हरभऱ्यावरील घाटे अळीचे 100% नियंत्रण कसे करावे ? पहा सर्व माहिती : Harbhara ghate ali

Harbhara ghate ali हरभरा हे रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. बहुतांश भागात पेरणीस उशीर झाल्यामुळे सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पिक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्य स्थितीतील ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

Harbhara ghate ali

WhatsApp Group Join Now

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. या किडीची पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर पुलावर अंडी घालते. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यामधून दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते.

महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्र मध्ये हरभरा या पिकाखाली तीन लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन अडीच लाख टन होते.हे राज्याच्या एकूण हरभरा पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे 27 टक्के इतकी आहे.Harbhara ghate ali

हरभऱ्यावरील घाटे अळी साठी काय उपाय करावा : Harbhara ghate ali ?

सध्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा पालन आढळून येत आहे. फुलोरा अवस्थेतील पिकाचे नुकसान होत आहे. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था तसेच प्रथम अवस्थेतील असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभाव नियंत्रण होऊ शकते.Harbhara ghate ali

WhatsApp Group Join Now

यंदा बहुतांश भागात हरभरा पेरणीस उशीर झाला आहे. काही ठिकाणी हरभऱ्याचे पीक कळ्या, फुले लागण्याच्या अवस्थेत आहे.

तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पिक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी Tआकाराचे प्रती एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 काम गंध सापळे लावावे.

हरभरा पिकात घाटे अळीचा व्यवस्थापनासाठी 5 टक्के (NSKE) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस  (25 % इसी) 20 मिली किंवा इमामेक्टीन बॅन्जोएट (5%) 4.5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.Harbhara ghate ali

हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 200 ग्रॅम 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.

सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे करडई पिकात माव्याच्या पादुर्भावा दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट मिली किंवा असिफेट(75 %) 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.Harbhara ghate ali

हरभरा घाटे अळी नुकसानीचे प्रकार Harbhara ghate ali :

  • घाटे अळी सुरुवातीला पानावरील हरिद्रव्य खरडून खाते, त्यामुळे पाणी प्रथम पिवळसर पांढूरकी दिसतात व त्यानंतर वाळून गळून पडतात.
  • थोड्या मोठ्या झालेल्या आळ्या संपूर्ण पाणी व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडांवर फक्त फांद्याच शिल्लक राहतात.
  • पीक फुलोऱ्यावर असताना Harbhara ghate ali या अळीचा प्रादुर्भाव वाढत जातो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाटे यांचे नुकसान करतात.
  • मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र पाडून आतील दाणे खाऊन, घाटे पोखरतात.
  • एक अळी साधारणतः 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते.

घाटे अळीची ओळख :

1)ही एक बहुभक्षी कीड आहे.

  1. 2)कडधान्यांमध्ये तूर, हरभरा, मसूर, वाटाणा, चवळी या पिकांवर आढळते. तर कापूस, सूर्यफूल, टोमॅटो, कोबी व एरंडी इत्यादी पिकांवरही प्रादुर्भाव होतो.

3)पतंग पिवळसर रंगाचा असतो. पुढील पंखांची जोडी तपकिरी असून, त्यावर काळे ठिपके असतात. मादी पतंग हरभऱ्याच्या कळ्या व फुलांवर अंडी घालतात.

4)अंडी खसखशीच्या दाण्याप्रमाणे असतात. अंडी अवस्था 3-4 दिवसांची असते.

5)अंड्यातून निघालेल्या अळ्या फुले व घाटातील दाणे खाऊन 15-20 दिवसांत पूर्ण विकसित होतात. पूर्ण विकसित झालेली आणि 30 ते 40 मीमी लांब असून, ती विविध रंग छटांमध्ये आढळून येते. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रांगा असतात.

6)पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोष तपकिरी रंगाचा असतो.

घाटे अळीचे नुकसान करण्याची पद्धत :

  • पिक तीन आठवड्यांचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात.
  • पानावरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात.
  • पूर्ण विकसित घाटेअळी पोपटी रंगाची व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.
  • लहान अळ्या सुरुवातीस पानावरील आवरण खरडून खातात.

घाटी अळीचे जैविक नियंत्रण Harbhara ghate ali :

घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता प्रतिहेक्‍टर एचएनपीव्ही 250 रोगग्रस्त अळ्यांचाअर्क (2:10:9 तीव्रता) किंवा पाचशे रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (1:10:9 तीव्रता) फवारा वा.

विषाणूच्या फवारा याची कार्यक्षमता अतिनील किरणात टिकवण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणीपॉलटाकून हे द्रावण एक मिली प्रति लिटर याप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी.

ही फवारणी शेतात प्रथम व व्दितीय व्यवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.

सौरचलित फवारणी पंप मिळणार 100% अनुदानावर; असा करा अर्ज

घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन Harbhara ghate ali

  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे किडींचे कोष जमिनीवर येतात आणि पक्षी ते वेचून खातात किंवा उन्हामुळे मरून जातात.
  • शेत तणविरहित ठेवावे.
  • इंग्रजी ‘T’ अक्षराच्या आकाराचे पक्षी थांबे तयार करून शेतामध्ये लावावेत. जेणेकरून पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होईल.
  • हरभरा पिक फुलोरा अवस्थेत असताना 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिराक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती पंप फवारणी करावी.
  • हरभरा पिकाच्या शेतामध्ये एकरी 3-4 कामगंध सापळे लावावेत.

या सापळ्यांचे आणि आपल्या पिकाचे निरीक्षण करावे. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर (8 ते 10 पतंग प्रती कामगंध सापळ्यात किंवा एक ते दोन आळ्या प्रति मीटर शेतात) आढळून आल्यास खालील प्रमाणे,

रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी

  • घाटे अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्यास क्विनॉलफॉस 25 टक्‍के प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या केल्यास अळीचे व्यवस्थापन करता येईल.
  • पहिली फवारणी 40 ते 50 टक्के फुले धरल्यावर व दुसरी फवारणी 15 दिवसांनी करावी.
  • हरभऱ्यावरील घाटे अळीचा व्यवस्थापनासाठी व आर्थिक मिळकतीसाठी पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना डेल्टामेथ्रीनएक टक्का प्रवाही- ट्रायझोफॉस 35 टक्‍के प्रवाही या मिश्र कीटकनाशकाची 25 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • त्यानंतर 15 दिवसांनी इमामेक्टीन बेंजोएट पाच टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार तीन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी.Harbhara ghate ali

हे संयुक्त कीटकनाशक- 5 मिलि

  • फ्लूबेनडायमाइड (39.35 एस.सी.)- 3 मिलि
  • इन्डोक्‍झाकार्ब (14.5 एस.सी.)- 20 मिलि
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (5% ई.सी.)- 12 मिलि
  • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (18.5 एस.सी.)- 5 मिलि

आर्थिक नुकसानाची पातळी :

  • हरभरा पिक असताना सर्वेक्षण करावे.
  • दोन अळ्या प्रति मीटर आर्थिक नुकसानाची पातळी आढळून आल्यास अथवा 5 टक्के घाट्यावर अळीचे उपद्रव दिसून येतात. अथवा सतत 3 दिवस प्रत्येक कामगंध सापळ्यात 8 ते 10 नर पतंग सापडत असल्यास किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असे समजावे. त्वरित पीक संरक्षणाचे उपाय योजावेत.

शेतकरी बांधवांनी जागरुक राहून Harbhara ghate ali या किडींची प्रथम ओळख करून घेण्याची सविस्तर माहिती : video credit-Krushi vibhag maharshtra shashan

Leave a Comment