Pests and Diseases Management 2025 कीड:
मावा:
Pests and Diseases Management 2025 ही किड कोवळी पाने फळावरील पेशीद्रव्य शोषून घेणारे अत्यंत लहान आकाराचे असून प्रजातीनुसार तिचा रंग हिरवा, पिवळा, तपकिरी, काळपट असतो. या किडीच्या शरीरातूनही गोड चिकट पदार्थ स्त्रवतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पाणी वेडीवाकडी होऊन फांद्यांची वाढ थांबते.

पिठ्या ढेकूण:
पिठ्या ढेकूण ही कीड ममिलीबगफ किंवा वाफपांढर्यास ढेकण्या नावानेही ओळखले जाते. या केळीच्या निरनिराळ्या प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात. उष्ण आणि कोरड्या हवामानात या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या किडीच्या शरीराला मऊ कापसासारखे आवरण असल्याने कीटकनाशक किडीपर्यंत पोहोचण्यास अडथळा येतो. म्हणून या किडीच्या बाल्यावस्थेतच जर कीटकनाशकांची फवारणी केली तर या किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. पिल्ले नारंगी रंगाची असतात.
हिरव्या चाऱ्यासाठी चवळी पिकांचे उत्पादन!
हे कीटक झाडांवरील फळांवरील देठांवर तसेच फळांच्या खालील पाकळीत कापसासारख्या आवरणाखाली पुजकांच्या स्वरूपात एका जागेवर राहून पेशीद्रव्य शोषतात. या किडीच्या शरीरातून चिकट स्त्रवत असल्याने फळे चिकट होऊन त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. फळे लहान असताना जर प्रादुर्भाव झाला तर अशी फळे चिकट-काळपट झाल्याने बाजारात विकण्यायोग्य राहत नाही. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फळांची गळ होते. कळी अवस्थेत सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळी कळ्या गळून पडतात.

फुलकिडे व कोळीकिड:
ही कीड पानांचा फळांचा पृष्ठभाग खरडून त्यातील पेशी द्रव्य शोषून घेतात. त्यामुळे पानांची वेडीवाकडी वाढ होऊन पानांवर फळांवर तपकिरी रंगाचे चट्टे दिसून येतात. ही कीड अत्यंत लहान असल्याने सहजरित्या दिसून येत नाही.
स्केल किंवा देवी किंवा खवले कीड:
नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यापासून या किडीचा प्रादुर्भाव सुरू होत असून, तो मार्चपर्यंत राहतो. मध्यम व पूर्ण वाढ झालेले खवले किडे पानातून कोवळ्या फांद्यातून व फळांतून रस शोषून घेतात. रस शोषणाच्या क्रियेमुळे फांद्या सुकतात व काही वेळा वाळून जातात.
किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास संपूर्ण झाड वाळून जाते. तसेच ही कीड मधासारखं चिकट व गोड पदार्थ बाहेर टाकते. या चिकट गोडपणामुळे यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पानांसह संपूर्ण झाड काळे दिसते याचा फळाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
फळे पोखणारी अळी (सुरसा अळी ):
ही कीड मुख्यत्वे पावसाळ्यात मृग बहारावरील फळांवर आढळून येते. या किडीच्या तपकिरी निळा रंगाच्या पाकोळ्या असून त्या फळांवर फुलांवर साबुदाणापेक्षा थोड्या लहान आकाराचे अंडी घालतात. अंड्यातील बाहेर आलेली अळी फळाच्या फुलाच्या आतील भागात जाऊन तेथे आपली उपजीविका करते.

फळाला पडलेल्या छिद्राद्वारे अळीची विष्ठा बाहेर येते. ही अळी रंगाने काळी व अंगावर पांढरे डाग असतात, पूर्ण वाढ झालेली आणि 17 ते 20 मिली लांब असते. अशा फळात छिद्रावाटे जिवाणू तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळे कुजून खराब होतात, परिणामी उत्पादनात घट येते.
Pests and Diseases Management 2025 खोडाची साल काढणारी अळी:
ही अळी विशेषता: जुन्या बागेवर तसेच दुर्लक्षित झाडांवर मोठ्या प्रमाणात दिसून येते. या किडीचा अळ्या मुख्यत्वे खोडाची साल खातात तसेच फांद्यांच्या बेचक्यात छिद्र पाडून आतील भाग पोखरतात. किडीचे विष्ठा आणि तिने पोखरलेला भुसा फांदीच्या बेचक्यालगत जाळीसारखा दिसून येतो. पूर्ण वाढ झालेली अळी 50 ते 60 मिली लांब असून काळसर तपकिरी रंगाची दिसते.
या किडीच्या नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवून झाडांची जास्त गर्दी देऊ नये तसेच, किडीने पोखरलेल्या छिद्रामध्ये बारीक तारेला पेट्रोल किंवा रॉकेलचा गोळा बांधून तो त्यामध्ये घालून छिद्र चिखलाने बंद करावे.
मोसंबी संत्रावरील हे पतंग आता डाळिंबावर मोठ्या प्रमाणात आढळतात यांच्या अनेक जाती असून वेगवेगळ्या रंगाचे लहान मोठे आढळून येतात. हे पतंग रात्रीच्या वेळी पावसाळ्यामध्ये (जुलै ते ऑक्टोबर) डाळिंबाचे पक्व फळातील रस शोषतात.
त्यामुळे फळात इतर जिवाणू व बुरशीचा प्रादुर्भाव होतो. हे छिद्र अतिशय लहान असल्याने सहजासहजी दिसून येत नाही. मात्र, छिद्राच्या भोवती नंतर गोलाकार काळात सडलेला भाग दिसतो आणि त्यामुळे पुढे फळांची गळ होते.
पाने खाणारी अळी:
अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पानांच्या खालची बाजू खातात. आळ्या मोठ्या होऊ लागल्यानंतर पाने संपूर्णपणे खातात, कीड मोठ्या प्रमाणावर पडल्यास झाडावर एकही पान ठेवत नाही.
काळे ढेकूण:
या किडीच्या मागील पायांचे पोटरी पानांच्या आकाराची व पसरट असल्याने या किडीस इंग्रजीत मलिफ फुटेड बगफ असे संबोधण्यात येते. पूर्ण वाढ झालेले ढेकूण डाळिंब बागेप्रमाणे मोसंबी बागेचे नुकसान करतात. ढेकूण झाडांच्या सालीतून खोलवर सोंड खूपसतात व आतील रस शोषून घेतात. ही कीड फळांमध्ये रस शोषून घेते त्यामुळे फळे निस्तेज बनतात अपक्व व फळे सडतात व गळून पडतात.
खोडकिडा:
डाळिंब फळझाडावरील अनेक विध नुकसानकारक किडीपैकीच खोडकिडा ही एक महत्त्वाची कीड होय. खिडकिडी मुळे बागेत मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. संपूर्ण झाडे या किडीमुळे मरत असल्याने बागेत दोन झाडांमध्ये अंतर पडते. खोडकिडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही.
झाड किंवा फांदी वाळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या झाडाचे बारकाईने निरीक्षण केल्यास या किडीचे अस्तित्व निदर्शनास येते. विशेषता: जुन्या बागेत किंवा दुर्लक्षित भागेत या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
Pests and Diseases Management 2025 नुकसानीचा प्रकार
डाळिंब फळपिकावर बॅटोसेरा रुफोमॅक्यूलेटा ही खोडकिड्याची प्रजाती निदर्शनास आलेली असून, ही प्रजाती इतर 30 प्रकारच्या फळझाडे आणि जंगली झाडांवर नुकसान करते. या किडीची अळी सुरुवातीला खोडावरील साल खाते आणि नंतर खोडाला छिद्र पाडून आतील गाभ्यातील खोड पोखरते. खोडाच्या आतील भागात सरळ अथवा नागमोडी पोखरलेला भाग दिसतो.
या संपूर्ण पोखरलेल्या भागात पोखरलेला भुसा आणि अळीची विष्टा भरलेली दिसते. खोडाच्या बुद्ध्याजवळ जमिनीवर लाकडी भुसा छिद्रातून पडून साचलेला दिसतो यावर खोड किड्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट होते.
ज्या फांदीवर खोड किड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे असे फांदी पिवळी पडून कमकुवत होऊन कालांतराने वाळून जाते आणि खाली पडते खोडाच्या सर्व भागात किडीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास झाड निस्तेज होऊन कालांतराने वाळते. खोडकिड्याच्या प्रादुर्भावाने झाडांच्या फळ धारणेच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

Pests and Diseases Management 2025 व्यवस्थापना करीत उपायोजना
- खोडावर किंवा फांद्यांवर भुसा दिसल्यास त्या जागेवरील छिद्र साफ करून छिद्रात तारेच्या साह्याने अळीचा नाश करावा.
- खोडावर/फांद्यावर प्रादुर्भाव झालेला छिद्रामध्ये डायक्लोरव्हॉस 10 मिली किंवा फेनव्हलरेट 5 मिली प्रतिलिटर पाण्यात घेऊन किंवा पेट्रोल 5 मिली छिद्रात इंजेक्शनच्या सहाय्याने सोडून छिद्रे चिखलाने अथवा लांबीने सीलबंद करावेत.
- पावसाळी हंगामात जून ऑक्टोंबर कालावधीत कार्बारिल 50 टक्के विद्राव्य 40 ग्रॅम किंवा डायक्लोरव्हॉस 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झाडांवर 2 ते 3 वेळेस फवारणी करावी.
Pests and Diseases Management 2025 रोग:
डाळिंबावर प्रामुख्याने मर रोग तसेच पानांवरील फळांवरील ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बुरशीजन्य रोग मुख्यताः अल्टरनेरिया, सरकोस्पोरा अस्परजिल्स व किलेटोट्रिकम या बुरशीमुळे होतो.
मर रोग:
हा रोग झाडाच्या खोडाभोवती सतत ओलावा किंवा जमीन काळी असेल अथवा पावसाळ्याच्या सुरुवातीस उष्ण व आद्रता युक्त हवामान असल्यास होतो. झाडाची पाने शेंड्यांकडून अचानक पिवळी पडण्यास सुरुवात होते. प्रथमतः एखादी फांदी वाळते त्यानंतर त्याची तीव्रता वाढून संपूर्ण झाड वाढते.
मूळ व खोडांचा अंतरछेद्र घेतला असता तपकिरी किंवा काळसर पट्टा दिसतो. खोडास लहान छिद्र पडणाऱ्या भुंगेऱ्यांचच्या प्रादुर्भावामुळे मुख्य खोडावर आणि मुळावर लहान लहान छिद्र दिसतात. खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यावर एखादी फांदी किंवा पूर्ण झाड वाळते मुळांवर सूत्रकृमीच्या गाठी दिसतात. हे प्रमाण जास्त झाल्यास झाडे मरतात.
अल्टरनेरिया बुरशीचे लक्षणे:
या बुरशीमुळे पानांवर वेडेवाकडे तपकिरी व गर्द तपकिरी ठिपके दिसतात. हे ठिपके मोठे होऊन पाने करपल्यासारखी दिसून कालांतराने पिवळी पडून गळतात.
फळांवर गोलाकार ते वेडेवाकडे लहान तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यावर पुढे ही ठिपके लालसर तपकिरी ते गर्द तपकिरी किंवा काळपट तपकिरी रंगाचे होतात. हे ठिपके सुरुवातीला फळाच्या सालीवर पडून नंतर फळांच्या आतील भाग कुजतो.
सरकोस्पोरा बुरशीचे लक्षणे:
पानांवर लहान वेडेवाकडे काळे डाग पडतात ह्या डागांचे प्रमाण वाढल्यावर पानगळ होते. तसेच फळांवर या बुरशीमुळे गोलाकार ते वेडेवाकडे गर्द काळे मोठे डाग पडतात. हे डाग मोठे होऊन काळा चट्टा पडतो व त्या ठिकाणी फळ आतून कुजते.
अस्परजिल्स बुरशीचे लक्षणे:
सुरुवातीस तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात नंतर ते ठिपके आकाराने वाढत जाऊन काळे पडतात. आणि त्यावर बुरशीची काळी वाढ दिसून येते याचे प्रमाण वाढत जाऊन फळ कुजण्यास सुरुवात होते. रोगट फळे बोटांनी दाबली असता ती दबली जातात व अंबुस वास येतो आतील दाणे रंगहीन होतात.
किलेटोट्रिकम बुरशीचे लक्षणे:
Pests and Diseases Management 2025 प्रथम पानावर जांभूळसर काळे अथवा पूर्ण काळी लहान डाग दिसतात. नंतर डागांचे भोवतालचा भाग पिवळा पडून हे लहान लहान डाग पुढे मोठे होतात. पुढे हे डाग एकमेकात मिसळून पानांवर डागांचे गर्दी होते. त्यामुळे पानांची गळ होते. तसेच या बुरशीमुळे फळांवर खोलगट तपकिरी रंगाचे गोल डाग दिसतात. हे डाग मोठे होऊन चट्टा पडतो आणि असे फळ आतून कुजते. फळांवरील छिद्राद्वारे बुरशी आत शिरगाव करते ही बुरशी डेटाच्या किंवा फळाच्या खालच्या बाजूने आत जाते अशी फळे तयार होण्या अगोदरच गळतात.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |