Girna Dam Storage 2025 चाळीसगाव : राज्यात सद्यस्थितीत पावसाचे धुमशान सुरू असून काही धरणांच्या जल पातळी जल पातळीतही वाढ झाली आहे. मात्र, अवकाळी पावसाचा कोणताही बूस्टर गिरणा धरणाला मिळणार नाही. धरणात गुरुवार अखेर केवळ 21 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

धरणातून पेजलासाठी वर्षभरात देण्यात येणारे सर्व चारही आवर्तने दिली गेली आहेत. पुढे मागणी झाली तरच आवर्तन सोडण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल, असे गिरणा पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. गिरणा धरणातून निम्म्या जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो.
कोठे 7 हजार, कोठे 4 हजार, तुरीच्या दरात मोठी तफावत! वाचा सविस्तर;
गेल्या वर्षी 30 ऑगस्टला गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. पर्जन्यमानाची एक्सप्रेस धीम्या गतीने धावल्याने हा महाकाय प्रकल्प काहीच उशिरा ओव्हरफ्लो झाला होता. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणानंतर मोठा जलप्रकल्प म्हणून गिरणा धरणाचा उल्लेख होता.

गत 55 वर्षात 14 वेळा धरणाने शंभरी गाठली आहे. 2023 मध्ये धरण कसेबसे 56 टक्के भरले होते. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 21 हजार 500 दलघफू असून मृत साठा 3 हजार दलघफू इतका आहे.
Girna Dam Storage 2025 पेयजलासाठी चार तर सिंचनासाठी तीन आवर्तने
गिरण धरण ओव्हरफ्लो झाल्यास सिंचनासाठी तीन तर पेयजलासाठी चार आवर्तने दिली जातात. 2023 मध्ये धरणात केवळ 56 टक्केच जलसाठा झाल्याने सिंचनासाठी एकही आवर्तन दिले गेले नाही. यामुळे हजारो हेक्टर शेती क्षेत्राला मोठा फटका बसला होता.
गेल्यावर्षी मात्र परतीच्या पावसाने भरभरून माप दिल्याने धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने दिली गेली. याचा थेट फायदा गिरणा खोऱ्यातील बागायती क्षेत्राला ही झाला. गेल्यावर्षी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पेयजलासाठी चार आवर्तने देण्यात आली आहे. चौथे आणि शेवटचे आवर्तन 16 रोजी सोडले गेले.
जिल्ह्यातील 75 टक्के लोकसंख्येची भागते तहान
- गिरणा धरणातून चाळीसगावसह मालेगाव शहर, नांदगाव व 56 खेडी यासोबतच 127 पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडले जाते.
- Girna Dam Storage 2025 चाळीसगाव व मालेगाव औद्योगिक वसाहतीची चाके ही गिरणा धरणाच्या पाण्यावरच फिरतात.
- जिल्ह्याच्या 75 टक्के लोकसंख्येची तहान आहे गिरणा धरणच भागवते. पेयजलासाठी गिरणा धरणाचे पाणी दहिगाव बंधाऱ्यापर्यंत प्रवास करते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |