अकोल्यात सौर ऊर्जेचा उजेड! सोलार प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत, वाचा सविस्तर; Solar Energy 2025

Solar Energy 2025 अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी उगवतोय हरित ऊर्जेचा नवा सूर्य. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सुरू झालेला रेडवा, भेंडी महाल, मनात्री आणि अकोलखेड येथील सर्व प्रकल्प शेतकऱ्यांच्या शाश्वत सिंचन स्वप्नांना देणार आहे ऊर्जा.

Solar Energy 2025

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक पाऊल उचलण्यात आले असून, ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील रेडवा (2 मेगावॅट) आणि भेंडी महाल (10 मेगावॅट) या दोन सौर प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढील दोन-तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट!

Solar Energy 2025 यासोबतच तेल्हारा तालुक्यातील मनात्री आणि अकोट तालुक्यातील अकोल खेड (प्रत्येकी 10 मेगावॅट) या सौरभ प्रकल्पांचे भूमिपूजन ही झाले.

WhatsApp Group Join Now

या प्रकल्पामुळे सुमारे 4000 शेतकऱ्यांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीज मिळणार असून, त्यामुळे कृषी पंपांची कार्यक्षमता वाढणार आहे. विशेषतः रेडवा, कान्हेरी, धाबा, पातुर महागाव, बहिरखेड अशा अनेक गावातील शेतकरी थेट लाभार्थी ठरणार आहेत.

तसेच मूर्तीजापुर तालुक्यातील हिवरा कोरडे आणि पारद येथील 33 केव्ही उपकेंद्रांचेही भूमिपूजन याचवेळी पार पडले यामुळे वीज वितरणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

Solar Energy 2025 कार्यक्रमास पालकमंत्री आकाश फुंलकर, खासदार अनुप धोत्रे, विविध आमदार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या योजनेमुळे अकोल जिल्हा हरित ऊर्जा निर्मितीत एक पाऊल पुढे गेला आहे.

WhatsApp Group Join Now

या योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या बार्शी टाकळी तालुक्यात रेडवा सौर प्रकल्पाचे क्षमता 2 मेगावॅट आणि भेंडी महाल सौर प्रकल्पातून 10 मेगावॅट इतकी हरित ऊर्जा निर्माण होणार आहे.

या दोन्ही प्रकल्पामुळे बार्शी टाकळी तालुक्यातील दगड पारवा, कान्हेरी रेडवा, दाबा बार्शीटाकळी, पातुर महागाव, बहिरखेड घोटा नंदापूर, महान आदी गावातील 2595 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा होणार आहे.

Solar Energy 2025 मनात्री अकोलखेड सौर प्रकल्पाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या तेलारा तालुक्यातील मनात्री आणि अकोट तालुक्यातील अकोलखेड या दोन्ही सर्व प्रकल्पाची क्षमता प्रत्येकी 10 मेगावॅट एवढी असून या प्रकल्पामुळे परिसरातील 1500 शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

Solar Energy 2025 हिरवा कोरडे पारद उपकेंद्रांचे भूमिपूजन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुर्तीजापुर तालुक्यातील 33 केव्ही कोरडे आणि 33 केव्ही पारद या दोन उपकेंद्रांचे भूमिपूजन करण्यात आले.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment