Pausali Perni 2025 सद्यस्थितीत राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाची लगबग करीत आहेत. अशा स्थितीत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी सामान्य कृषी सल्ला देण्यात आला आहे.

शिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नेमकी पेरणी कधी करावी, कोरडवाहू पिकांसाठी काय सल्ला, आंतरपीकि कोणती घेता येतील हे समजून घेऊयात….
शेतजमीन वाटणी पत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी माफ काय आहे निर्णय? वाचा सविस्तर;
Pausali Perni 2025 अशी घ्या काळजी
वापसा आल्यानंतर कुळवाने मशागत करावी, म्हणजे उगवलेल्या ताणाचा बंदोबस्त होईल. शेत खरीप पेरणी योग्य होईल.

खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्याचे नियोजन करावे. जमिनीतील तापमान कमी झालेले नसतानाही कापूस पिकाची लागवड केल्यास कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
त्यामुळे जमिनीतील तापमान कमी झाल्याशिवाय लागवडीची घाई करू नये.
Pausali Perni 2025 कोरडवाहू पिके
- हलक्या जमिनीत वापस आल्यानंतर कुळवाने पूर्व मशागत करून बियाण्यास फुले सुपर बायोमिक्सची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.
- कोरडवाहू भागात ज्या ठिकाणी जमिनीची पूर्व मशागत झालेली असल्यास आणि पेरणी योग्य 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
- अशा ठिकाणी वापसा आल्यानंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे खाली नमूद केल्याप्रमाणे पेरणी करावी.
| हलकी जमीन | हुलगा, मटकी |
| मध्यम व भारी जमीन | उडीद, मूग, चवळी, सूर्यफूल, तूर |
आंतरपीक पद्धत
येत्या कालावधीमधील पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, कोरडवाहू विभागांमध्ये तूर अधिक सूर्यफूल (2:1) तुर + बाजरी (2:1), तूर + मूग / उडीद (2:1) या अंतर्गत पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरू शकेल.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |