शेतकरी, मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापरण्याचे कृषी अभ्यासकांचे आवाहन, वाचा काय आहेत फायदे! Crop Rotation 2025

Crop Rotation 2025 नगदी पैसा हाती येतोय या नादात सध्या शेतकरी त्याच जागेवर एकाच पिकाचे वाण वारंवार घेत असल्याने ही एक पीक पद्धत शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

Crop Rotation 2025

शेतकऱ्यांनी सर्वाचे आणि शेतीचे आरोग्य व पीक क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे.

पुढील पाच ते सहा दिवस पावसाचा जोर ओसरणार; पेरणी करावी का?

सतत एकच वाण पुन्हा पुन्हा पेरणी शेतीची उत्पादनता क्षमता घटनेस घटण्यास कारणीभूत ठरत आहे. यांत्रिकीकरण आणि आधुनिक संकलित वाण आल्याने एकाच जमिनीवर दोन पेक्षा अधिक वेळा उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे. सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, ऊस हेच पीक वारंवार घेतले जाते. परंतु शेतीची प्रत आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक इतर पिके टाळली जात आहे.

WhatsApp Group Join Now

तृणधान्य, ज्वारी, बाजरी, मका, पिवळी ज्वारी, तांदूळ, भगर, राळे, कडधान्य मूग, मटकी, चवळी, मसूर, वाटाणा यांसह तेलबिया जवस, करडी, भुईमूग, कारळाकडे पाठ फिरवली जाते.

भाजीपाल्यात कारले, भोपळा, दोडका, गवार, वाल, तोंडली, करटुले या पालेभाज्या आणि आंबा, पेरू, चिकू, अंजीर, जांभूळ, सीताफळ, मोसंबी, रामफळ, बोरे आधी अन्न घटकात आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

मात्र, याकडे सरळ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. समिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक ते सर्व अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास फायदेशीर ठरेल. तसेच शेतीची प्रत सुद्धा संतुलित राहण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

WhatsApp Group Join Now

Crop Rotation 2025 चक्री पद्धतीने करावा पेरा

शेतकरी बांधवांनी आपली आणि शेतीची गरज म्हणून चक्री पद्धतीने पीक पद्धती वापरावी. रानभाज्याचे महत्व ओळखून त्या देखील जतन कराव्यात. – राजेंद्र नेटके, कृषी अधिकारी, शिरूर का. जि. बीड.”

Crop Rotation 2025 मधुमक्षिका पालन करा

शेतीच्या धारण क्षेत्रात घट होत आहे. यासाठी आंतरपीक पद्धती आणि जोडधंदा म्हणून रेशीम लागवड, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावी करावे. – सुरेश घोळवे, तहसीलदार, शिरूर कासार जि. बीड.”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment