Purna Sugar Factory 2025 पूर्णा सहकारी साखर कारखान्याने उसाच्या पहिल्या हप्त्यानंतर खरीप पेरणीसाठी थोडाफार फायदा होईल. हे पाहून 250 रुपये प्रतिटन वाढीव हत्यापोटी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 कोटी 98 लाख रुपये वर्ग केले आहेत. ऊस गाळप हंगामातील वाहतूक ठेकेदारांना कमिशन रक्कमही कारखान्याने दिली आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत विभागातील सर्वात जास्त ऊस गाळप करणारा पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता प्रतिटन 2350 रुपये अदा केले होते.
यंदा शेतमालाला बाजारात किमान आधारभूत किंमत ठरणार फायदेशीर!
Purna Sugar Factory 2025 खरीप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हातभार लागावा, यासाठी कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी उसाच्या वाढीव हप्त्यापोटी प्रतिटन 250 रुपये प्रमाणे 9 कोटी 98 लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले.

Purna Sugar Factory 2025 ऐन खरिपाच्या पेरणीत पूर्णा सहकारी साखर कारखान्याने उसाचा वाढीव हप्ता दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे कामी आले आहे. सध्यास्थितीत मोजक्या काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली असली, तरी अजून बरेच शेतकरी पेरणी करायचे राहिले आहेत. पूर्ण सहकारी साखर कारखान्याच्या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कारखाना प्रशासनाने 2024-25 गाळप हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांना देखील कमिशनपोटी 5 कोटी रुपये अदा केले आहे. 2025-26 गाळप हंगामासाठी कारखान्याने वाहतूक करारास सुरुवात केली आहे.
Purna Sugar Factory 2025 उसाचे पैसे वेळेवर द्यावेत
Purna Sugar Factory 2025 दोन पैसे मिळाल्यानंतर संसाराला हातभार लागतो म्हणून शेतकरी उसाची लागवड करतो. परंतु कारखान्यांना ऊस दिल्यानंतर उसाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी निराश होऊन ‘उसाची लागवड उगाच केली’ असे म्हणून गुपचूप बसतो. व्यवस्थापनाने या बाबतची दखल घेणे गरजेचे आहे.
“अनेक शेतकऱ्यांनी ‘पूर्णा’कडे ऊस घातला होता. यापूर्वी 2350 रुपये मिळाले. उसाच्या वाढीव हप्ता पोटी 250 रुपये खरीप हंगामातील पैसे मिळाले. त्यामुळे खरीप हंगामात बियाणे खते घेण्यासाठी कामी येतील. -राजू असोले, शेतकरी”
” सद्यस्थितीत खरीप हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना उसनवारी करावी लागत आहे. पूर्णा कारखान्याने उसाचे पैसे वेळेवर दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याचे झाले आहे. -श्रीराम इंगोले, शेतकरी”
” पूर्णा सहकारी साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता प्रति टन 2350 याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. खरीप पेरणीसाठी कारखाना प्रशासनाने निर्णय घेत उसाच्या वाढीव हप्त्या पोटी प्रति टन 250 रुपये उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत प्रतिसाद 2600 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. -केशव आकुसकर, कार्यकारी संचालक, पूर्णा कारखाना”
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |