Sericulture Farming of Maharashtra 2025 राज्यात रेशीम उत्पादन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यभर 168 रेशीम अंडी पालन केंद्र (चॉकी सेंटर) स्थापन करण्यात आली आहेत.

या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने रेशीम अंडी उबविणे, कोषाचे संगोपन करणे, त्यातून धागा काढण्याची प्रक्रिया इत्यादी बाबींमध्ये मार्गदर्शन मिळते.
मर, मुळकुज व खोडकुज ‘या’ रोगांवर जालीम उपाय, करा ह्या बुरशीचा वापर!
रेशीम शेतीच्या उत्पादन प्रक्रियेत अंडीपुंज ही प्राथमिक आणि महत्त्वाची पायरी आहे आणि ती आता सहज उपलब्ध होऊ लागली आहे. राज्यात रेशीम कोष उत्पादनातही वाढ झाली असून, एकूण 4,010 मॅट्रिक टन कोश उत्पादन नोंदविण्यात आले आहे.

Sericulture Farming of Maharashtra 2025 अंडीपुंज वाटपात लक्षणीय वाढ
Sericulture Farming of Maharashtra 2025 राज्यातील चॉकी केंद्राच्या कामकाजामुळे अंडीपुंज वाटपात लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष 202425 मध्ये एकूण 60 लाख 8 हजार अंडीपूजांचे वाटप करण्यात आले.
2022-23 मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 28 लाख 37 हजार अंडीपुंज, तर वर्षभरात एकूण 51 लाख 40 हजार अंडीपुंज्यांचे वितरण झाले होते. या वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ही वाढत असून, शाश्वत उत्पन्नाचा एक नवा पर्याय निर्माण झाला आहे.
Sericulture Farming of Maharashtra 2025 विभागनिहाय कोष उत्पादन
छत्रपती संभाजी नगर विभाग | 2,325 मे. टन |
पुणे विभाग | 1,301 मे. टन |
अमरावती विभाग | 327.642 मे. टन |
नागपूर विभाग | 56.286 मे. टन |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |