड जुनं होते एक तरी 10 ते 15 किलो बियाणे पुरते. आरंभवाड मंद असते पण नंतर झपाट्याने वाढ होते. बियाण्यास रायझोबिनची बीज प्रक्रिया आवश्यक असते.

2. खोडावर गाठी असणारा धेंचा (सेस्ब्यानीया रोस्ट्रॅटा)

हा सुद्धा धेंचाचाच एक प्रकार आहे. पण यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. खोड नरम असते याचे वैशिष्ट्य असे की यांच्या मुळावर आणि खोडावर सुद्धा नत्र स्थिर करणाऱ्या बॅक्टेरियाच्या गाठी असतात. आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था मनीला येथून इ.स.1980 मध्ये ही वनस्पती भारतामध्ये आली.

निकषपरिणाम
भरपूर बायोमासजमिनीतील रासायनिक पोषण द्रव्य वनस्पतींमध्ये आत्मसात होऊन त्यांचे सेंद्रिय खतात रूपांतर होते.
खोलमुळेमुख्य पिकांची मुळे ज्या खोलीपर्यंत पोहोचू शकत नाही अशा थरातून पोषण द्रव्य खेचून वरच्या थरात आणली जातात.
जलद आरंभवाढलवकर जमीन झाकली जाते मातीची झीज थांबते. तण नियंत्रण
भरपूर पालवीलवकर कुजून मुख्य पिकाला अन्यद्रव्य उपलब्ध होतात.
कब्र : नत्र सूक्ष्म जीवाणूंना पुरेशी ऊर्जा व भरपूर नत्र मिळतो. त्यांची वाढ चांगली होते.
नत्र स्थिरीकरणहवेतील नत्र मुलाच्या गाठी वरील जिवाणूमुळे स्थिर होतो.

आपल्याकडे नदीबुड क्षेत्रात मळी जमिनीत हिरवळ खतांचा हा प्रकार योग्य आहे. पाणथळ स्थितीत यांच्या खोडावर जास्त ग्रंथी येतात. इतर कोणत्याही शेंगावर्गीय वनस्पती पेक्षा यावर दहापट जास्त नत्र स्थिर करणाऱ्या ग्रंथी असतात.

याचा चांगला उपयोग होतो. बीज पेरून किंवा खोड अथवा मुळाच्या कांड्या लावून हे पीक घेता येते. एकेरी १२ ते १५ किलो बियाणे पुरते. बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी त्यांच्या सालीला खरे पडतील असे घासावे. एप्रिल ते जुलै या काळात पेरणी केल्यास जास्तीत जास्त पीक येते.

प्रकाश व थंडीला संवेदनशील असल्यामुळे थंडीच्या दिवसात हे पीक चांगले वाढत नाही. पाच फूट रुंद सरीने ऊस लागण असल्यास गोदावरी याचे टोचे घातले तरी नदीबुड क्षेत्रात सुद्धा दोन टन हिरवळ खत एकेरी मिळते.

3. ताग किंवा सणहेंप(क्रोटोलेरिया जुंसी)

Organic Greenhouse Fertilizers 2025 काळ्या कसदार जमिनीत हे पीक खूप जोमदार येते, दीड महिन्यात कापणीला येते, आती पाणी मानवत नाही, पालवी करड्या हिरव्या रंगाचे असते. एकेरी 8 ते 10 टन हिरवळ खत होते. धागेदार असल्याने जमिनीचा पोत सुधारतो एकेरी 10 ते 15 किलो बियाणे पुरते बियाणास रायझोबियम जिवाणू प्रक्रिया फायद्याची ठरते.

4. गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया मॅक्युलाटा)

Organic Greenhouse Fertilizers 2025 झुडूपासारखी वाढणारी ही वनस्पती अनुकूल परिस्थितीत वृक्षाचा आकार घेते. पाणथळ तसेच बागायती शेतीच्या बांधावर याची लागवड करता येते. याची पालवी व कोवळे डहाळे हिरवळीच्या खतासाठी वापरतात. वर्षभरात 2 ते 3 वेळेला छाटणी करून भरपूर पालवी मिळते व आकार झुडपा सारखा ठेवता येतो. बीज अथवा कांड्या लावल्या तरी संवर्धन होते प्रत्येक झुडूपापासून 5 ते 10 किलो पाला मिळतो. एकेरी शेत शेताच्या बांधावर 125 ते 150 जोडपे लावल्यास दीड ते पावणे दोन टोन पाला हिरवळ खतासाठी मिळतो. याच्या बियांमध्ये उंदीरनाशकाचा गुणधर्म आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment