Almatti Dam 2025 कोल्हापूर/ सांगली : पावसाळ्यात सांगली जिल्ह्यातील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक मध्ये समन्वय ठेवला जाईल. अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे याची पूर्व सूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिले जाईल.

अलमट्टीतील पाणी पातळी 15 ऑगस्ट पर्यंत 517 ते 517.50 मीटर दरम्यान राखली जाईल, असे आश्वासन कर्नाटकच्या प्रशासनाने मंगळवारी दिले.
अवकाळी पावसामुळे उजनी प्लस मध्ये; धरणात किती पाणीसाठा?
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सांगली, तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पुराचा धोका कमी करण्यासाठी उपाय योजना व समन्वयावर चर्चा झाली.

यावेळी महाराष्ट्र कर्नाटक प्रशासनातील समन्वयातून कोल्हापूर सांगलीतील पुर रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय झाला.
पंचगंगा व कृष्णा नदीतील पाण्याची पातळी, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती, तसेच आंतरराज्य समन्वयातून दोन्ही राज्यांमधील जलस्त्रोत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने प्रशासनाने एकत्र येऊन पूर व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय झाला.
Almatti Dam 2025 अधिकाऱ्यांची नियुक्ती!
धरणातील पाणी पातळी बाबत कर्नाटक राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचे प्रतिनिधी वारणा, कोयना धरण व राजापूर बंधाऱ्यावर तर सांगलीचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी अलमट्टी धरणाच्या ठिकाणी समन्वय अधिकारी असतील.
दोन राज्यांच्या मुख्य सचिवांची उद्या बैठक
संभाव्य पुर व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक गुरुवारी दिनांक 29 घेण्यात येणार आहे.
Almatti Dam 2025 बैठकीतील निर्णय….
- हिप्परगी बंदराच्या दरवाजे पूर काळात उघडे ठेवणे.
- कोल्हापूरच्या पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पाणी अडविण्यासाठीचे दरवाजे पावसाळ्यापूर्वी काढून घेणे.
- नदीपात्रातील बांध काढून टाकणे.
- रियल टाईम डेटाबेस यंत्रणा सुरू करणे.
- पूर काळा चारही जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एकत्रितपणे काम करतील.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |