Halad Bajarbhav 2025 मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरात क्विंटल मागे पाचशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

हिंगोली येथील मार्केट यार्डात गतवर्षी हळदीला सरासरी 14 ते 15 हजार रुपयांचा दर मिळाला होता. यंदाही हळदीला समाधानकारक भाव मिळेल, अशी अशा शेतकऱ्यांना होती.
राज्यात गव्हाची आवक घसरली, तुमच्या जिल्ह्यात किती दर मिळाला? वाचा सविस्तर;
यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत क्विंटल मागे दोन ते अडीच हजार रुपयांनी भाव कमी मिळत आहे. मार्च, एप्रिल मध्ये सरासरी 12 हजार 500 ते 13 हजार रुपये भाव मिळाला. जून उजाडताच मात्र भावात घसरण झाली, ती अजूनही कायम आहे.

सध्या हळदीला सरासरी 11 हजार 700 पर्यंत भाव मिळत आहे. हा भाव मागील आठवड्याच्या तुलनेत पाचशे रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.
Halad Bajarbhav 2025 हळदीला काही महिन्यांपूर्वी 13 हजारांहून आणून अधिक दर मिळत होता, तीच हळद आता अकरा हजार 700 रुपये दराने विकली जात आहे. हिंगोली बाजारात आठवडाभरात पाचशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकरी माल विक्री पासून दूर आहेत, पण व्यापार हे सध्या भाववाढीबाबत अनिश्चित आहेत. त्यामुळे ‘विकावी की थांबवी?’ या चिंतेत हळद उत्पादक अडकले आहेत.
Halad Bajarbhav 2025 हळद उत्पादकांना भाव वाढीची प्रतीक्षा….
जिल्ह्यातील अनेक हळदी उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्री केलेली नाही. आज उद्या भाव वाढतील आणि फायदा होईल अशी आशा आहे.
मात्र, भाव वाढीची शाश्वती सध्या व्यापार आहे व्यापारी ही देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हळद विक्री करावी की भाव वाढीची प्रतीक्षा करावी अशा द्विधा मनस्थिती शेतकरी सापडला आहे.
Halad Bajarbhav 2025 हळदीची आवक मंदावली!
- मागील आठवड्यात दोन ते अडीच हजार क्विंटल हळदीची आवक होत होती.
- दोन दिवसांपासून मात्र आवक मंदावली असून, 19 जून ला केवळ 1480 क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती.
- 10 हजार 700 ते जास्तीत जास्त 12 हजार 800 रुपयांनी दरम्यान भाव मिळाला तर सरासरी 11हजार 750 रुपये भाव राहिला.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |