Kharif Pik Vima 2025 एक रुपयात पिक विमा योजनेत गैरप्रकार झाल्यामुळे रद्द करून राज्य शासनाने नवीन पिक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांना पिक विमा साठी खरीप हंगामात दोन टक्के, रब्बीसाठी दीड टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी 5 टक्के योगदान द्यावे लागणार आहे.
बाजारात भाजीपाला कडाडला, शेतकऱ्यांना दिलासा कुठे? वाचा सविस्तर;
उर्वरित पीक विम्याची रक्कम केंद्र आणि राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे पिक विमा साठी जादा पैसे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

Kharif Pik Vima 2025 राज्यात खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात 2023 पासून एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली होती.
या योजनेची अंमलबजावणी करताना गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर सरकारने या पिक विमा योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. आता सरकारने शासन निर्णय जारी करत सुधारित पिक विमा योजनेतील बदल जाहीर केले आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी दोन टक्के, रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल.
केंद्राचे पिक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग घेऊ शकतो. सुधारित पिक विमा योजना ही योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी कॅप ऍड कॅप मॉडेल (80:110) नुसार राबविण्यात येईल.
योजनेअंतर्गत नुकसान भरपाईच्या निश्चितीसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसान काढताना भारकांन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
भात, गहू, सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान 50 टक्के भारकांन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन, 50 टक्के भारकांनपीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल. त्यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येणार आहे.
सुधारित पिकविमा योजना खरीप व रब्बी हंगामातील पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वाद, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूसलखन, अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट यांचा समावेश राहील.
Kharif Pik Vima 2025 पन्नास हजाराच्या विम्यासाठी हजार रुपयांचा हप्ता….
- एक रुपयात पिक विमा बंद होण्यामुळे शेतकऱ्यांना नेमका पिक विमा हप्ता किती भरावा लागेल, अशी चर्चा सुरू झाली.
- त्यामध्ये उदाहरणार्थ खरिपातील सोयाबीन पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 50 हजार रुपये गृहीत धरल्यास शेतकऱ्यांनी दोन टक्क्यांप्रमाणे भरावयाचा विमा हप्ता हा प्रति हेक्टरी 1 हजार रुपये राहील.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |